Dhananjay Munde case | शरद पवारांचा सूचक इशारा, तरीही धनंजय मुंडेना राष्ट्रवादीकडून अभय?

गुरुवारी रात्री झालेल्या राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर धनंजय मुंडे यांच्यावरील गंडांतर तुर्तास तरी टळल्याचं पाहायला मिळत आहे.

Dhananjay Munde case | शरद पवारांचा सूचक इशारा, तरीही धनंजय मुंडेना राष्ट्रवादीकडून अभय?
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 10:18 AM

मुंबई: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कारासारखा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यावरुन आक्रमक झालेल्या भाजपनं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांना सूचक इशारा दिला होता. असं असतानाही गुरुवारी रात्री झालेल्या राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर मात्र मुंडे यांच्यावरील गंडांतर तुर्तास तरी टळल्याचं पाहायला मिळत आहे. हे नेमकं कसं घडलं? असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे.(NCP has taken a mild stance towards Dhananjay Munde)

धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी बलात्कारासारखा गंभीर आरोप केला. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी तातडीने शरद पवार यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली. त्यानंतर धनंजय मुंडे यांना काहीसा दिलासा मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण गुरुवारी भाजप नेते चांगलेच आक्रमक झाल्यानं धनंजय मुंडे यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढल्याचं बोललं जात होतं. शरद पवार यांनीही माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई होईल, असंच सूचक वक्तव्य केलं होतं.

शरद पवारांचा मुंडेंना सूचक इशारा

“धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचं स्वरुप गंभीर आहे. पक्ष आणि पक्षप्रमुख म्हणून आम्ही चर्चा करुन तातडीने योग्य निर्णय घेऊ. त्याचवेळी कोणावरही अन्याय होणार नाही हे सुद्धा पाहू”, असं शरद पवार गुरुवारी म्हणाले होते. माझ्या मते त्या आरोपाचं स्वरुप गंभीर आहे, साहजिकच याबाबत पक्ष म्हणून विचारविनिमय करावा लागेल. यासाठी पक्षाचे प्रमुख सहकारी आहेत, त्यांच्याशी अद्याप बोलणं झालेलं नाही. पक्ष म्हणून, पक्षप्रमुख म्हणून जे काही निर्णय घ्यावे लागतील, काळजी घ्यावी लागेल ते तातडीने निर्णय घेऊ, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं होतं.

भाजप नेत्याची रेणू शर्माविरोधात तक्रार

दरम्यान, भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी गुरुवारी दुपारी रेणू शर्मा या धनंजय मुंडेंविरोधात तक्रार देणाऱ्या महिलेविरोधात पोलिसांना एक पत्र दिलं आहे. संबंधित महिलेनं आपल्यालाही रिलेशनशिपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 2010 पासून रेणू शर्मा मला सतत कॉल आणि मेसेज करत होती. त्या सातत्याने मला रिलेशनशिपसाठी गळ घालत होत्या, असंही त्यांनी म्हटलंय. तसंच मनसे पदाधिकारी मनीष धुरींबाबतही असाच प्रकार घडला होता. जर आपण 2008-09 मध्ये रेणू शर्माच्या जाळ्यात अडकलो असतो तर आपलाही धनंजय मुंडे झाला असता, असं मनीष धुरी यांनी म्हटलंय.

कोअर कमिटीत असं काय घडलं?

सकाळी शरद पवार यांचा सूचक इशारा, दुपारी भाजप आणि मनसे नेत्याचं रेणू शर्मा यांच्याविरोधात पोलिसांना पत्र या घडामोडीनंतर गुरुवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. जयंत पाटील यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. या बैठकीत धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका मांडली आणि पक्ष पूर्णपणे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभा असल्याचं दिसून आलं.

हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार- पाटील

“रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जे गंभीर आरोप केले आहेत, ती एक विचारपूर्वक केलेली व्यूहरचना आहे. ब्लॅकमेलिंग केलं जात आहे. यामागे राजकीय षडयंत्र आहे. त्या महिलेविरोधात खुद्द भाजपच्याच नेत्यांनी आरोप केले आहेत. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत. मला पूर्ण विश्वास आहे की, धनंजय मुंडे यांना ब्लॅकमेल केलं जात आहे. या तपासातून काही निष्पन्न होणार नाही. पोलिस योग्यरित्या तपास करतील अशी अपेक्षा आहे,” असं जयंत पाटील गुरुवारी रात्री झालेल्या बैठकीनंतर म्हणाले.

गुरुवारी दिवसभरात घडलेल्या या घडामोडींमुळे धनंजय मुंडे यांच्यावरील गंडांतर तुर्तास तरी टळली असल्याचंच पाहायला मिळालं आहे. कारण, भाजपचे काही नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचंच आता दिसून येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे यांना एकप्रकारे अभय मिळाल्याचंच बोललं जात आहे.

संबंधित बातम्या :

शरद पवार ते अमोल कोल्हे, धनंजय मुंडे प्रकरणावर कोण काय म्हणाले?

‘धनंजय मुंडेची हकालपट्टी ते आमदारकी रद्द करा’, भाजप आक्रमक

NCP has taken a mild stance towards Dhananjay Munde

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.