धनंजय मुंडे म्हणाले, उठ पार्था तुझ्याशिवाय पर्याय नाही, आता पार्थ पवार म्हणतात……

पुणे: मावळ लोकसभा मतदारसंघात सध्या एक नाव चर्चेत आहे, ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचं. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये पार्थ पवार मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मावळमधील सभेत तसे संकेतही दिले. “माझी एक विनंती आहे, माझी व्यक्तीगत […]

धनंजय मुंडे म्हणाले, उठ पार्था तुझ्याशिवाय पर्याय नाही, आता पार्थ पवार म्हणतात......
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:30 PM

पुणे: मावळ लोकसभा मतदारसंघात सध्या एक नाव चर्चेत आहे, ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचं. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये पार्थ पवार मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मावळमधील सभेत तसे संकेतही दिले.

“माझी एक विनंती आहे, माझी व्यक्तीगत विनंती आहे, महाभारतामध्ये सुद्धा एकदा प्रश्न असा झाला, की श्रीकृष्णाला सुद्धा म्हणावं लागलं अर्जुनाला म्हणजे पार्थाला की आता उठ पार्था तुझ्याशिवाय पर्याय नाही. आपल्यासाठी, मावळसाठी अजितदादांनी स्वत:ला झिजवलंय. त्याची परतफेड करण्याची वेळ आहे, तर या परिवर्तनामध्ये आपले आशीर्वाद द्या”, असं धनंजय मुंडे म्हणाले. धनंजय मुंडे यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थित सभेत एकच जल्लोष झाला.

पार्थ पवार यांची प्रतिक्रिया याबाबत पार्थ पवार म्हणाले, “मला असं वाटतं मावळमध्ये मला पहिली दोन वर्ष काम करायला पाहिजे. लोकांना भेटून इथली परिस्थिती, अडचणी नीट समजून घ्यायला हवं. त्यानंतर माझा निवडणुकीला उभं राहायचा प्लॅन होता. पण तुम्ही आताच या असा लोकांचा आग्रह आहे. मी जर उभं राहिलो तर सगळे एकत्र येतील, काय हरकत नाही. दादांचं म्हणणं आहे की तू आला तरच सीट येणार. त्यामुळे बघूया, पक्ष काय म्हणतोय. मावळमध्ये मला उभा राहायचंच आहे असं माझं काही नक्की नाही. पुढच्या इलेक्शनला उभा राहिलो तरी चालतंय. माझा एकच मुद्दा आहे की इकडचे मुद्दे समजून घ्यायचे आहेत. लोकांना भेटायचे आहेत, इथे विकास कसा आणायचा त्यापद्धतीने मला काम करायचं आहे.

श्रीरंग बारणे यांची प्रतिक्रिया

दरम्यान, मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे प्रतिनिधीत्व करतात. पार्थ पवार यांच्या उमेदवारीच्या चर्चेबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली. पार्थ पवारची ओळख अजितदादाचा पुत्र म्हणून आहे. श्रीरंग बारणेंची ओळख आज जनमाणसांमध्ये काम करणारा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. पार्थ पवारला स्वत:ची ओळख करुन देण्यासाठी बॅनरवरती झळकावं लागतंय. श्रीरंग बारणेंची ओळख सर्वसामान्यांमध्ये काम करणारा खासदार अशी आहे. माझ्या दृष्टीने कोण पार्थ पवार हा विषय आहे. मावळ मतदारसंघात पार्थ पवार आला किंवा दुसरा कुणी पवार आला, तरी मला फरक पडणार नाही. शिवसेनेचा उमेदवार म्हणून या मतदारसंघात मीच निवडणूक लढवणार, असं श्रीरंग बारणे म्हणाले.

VIDEO:

संबंधित बातम्या 

मावळ लोकसभा : पार्थ पवारांच्या नुसत्या नावाने भल्याभल्यांची सपशेल माघार    

लोकसभेसाठी पार्थ पवारसह 21 जणांची यादी, राष्ट्रवादी म्हणते…    

राष्ट्रवादीचा अंतर्गत सर्व्हे, लोकसभेच्या ‘या’ 10 जागा जिंकण्याची खात्री  

कोण पार्थ पवार? मी नाही ओळखत, पुढचा खासदार मीच : श्रीरंग बारणे 

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.