कोल्हापूर पॅटर्न! धैर्यशील माने आशीर्वादासाठी राजू शेट्टींच्या घरी, आई म्हणाली….!

Dhairyasheel Mane meets Raju Shetti कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वत्र मंत्रिमंडळाची चर्चा सुरु झाली आहे. कोणत्याही निवडणुकीत देशापेक्षा नेहमीच वेगळं चित्र कोल्हापूर जिल्ह्यात पाहायला मिळतं. राजकारणातील नवा कोल्हापुरीत पॅटर्न समोर आला आहे. शिवसेनेचे नूतन खासदार धैर्यशील माने यांनी ज्यांचा पराभव केला त्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या घरी जाऊन त्यांच्या […]

कोल्हापूर पॅटर्न! धैर्यशील माने आशीर्वादासाठी राजू शेट्टींच्या घरी, आई म्हणाली....!
Follow us
| Updated on: May 29, 2019 | 10:23 AM

Dhairyasheel Mane meets Raju Shetti कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वत्र मंत्रिमंडळाची चर्चा सुरु झाली आहे. कोणत्याही निवडणुकीत देशापेक्षा नेहमीच वेगळं चित्र कोल्हापूर जिल्ह्यात पाहायला मिळतं. राजकारणातील नवा कोल्हापुरीत पॅटर्न समोर आला आहे. शिवसेनेचे नूतन खासदार धैर्यशील माने यांनी ज्यांचा पराभव केला त्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या घरी जाऊन त्यांच्या मातोश्रीचे आशीर्वाद घेतला.

खासदार धैर्यशील माने यांनी कार्यकर्त्यांसह राजू शेट्टी यांच्या घरी जाऊन राजू शेट्टी यांच्याशी संवाद साधलाच, शिवाय त्यांच्या मातोश्रीचे आशीर्वादही घेतले. यावेळी राजू शेट्टींच्या आईने धैर्यशील माने यांचं औक्षण केलं.  मी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे, तुमचा आशीर्वाद राहूदे सर्वकाही चांगलं होईल, असं धैर्यशील माने राजू शेट्टी यांच्या आईला म्हणाले.

यावर माझा आशीर्वाद लय मोठा आहे. माझा लेक सर्वांना धरुन आहे, तसं तुम्हीही लोकांना धरुन राहा असा आशीवार्द राजू शेट्टींच्या आईने धैर्यशील माने यांना दिला.

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टी आणि धैर्यशील माने यांच्यात लढत झाली. राजू शेट्टी हे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून मैदानात होते. तर धैर्यशील माने हे शिवसेनेच्या तिकीटावर युतीकडून लढत होते. यावेळी धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांचा पराभव केला. संपूर्ण देशाचं लक्ष या मतदारसंघाकडे होते. राजू शेट्टी यांच्या पराभवाने धैर्यशील माने हे नाव देशभर गाजलं. मात्र आता धैर्यशील माने यांनी खिलाडूवृत्ती दाखवत, राजकारणाच्या पलिकडे जात थेट राजू शेट्टी यांचं घर गाठून त्यांचा आशीर्वाद घेतला आणि राजकारणातील नवा कोल्हापुरी पॅटर्न देशाला दाखवून दिला.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघ निकाल

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात धैर्यशील माने यांनी 93 हजार मतांनी विजय मिळवला.

झालेलं मतदान : 12,26,923 मोजलेलं मतदान: 12,26,923 धैर्यशील माने (शिवसेना) : 5,74,077 राजू शेट्टी ( स्वा. शेतकरी संघटना): 4,80,292 वंचित : 1,20,584 धैर्यशील माने 93,785 मतांनी विजयी

VIDEO:

संबंधित बातम्या 

“राजू शेट्टी साहेब, तुम्ही या रणजितच्या जातीत का जन्माला आला नाहीत?”   

कोल्हापुरात भगवा फडकला, बाळासाहेब असायला हवे होते : चंद्रकांत पाटील 

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.