भाजपचे नेते केंद्र सरकारच्या तपास संस्थांमध्ये हस्तक्षेप करुन चौकशा लावतात : धनंजय मुंडे

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपवर सडकून टीका केलीय. भाजपचे नेते ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स अशा अनेक केंद्र सरकारच्या संस्थांमध्ये हस्तक्षेप करुन विरोधी नेत्यांच्या चौकशा लावते, असा गंभीर आरोप धनंजय मुंडे यांनी केला

भाजपचे नेते केंद्र सरकारच्या तपास संस्थांमध्ये हस्तक्षेप करुन चौकशा लावतात : धनंजय मुंडे
Follow us
| Updated on: Sep 02, 2021 | 5:24 PM

अहमदनगर : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपवर सडकून टीका केलीय. भाजपचे नेते ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स अशा अनेक केंद्र सरकारच्या संस्थांमध्ये हस्तक्षेप करुन विरोधी नेत्यांच्या चौकशा लावते, असा गंभीर आरोप धनंजय मुंडे यांनी केला. सुरुवातीपासूनच भाजपकडून अतिशय बदल्याचं राजकारण केलं जातंय. हे केवळ महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण देशाला कळून चुकलं आहे, असाही आरोप मुंडेंनी केला. ते आज (2 सप्टेंबर) अहमदनगरमध्ये आले असताना पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देत होते.

धनंजय मुंडे म्हणाले, “सुरुवातीपासूनच अतिशय बदल्याचं राजकारण केलं जात आहे हे केवळ महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण देशाला कळून चुकलं आहे. भाजपचे अनेक नेते केंद्र सरकारच्या तपास संस्थांमध्ये हस्तक्षेप करुन चौकशा लावत आहेत. त्यामुळे खरं काय हे सर्वांच्या समोर येणार आहे. सीबीआय प्रकरणात अनिल देशमुख यांना क्लिन चीट दिल्याचं स्पष्ट झालंय. खरं काहीच नाही, गृहमंत्री राहिलेल्या व्यक्तीलाही बदनाम करण्याचा प्रकार सुरू आहे. हे भाजपचं ठरलेलं तंत्र आहे.”

“कायदा-नियमाला धरुन सर्व बदल्या”

“30-30 वर्षे अधिकारी एकाच ठिकाणी काम करत असतील तर त्यांची बदली व्हायला पाहिजे हे स्वाभाविक आहे. कायदा-नियमाला धरुन सर्व बदल्या केल्यात,” असं सांगत धनंजय मुंडे यांनी मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या बदल्याच्या निर्णयाचं समर्थन केलं.

भाजप नेते किरिट सोमय्या यांनी चौकशीचा पूढचा नंबर जितेंद्र आव्हाड यांचा असल्याचं वक्तव्य केलं. त्यावर बोलताना धनंजय मुंडे यांनी कुणाला किती गांभीर्याने घ्यायचं हे माहिती आहे असं म्हणत सोमय्या यांना टोला लगावला.

“नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक”

धनंजय मुंडे म्हणाले, “राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. काही ठिकाणी पूर आला म्हणून नुकसान झालं. याबाबत कालच मंत्रिमंडळात चर्चा झाली आहे. प्राथमिक किती नुकसान झालं हे आम्हाला सांगितलं आहे. मात्र, वास्तविक किती नुकसान झालं याचा अहवाल यायला दोन-तीन दिवस लागतील, पण जे काही नुकसान झाले त्याबाबत भरपाई देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे.”

हेही वाचा :

बीड जिल्ह्यात मुसळधार; पालकमंत्री मुंडेंकडून 24 तास सतर्क राहण्याच्या जिल्हा प्रशासनाला सूचना

VIDEO : एकाच व्यासपीठावर शेजारी बसले, ना एकमेकांकडे पाहिलं, ना बोलले, भाषणाची वेळ येताच जोरदार टोलेबाजी!

‘ओबीसींचं आरक्षण वाचवा, अन्यथा उद्रेक होईल’, पंकजा मुंडेंचा महाविकास आघाडी सरकारला इशारा

व्हिडीओ पाहा :

Dhananjay Munde say BJP leaders interfering in CBI ED for action on opposition

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.