धनंजय मुंडे मानसिकदृष्ट्या आत्ताच हरलेत : पंकजा मुंडे
एकदा लेकीला संधी दिली, आता लेकाला संधी द्या, असं आवाहन करतात. त्यामुळे ते (Pankaja and Dhananjay Munde) मानसिकदृष्ट्या आत्ताच हरले आहेत," असा घणाघात ग्रामविकास मंत्री आणि परळीच्या भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांनी केला.
मुंबई : “आतापर्यंत मी भावनिक राजकारण करते असा आरोप माझ्यावर केला जायचा. पण परळीचे राष्ट्रवादीचे उमेदवार (Pankaja and Dhananjay Munde) सध्या स्वतःच भावनिक राजकारण करत आहेत, मी गोपीनाथ मुंडे हे माझे वडील नाहीत हाच माझा गुन्हा आहे का असा प्रश्नही लोकांना विचारत आहेत, एकदा लेकीला संधी दिली, आता लेकाला संधी द्या, असं आवाहन करतात. त्यामुळे ते (Pankaja and Dhananjay Munde) मानसिकदृष्ट्या आत्ताच हरले आहेत,” असा घणाघात ग्रामविकास मंत्री आणि परळीच्या भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांनी केला.
टीव्ही 9 मराठीशी बोलताना पंकजा मुंडे यांनी परळीतून पुन्हा एकदा विजयाचा दावा केला. परळी मतदारसंघ हा बहीण आणि भावाची जहागिरी नाही, तिथे आणखी कुणी चांगलं काम करणारा आला तर त्याचंही स्वागत आहे. पण लोकांचा वाली बनण्याचा वारसा मी चालवत असून तो यशस्वीपणे चालवला आहे, असंही त्या म्हणाल्या.
धनंजय मुंडे लोकसभेला म्हणाले, मला मत देऊ नका, पण लोकसभेच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला द्या. आता म्हणतात, मी गोपीनाथ मुंडेंच्या पोटी जन्म घेतला नाही हा माझा दोष आहे का. ते नेहमीच भावनिक राजकारण करतात. निवडणूक ते मानसिकदृष्ट्या आत्ताच हरले आहेत. त्यांना एवढं भावनिक होण्याची गरज नाही, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
परळीतील विकासकामांच्या जोरावर मी निवडून येणार असल्याचं पंकजा म्हणाल्या. विरोधकांकडे परळी नगरपरिषद आहे, पण त्यांचे रस्ते पाहिले तर कार्यकर्ते म्हणतात, ‘आमचे रस्ते पंकजाच करतील’. कारण, बोगस बिले उचलणे, दादागिरी करणे हे त्यांचं काम आहे. आम्ही गुणवत्तापूर्ण काम करतो. त्यांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात धमकी दिली की, ‘कुणी बेईमानी केली तर याद राखा’, पण मी मेळाव्यात सांगते की, ‘माझ्या कार्यकर्त्यांच्या केसालाही धक्का लागला तर यादा राखा’, हा दोन लोकांमधला फरक आहे, असं म्हणत धनंजय मुंडेंवर पंकजांनी धमकी देण्याचा आरोपही केला.
VIDEO : पंकजा मुंडे यांची संपूर्ण मुलाखत