Dhananjay Munde LIVE: मुंडे प्रकरणातील सर्व पुरावे पोलिसांना देणार : रेणू शर्मा यांचे वकील

| Updated on: Apr 15, 2021 | 3:32 PM

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर रेणू शर्मा यांनी बलात्कारासारखे गंभीर आरोप केल्यानं त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. (Dhananjay Munde NCP Meeting Live Updates)

Dhananjay Munde LIVE: मुंडे प्रकरणातील सर्व पुरावे पोलिसांना देणार : रेणू शर्मा यांचे वकील
तक्रारदार महिलेने धनंजय मुंडे यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.
Follow us on

विरोधीपक्षाने भान ठेवावे, आपणही सत्तेत असल्याचं ध्यानात ठेवावं, हमाम में सब नंगे है, याचं भान प्रत्येकानं ठेवावं, कोणीही आम्हाला नीतीमत्ता शिकवू नये : संजय राऊत

 

धनंजय मुंडे प्रकरणाची प्रत्येकअपडेट LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 15 Jan 2021 03:55 PM (IST)

    Dhananjay Munde LIVE: मुंडे प्रकरणातील सर्व पुरावे पोलिसांना देणार : रेणू शर्मा यांचे वकील

    रेणू शर्मा यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत.

    मला धमाक्या येत आहेत. शिवराळ भाषेचा उपयोग केला जात आहे.

    रेणू शर्मा यांची प्रतीमा खराब खरण्याचा प्रयत्न होत आहे.

    मला आणि रेणू शर्मा यांना संरक्षण पुरवण्याची मागणी केली आहे.

    आमची तक्रार दाखल केली नाही तर कोर्टात जाणार. आम्हाला कोर्टावर विश्वास आहे.

    उद्या एसीपी ऑफीसला जाऊन तक्रार दाखल करणार आहे.

    रेणू यांच्यावरील आरोप केवळ मीडियातून आले आहेत. त्याबाबत कुणीही आम्हाला नोटीस दिलेलं नाही. आम्हाला जेव्हा नोटीस येईल तेव्हा बघू

    मुंडे प्रकरणातील सर्व पुरावे पोलिसांना देणार आहोत.

    करूणा आणि रेणू शर्मा या दोन वेगवेगळ्या केसेस आहेत. दोन्ही सख्या बहिणी आहेत. याचा अर्थ एकीशी लग्न झाल्याने दुसरीवर बलात्कार करण्याचा अधिकार मिळत नाही
    रेणू यांच्यावर बलात्कार झाला आहे. त्यांचा व्हिडिओ काढलेला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होऊ नये म्हणून रेणू यांनी केस दाखल केली नव्हती.
    उद्या आमचा एफआयआर दाखल होणार. नाही झाला तर कोर्टात जाऊ

    मला धमक्या देण्यात येत आहेत. काल सायंकाळी साडेसात वाजल्यापासून धमक्या येणं सुरु झालं आहे. तुम्ही केस सोडा, त्यांच्याविरोधात केस लढू नका असं म्हणत धमकावलं जात आहे. मला फोनवरुन शिव्या घातल्या जात आहेत.

     

  • 15 Jan 2021 03:18 PM (IST)

    हनीट्रॅपचा प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणात नव्हता : संजय राऊत

    धनंजय मुंडे प्रकरणातील तक्रारदार व्यक्तीविरोधातच अनेक आरोप, हे प्रकरण गंभीरच नाही तर धक्कादायक, हनीट्रॅपचा प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणात नव्हता, कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही, सर्वंकष तपास व्हावा, विरोधीपक्षाने भान ठेवावे, आपणही सत्तेत असल्याचं ध्यानात ठेवावं, हमाम में सब नंगे है, याचं भान प्रत्येकानं ठेवावं, कोणीही आम्हाला नीतीमत्ता शिकवू नये, धनंजय मुंडेंना संरक्षण द्या, तातडीने राजीनामा घेऊ नका; संजय राऊतांची मागणी


  • 15 Jan 2021 02:44 PM (IST)

    महिलेने केलेल्या तक्रारीचं स्वरुप गंभीर, सत्य लवकर बाहेर यांव : शरद पवार

    राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार माध्यमांशी संवाद साधत आहेत.

