VIDEO: मी कच्च्या गुरुचा चेला नाही आणि धनंजय मुंडेंनी मध्येच भाषण थांबवले!

| Updated on: Apr 13, 2021 | 7:23 PM

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने विरोधकांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. (dhananjay munde slams devendra fadnavis in pandharpur rally)

VIDEO: मी कच्च्या गुरुचा चेला नाही आणि धनंजय मुंडेंनी मध्येच भाषण थांबवले!
dhananjay munde
Follow us on

पंढरपूर: पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने विरोधकांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्याचा आज मुंडे यांनी समाचार घेतला. मी कच्च्या गुरुचा चेला नाही. नाद करायचा नाही, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी विरोधकांना फटकारलं. यावेळी भाषण सुरू असतानाच नमाज सुरू झाल्यानं मुंडे यांनी नमाज संपेपर्यंत भाषण थांबवलं होतं. (dhananjay munde slams devendra fadnavis in pandharpur rally)

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या निवडणूक प्रचारासाठी धनंजय मुंडे आले होते. यावेळी एका जनसभेला संबोधित करताना मुंडे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी भाजपचे नेते लक्ष्मण ढोबळे यांच्यावरही नाव न घेता शरंसधान साधलं. मी कच्चा गुरुचा चेला नाही. कोणाचीही पावसात सभा झाली की यांची धसकी भरते. मी कासेगावच्या सभेत सांगितले होते, मायच्यानं कोणाचाही नाद करा, पण पवार साहेबांचा नाद करु नका. पण नाद केल्याशिवाय त्यांना रहावत नाही. टीका करायचे विरोधकांचे काम आहे. लोकशाहीचा आदर करणारे आम्ही कार्यकर्ते, आम्हाला लोकशाही शिकवता. होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं पवार साहेबांनी करुन दाखवलं, असा घणाघात मुंडे यांनी केला. पवार साहेबांनी 2019च्या निवडणुकीत खऱ्या लोकशाहीचं दर्शन घडवलं होतं. हे विसरु नका, असा इशाराही त्यांनी दिला.

वळवळ करणाऱ्यांना रिंगण दाखवा

आजचा दिवस माझ्या आयुष्यात का यावा? पंढरपूरच्या पांडुरंगाला मी प्रश्न विचारतो. माझ्या जीवनातील सर्वात मोठी सभा नानांच्या (भारत भालके) उपस्थितीत पार पडली. त्यावेळीच मी संगितलं होतं, नाना हॅट्रिक करणार ते. नानांचं आणि माझं नातं हे वडील-मुलाचं होतं. मी आशीर्वाद द्यायला नाही. तर भगीरथसाठी आशीर्वाद मागायला अलोय. भाजपने इथलं राजकारण खालच्या पातळीवर नेले आहे. पोटनिवडणूक लागल्यावर विरोधात उमेदवार देण्याचं पाप यांनी केलं. लाखोंच्या संख्येने कोरोनाचे पेशंट समोर येतायत. अशा परिस्थितीत ही निवडणूक लागायला नको होती. वारकरी संप्रदायात या गावाचं वेगळं स्थान आहे. त्यामुळे 17 तारखेला वळवळ करणाऱ्याला चांगलं रिंगण दाखवायचं आहे, असंही ते म्हणाले.

अन् भाषण थांबवलं

मुंडे यांचं घणाघाती भाषण सुरू होतं. मतदारांनीही प्रचंड गर्दी केली होती. त्यांच्या प्रत्येक वाक्यागणिक टाळ्या पडत होत्या. लोकांमध्ये प्रचंड जल्लोष होता. इतक्यात नमाज सुरू झाली. त्यामुळे मुंडे यांनी तात्काळ आपलं भाषण थांबवलं. नमाज संपेपर्यंत ते माईकजवळ उभे राहिले. नमाज संपताच त्यांनी पुन्हा जोरदार बॅटिंग करत भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं.

भगीरथच पाणी आणेल

तुमचं सरकार असताना पाच वर्षे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी घसा कोरडा करावा लागला. आमचं सरकार येताच आम्ही कर्जमाफी केली, असं सांगतानाच नानांचं जेजे अधूरं स्वप्न आहे. ते आम्ही पूर्ण करणार. प्राचीन इतिहासात भगीरथनेच गंगा आणली होती. आता या 35 गावातही भगीरथच पाणी आणेल, असंही ते म्हणाले. (dhananjay munde slams devendra fadnavis in pandharpur rally)

 

संबंधित बातम्या:

फडणवीसांचा सभांचा धडाका; भाजपलाही पंढरपुरात पावसाच्या चमत्काराची आस!

आता देवेंद्र फडणवीसांच्या सभेत पाऊस आणि वादळ, ठाकरे सरकारवर बरसले

VIDEO: भाद्रपद महिन्यातल्या कुत्र्याला देखील लाज वाटते, पण धनंजय मुंडेला नाही; ढोबळेंचा घणाघात

(dhananjay munde slams devendra fadnavis in pandharpur rally)