Dhananjay Munde : धनंजय मुंडे पुन्हा म्हणाले “मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच”, तर नाना पटोले म्हणतात काहींना दिवसा स्पप्न पडतात…

| Updated on: Jun 05, 2022 | 3:10 PM

राष्ट्रवादी, शिवसेनेना आणि काँग्रेसने अडीच वर्षापूर्वी सरकार स्थापन केलं. तेव्हापासून महाविकास आघाडीतील धुसफूस अनेकदा बाहेर आली आहे. गृहमंत्रिपदावरूनही चांगल्याच चर्चा रंगल्याच्या आपण पाहिल्या. मात्र आता थेट मुख्यमंत्रिपदावरूनच रेस लागली आहे. कारण आज धनंजय मुंडे यांनी पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होईल म्हणत आपल्या वक्तव्याचा पुनरोच्चार केलाय. 

Dhananjay Munde : धनंजय मुंडे पुन्हा म्हणाले मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच, तर नाना पटोले म्हणतात काहींना दिवसा स्पप्न पडतात...
: धनंजय मुंडे पुन्हा म्हणाले "मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच"
Image Credit source: tv9
Follow us on

बीड : काही दिवसांपूर्वीच सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री (Chief Minster) व्हावा, यासाठी तुळजाभवानीला केलेला नवस हा बराच गाजला होता. त्यानंतर धनजंय मुंडे (Dhananjay Munde) यांनीही पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच अशी हाक दिली. तर दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत रोज बोलत असतात की पुढचे 25 वर्षे मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच राहणार, त्यामुळे राज्यातली जनताही आता चांगलीच संभ्रमात पडायला लागली. कारण जे पुढच्या मुख्यमंत्रीपदाचा दावा करत आहेत. तेच आता सरकारमध्ये एकत्र आहेत. राष्ट्रवादी, शिवसेनेना आणि काँग्रेसने अडीच वर्षापूर्वी सरकार स्थापन केलं. तेव्हापासून महाविकास आघाडीतील धुसफूस अनेकदा बाहेर आली आहे. गृहमंत्रिपदावरूनही चांगल्याच चर्चा रंगल्याच्या आपण पाहिल्या. मात्र आता थेट मुख्यमंत्रिपदावरूनच रेस लागली आहे. कारण आज धनंजय मुंडे यांनी पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होईल म्हणत आपल्या वक्तव्याचा पुनरोच्चार केलाय.

धनंजय मुंडे पुन्हा काय म्हणाले?

मुख्यमंत्रिपदाबाबतच्या आधीच्या वक्तव्यांबाबत बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, लहान अपेक्षा कार्यकर्त्यांसमोर आम्ही वक्तव्य करत नाही. पक्ष वाढीची ज्या ज्या वेळेस चर्चा होते. त्यावेळेस कार्यकर्त्यानासमोर पक्ष ज्या वेळेस एक नंबरचा पक्ष होईल, त्यावेळेस मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा असेल, असे धनंजय मुंडे हे पुन्हा म्हणाले आहेत.

गुलाबराव पाटलांचा मुंडेंना टोला

यावर मंत्री गुलाबराव पाटील यांना प्रश्न विचारला असता, मंत्री पाटील म्हणाले की प्रत्येकाला आपला पक्ष मोठा व्हावं असं वाटत असतं, त्यामुळे त्यांना जर त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा असे वाटत असेल तर मला ही उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान व्हावे असं वाटत असल्याचा टोला मंत्री पाटील यांनी लगावला आहे.

नाना पटोलेंचाही खोचक टोला

स्वप्न बघने हा सर्वांचा अधिकार असून काही लोक दिवसा स्वप्न बघत असल्याच्या खोचक टोला कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना लगावला आह. भविष्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री बनेल या धनजंय मुंडे यांच्या वक्तव्यावर नाना पटोले बोलत होते. लोकशाहीत मुख्यमंत्री कोन बनेल हे जनता ठरवत असते. त्यामुळे स्वप्न बघने हे सर्वाचा अधिकार आहे, त्यामुळे काही लोक तर दिवसा स्वप्न पाहात असतात ,असा खोचक टोला नाना पटोले यांनी धनंजय मुंडे यांना लगावला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्रिपदावरून महाविकास आघाडीतच रस्सीखेच वाढताना दिसत आहे. तर दुसरीकडे भाजपने पुढच्या निवडणुकीची आत्तापासूनच तयारी सुरू केली आहे.