    मी कालंच सांगितलं आहे की ही प्रश्न गंभीर आहे. महिलेने केलेल्या तक्रारीचं स्वरुप गंभीर आहे.

    याबाबतीत सर्व मिळून निर्णय घेण्यात येईल. काल या गोष्टीवर सविस्तर विचारविनिमय केला आहे.

    महिलेने तक्रार केल्यानंतर मीडियातून आणखी नवीन गोष्टी समोर आल्या आहेत.

    या प्रकरणावर पोलीस विभाग चौकशी करत आहेत. या बाबतीत आम्ही हस्तक्षेप करण्याचं कारण नाही. चौकशी करताना एखादी एसीपी लेव्हलची महिला अधिकारी त्यात असावी असं मला वाटतं. या  महिलेने मुंडेंसह इतरांची माहिती घेऊन वस्तुस्थिती पुढे आणावी आणि हे याबाबतीत सत्य समोर आणावं

    महिलेच्या बाबतीत भाजपच्या एका नेत्याने स्टेटमेंट दिलं आहे. यामध्ये काळजीपूर्वक चौकशी करावी असं त्यांनी सांगितलं.

    काही भाजप नेते आरोप करत आहेत. त्यांना टीका करायची असेल त्याबाबत माझं काही म्हणणं नाही. मात्र, वस्तिस्थिती समोर यावी असं आमचं म्हणणं आहे.

     

    काल मी या प्रकरणावर बोललो तेव्हा संपूर्ण चित्रं माझ्यासमोर नव्हतं. एखाद्या भगिनीने तक्रार केल्यावर तिची दखल घेतली. त्यामुळे गंभीर हा शब्द वापरला
    आता सर्व चौकशी करावी आणि कुणावरही अन्याय होऊ नये असं वाटतं

    मुंडे यांचा राजीनामाचा  घ्यावा किंवा नाही. यावर मतभिन्नता असू शकते. आरोप करणाऱ्या महिलेच्या बाबतीत एकापेक्षा एक अधिक गोष्टी पुढे आल्यानंतर त्यातील सत्यता समोर आली पाहिजे. नाही तर कुणावरही आरोप करायचे आणि त्या व्यक्तीला सत्तेपासून दूर करायचं अशी प्रथा पडू शकते. त्यामुळे या घटनेतील सत्य समोर यायला व्हावं.

    गुन्हा दाखल करण्याचं काम पोलिसांचं आहे. पोलिसांनी या प्रकरणात खोलात जाऊन तपास करावा. जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही. या आरोपामधील सत्य बाहेर आल्यावर निर्णय घेता येईल. आरोप झाल्यावर संयम ठेवावा लागतो. सत्यता बाहेर येईपर्यंत थांबावं लागतं.

    शपथपत्रात मुंडेंनी माहिती लपवली की नाही हे पाहावं लागेल. देशात अशा अनेक गोष्टी झालेल्या आहेत. देशातील सर्वोच्च प्रमुखांच्याबाबतीतही अशा गोष्टी झाल्या आहेत. त्याच्या खोलात जायची गरज नाही. मात्र सत्ता हातातून गेल्याने काही जण अस्वस्थ आहेत.

     

  • 15 Jan 2021 01:43 PM (IST)

    रेणू शर्मा 3 वाजता माध्यमांशी बोलणार, मोठे खुलासे करण्याची शक्यता

    मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या महिला रेणू शर्मा आज (15 जानेवारी) मध्यमांशी संवाद साधणार आहेत. ठीक तीन वाजता त्या माध्यमांसमोर येतील. यावेळी त्या धनंजय मुंडे यांच्यावर केलेले बलात्काराचे आरोप आणि त्यांच्याविरोधातील तक्रार यावर बोलणार आहेत. यावेळी त्यांच्यावर केलेल्या हनी ट्रॅपच्या आरोपावरही त्या बोलण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

  • 15 Jan 2021 01:19 PM (IST)

    मुंडे यांची ही खासगी बाब; पण शरद पवार जाणते नेते, ते योग्य निर्णय घेतील : विनायक मेटे

    सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची ही खासगी बाब असल्याचे शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी म्हटलंय. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे जाणते नेते आहेत. ते योग्य निर्णय घेतील असेही ते म्हणाले. “हा अकस्मातपणे पुढे आलेला विषय आहे. ही धनंजय मुंडे यांची खाजगी बाब असली तरी पक्षांनं निर्णय घ्यावा. शरद पवार जाणते नेते आहेत. ते या प्रकरणी योग्य निर्णय घेतील,” असे विनायक मेटे म्हणाले.

