उस्मानाबाद: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आज पक्षाच्या मेळाव्यानिमित्त आज उस्मानाबाद दौऱ्यावर होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) मंत्री राजेश टोपे, धनंजय मुंडे (Dhananjay Munde) उपस्थित होते. धनंजय मुंडे यांनी यावेळी विविध मुद्यांवर भाष्य केलं. जगाला खऱ्या लोकशाहीचे दर्शन कुणी घडवून दाखवले असेल तर आदरणीय पवार साहेबांनी जगाला दाखवलं. 64 आमदारांचे मुख्यमंत्री झाले 54 आमदारांचे उपमुख्यमंत्री झाले. 44 आलेले मंत्री झाले आणि 105 वाले विरोधी पक्षात बसले आहेत. नगरपंचायत निवडणुकीत सर्वाधिक नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झाले आहेत मात्र भाजपच्या अंगातला माज अजूनही गेलेला नाही, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून करण्यात येणाऱ्या कारवायांवरुन धनंजय मुंडे यांनी त्यांच्या खास शैलीत टीका केली आहे.
भाजपच्या अंगातला माज अजूनही गेलेला नाही, होत्याच नव्हतं नव्हत्याचं केलं तरी भल्या भल्यांच्या मागे इन्कम टॅक्स काय ईडी काय सुरु आहे. ईडीची तर इज्जत ठेवली नाही ईडी पेक्षा शेतकऱ्यांच्या खिशातल्या गणेश बिडी तिची किंमत जास्त आहे. त्यांना वाटतंय की आम्ही यांना झुकवू शकतो. भाजपची खरी जिरवायची असेल तर जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरचा पक्ष दाखवून द्या. पुन्हा म्हणून भाजप कधीही महाराष्ट्राच्या मातीत अशा प्रकारचा नाद करणार नाही, असा विश्वास असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले.
संविधानाने आपल्याला अधिकार लिहायचा बोलायचा अधिकार दिलाय. पण, संविधान पायदळी तुडवायच काम सुरु आहे. महाराष्ट्रातील सर्वोच्च संविधानिक पदावर बसलेला माणूस छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय बोलतो. ज्यांना आम्ही देव मानतो त्या विचारावर वार करायचा प्रयत्न केला तर आम्ही शांत बसणार नाही. शरद पवार यांनी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यास रयतेचे राज्य म्हणून अभिप्रेत राज्य केलं. आपल्या संबंध जिवनात पवार साहेबांनी 55 वर्षात सर्वसामान्य कार्यकर्त्यांना हिऱ्याची किंमत दिली आहे. जर, पवार साहेबांनी मला जर विरोधी पक्षनेता केलं नसत तर कदाचित मी राजकारणात दिसलो नसतो, असंही धनंजय मंडे म्हणाले. पवार साहेबांनी मागासवर्गीय समाजाला खुल्या मतदारसंघात निवडणूक लढवून आमदार करून बाबासाहेबांचे समतेचे स्वप्न पूर्ण केले असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले.
निवडणूक व्हायच्या अगोदर काहींनी सांगितलं मी येणार मी येणार, आम्ही काय येऊन देतो का? : शरद पवार