Dhananjay Munde case | करुणा शर्माबाबत धनंजय मुंडेंचा खुलासा, पण कोण आहेत करुणा शर्मा?

धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नीचं नाव करुणा शर्मा आहे. मात्र, या करुणा शर्मा आहेत तरी कोण? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांनाही पडला आहे.

Dhananjay Munde case | करुणा शर्माबाबत धनंजय मुंडेंचा खुलासा, पण कोण आहेत करुणा शर्मा?
करुणा शर्मा यांची धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार
Follow us
| Updated on: Feb 03, 2021 | 6:39 PM

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातील मोठे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. या आरोपानंतर धनंजय मुंडे यांनी फेसबूकवरुन आपल्या दुसऱ्या पत्नीबाबत खुलासा केलाय. धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नीचं नाव करुणा शर्मा आहे. मात्र, या करुणा शर्मा आहेत तरी कोण? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांनाही पडला आहे.(Who is Karuna Sharma revealed by Dhananjay Munde?)

धनंजय मुंडे यांच्याविरोधात रेणू शर्मा यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यात संबंधित महिलेनं धनंजय मुंडे यांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. तक्रारदार महिलेनं “आपण धनंजय मुंडे यांना 1996 पासून ओळखतो. त्यांनी 2006 पासून वारंवार माझ्यावर बलात्कार केला. 2006 साली माझी बहीण बाळंतपणासाठी इंदौरला गेली होती. तेव्हा घरात कुणी नाही हे माहिती असूनही ते घरी आले आणि माझ्यावर बलात्कार केला,” असा आरोप रेणू शर्मा यांनी केला आहे.

करुणा शर्माबाबत धनंजय मुंडे यांचा खुलासा

दरम्यान, बलात्कारासारख्या गंभीर आरोपानंतर धनंजय मुंडे यांनी आपली भूमिका मांडली आहे. करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी आणि मित्र परिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे. ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे.

सदर करुणा शर्मा नावाची महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. मी त्यांना मुंबईत सदनिका घेण्यास मदत केली आहे. मी त्यांना विमा पॉलिसी आणि त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापित करण्यास मदत केलेली आहे. या सर्व कृती मी सद्भावनेने केलेल्या आहेत.

मात्र 2019 पासून करूणा शर्मा त्यांची बहीण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जिवीतीला गंभीर शारीरिक इजा करण्याच्या, धोका करण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील सहभागी होता.

फेसबूकवरील करुणा शर्मा यांचे अकाऊंट

ज्या करुणा शर्माबाबत धनंजय मुंडे यांनी खुलासा केला आहे, त्या करुणा शर्मा कोण? असा प्रश्न विचाराला जातोय. तर करुणा धनंजय मुंडे अशा नावाचं फेसबूकवर एक अकाऊंट आहे. त्यात आपण धनंजय मुंडे यांच्या पत्नी असल्याचं ही महिला सांगते. या अकाऊंटवरुन त्यांनी दोन दिवसांपूर्वीच एक पोस्ट केली होती. त्यात “सीता हर युग में अग्नि परीक्षा नही देगी” असं म्हटलंय. त्याचबरोबर त्यांनी 14 नोव्हेंबरला याच अकाऊंटवरुन अजून एक पोस्ट केली होती. त्यात “मैं 18 तारीख को परली वैजनाथ आने वाली हूँ” असं म्हटलं होतं.

याच फेसबूक अकाऊंटवर करुणा यांचे अनेक फोटो आहेत. त्यात त्या अनेक सामाजिक कार्य करत असल्याचं पाहायला मिळत आहे. लहान मुलांना शालेय साहित्य आणि पदार्थांचं वाटप, आत्मसुरक्षा बल शिबिरातील सहभाग, अभिनेता गोविंदासोबतचे काही फोटो पोस्ट करण्यात आलेले आहेत. त्यामुळे हे फेसबूक अकाऊंट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान या अकाऊंटबाबत अद्याप कुणीही पुष्टी केलेली नाही.

करुणा शर्मा या समोर का येत नाहीत?

त्यामुळे धनंजय मुंडे यांनी ज्या करुणा शर्मा यांच्याबाबत खुलासा केला आहे. त्या नेमक्या कुठे आहेत? असा प्रश्न अजूनही विचारला जात आहे. तसंच त्यांच्या बहिणीने केलेल्या आरोपांबाबत त्यांनी अद्याप आपली भूमिका का मांडली नाही, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

संबंधित बातम्या:

मोठी बातमी : करुणा शर्मा यांनीही मौन सोडलं, धनंजय मुंडेंविरोधात गंभीर तक्रार

महाराष्ट्रातील सर्वात मोठा गौप्यस्फोट, करुणासोबत परस्पर सहमतीने संबंधात दोन मुलं, धनंजय मुंडेंची कबुली

1997 मध्ये ओळख झाल्याचा दावा, धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणारी रेणू शर्मा कोण?

Who is Karuna Sharma revealed by Dhananjay Munde?

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.