  • 15 Jan 2021 01:04 PM (IST)

    कायद्यापुढे कोणीही मोठा नाही, चौकशी करुन कारवाई करु : अनिल देशमुख

    धनंजय मुंडे बलात्कार आरोप प्रकरणावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “कायदा कुणावरही भेदभाव करणार नाही. या प्रकरणावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. कायद्यापुढे मंत्री मोठा नाही आणि संत्रीही नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. चौकशीतून जे काही पुढे येईल त्यानुसार कारवाई करण्याती येईल,” असं अनिल देशमुख म्हणाले.

  • 15 Jan 2021 11:23 AM (IST)

    धनंजय मुंडे यांच्या मेव्हण्याची रेणू शर्मा यांच्याविरोधात तक्रार

    बीड : धनंजय मुंडे यांचे मेव्हणे  पुरुषोत्तम केंद्रे यांनी रेणू शर्मा यांच्याविरोधात तक्रार नोव्हेंबरमध्य तक्रार दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. ब्लॅकमेलिंक करणे, त्रास देणे अशा प्रकारचा त्रास रेणू शर्मा यांच्याकडून दिला जात होता, असं केंद्रे यांनी अपल्या तक्रारीत म्हटलंय.

  • 15 Jan 2021 10:38 AM (IST)

    धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करण्याआधी भाजपने आधी स्व:तकडे बघावं : सुनील केदार

    “धनजंय मुंडे यांच्यावर जे आरोप झाले आहेत त्यावर चौकशी सुरु आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागताना भाजपने स्व:तकडे बघावं. भाजप आमदार राम कदम यांनी केलेलं वक्तव्यही त्यांनी बघावं,” असा टोला पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी भाजपला लगावला. तसेच त्यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबत पोलीस चौकशी सुरु असल्याचं त्यांनी म्हटलंय.

  • 15 Jan 2021 10:24 AM (IST)

    धनंजय मुंडेंवरच्या आरोपांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही : किरीट सोमय्या

    मुंबई: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंड यांचा राजीनामा तूर्तास न घेण्याची भूमिका घेतल्यामुळे विरोधकांकडून टीका होतेय. “सगळं शरद पवार यांचं नाटक आहे. रेणू शर्मा यांच्यावर कोणतेही आरोप होऊ देत. पण त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

  • 15 Jan 2021 09:42 AM (IST)

    महिलेला ब्लॅकमेलिंग करण्याची सवय असल्याचे प्रतिबिंबित होतेय : जयंत पाटील

    “ज्या महिलने धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत. त्या महिलेवर इतर दोन नेत्यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप केलेले आहेत. त्यावरुन या महिलेला ब्लॅकमेलिंग करण्याची सवय असल्याचे प्रतिबिंबित होत आहे. भाजपच्या एका माजी आमदाराने त्याविषयी स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे महिलेने केलेल्या आरोपांची चौकशी व्हायला हवी. सत्य बाहेर आल्यानंतर आम्ही कारवाई करु,”  असे जयंत पाटील म्हणाले.

  • 15 Jan 2021 08:04 AM (IST)

    धनंजय मुंडे यांना पक्षाकडून दिलासा, तुर्तास राजीनामा नाही

    मुंबई : बलात्काराचे गंभीर आरोप झालेल्या सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर पक्षीय पातळीवर निर्णय घेण्यासाठी आज (15 जानेवारी) राष्ट्रवादीने मुंबईत बैठक घेतली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. रेणू शर्मा या महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत हे खरे आहे. मात्र, त्याच ही महिला ब्लॅकमेलिंग करत असल्याची बाब समोर आली असल्याची चर्चा या बैठकीत झाली. त्यामुळे सध्यातरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, असा निर्णय पक्षाने घेतला आहे.

  • 15 Jan 2021 07:00 AM (IST)

    राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक

    राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निवासस्थानी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. या बैठकीत धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका मांडली आणि पक्ष पूर्णपणे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभा असल्याचं दिसून आलं.