धनंजय मुंडे यांनी लेकीला काय समजावून सांगितलं? प्रजासत्ताक दिनानिमित्त video तुफ्फान व्हायरल
अपघातग्रस्त झाल्यानंतर धनंजय मुंडे यांचे रुग्णालयातील काही व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यानंतर ते घरी विश्रांती घेत आहेत.
बीडः प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा एक व्हिडिओ तुफ्फान व्हायरल होतोय. मराठवाड्यातील हे लोकप्रिय नेते सध्या अपघातानंतर (Accident) त्यांच्या परळी येथील घरी विश्रांती घेत आहेत. आज प्रजासत्ताक दिन आहे. हा दिवस नेमका का साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिन साजरा करायला सुरुवात होण्यापूर्वी काय घडलं होतं, याची पार्श्वभूमी धनंजय मुंडे यांनी मुलीला समजावून सांगितली. धनंजय मुंडे यांचा अपघात झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून ते मुंबईत उपचार घेत होते. डिश्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी टाकलेला हा पहिलाच व्हिडिओ आहे.
अपघातामुळे सध्या घरी विश्रांती घेत असताना माझी मुलगी आदीश्रीसोबत गप्पा मारायला वेळ मिळतो आहे. प्रजासत्ताक दिनाबद्दलच्या तिच्या प्रश्नाचे समाधान केले. राजकीय व सामाजिक कार्याच्या गडबडीतील आयुष्यात असे क्षण आनंद देऊन जातात. #RepublicDay pic.twitter.com/HYWu73xEQa
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 25, 2023
व्हिडिओत काय सांगतात?
धनंजय मुंडे लेकीला सांगतात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशातली कॉन्सिट्यूशन अर्थात घटना नोव्हेंबर महिन्यात बनवली. मग ती सरकारने स्वीकारली. २६ जानेवारीपासून घटना आपल्या देशात अंमलबजावणी करायला सुरुवात झाली. त्यामुळे तेव्हापासून २६ जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो…
अपघातानंतर प्रथमच…
अपघातग्रस्त झाल्यानंतर धनंजय मुंडे यांचा रुग्णालयातील काही व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यानंतर ते घरी विश्रांती घेत आहेत. या काळातील हा पहिलाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात ते बेडवर विश्रांती घेतानाच मुलीशी संवाद साधताना दिसत आहेत. त्यांचा वेगळा लूकही या व्हिडिओ पहायला मिळतोय..
कधी झाला अपघात?
माजी मंत्री आणि बीडचे नेते धनंजय मुंडे यांच्या कारला ४ जानेवारी रोजी भीषण अपघात झाला. त्यांच्या मूळ गावात परळी येथे रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. या घटनेत त्यांच्या गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला होता. घटनेत धनंजय मुंडे यांच्या छाती, बरगड्या तसेच डोक्याला मार लागला होता. त्यानंतर त्यांना मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात हलवण्यात आलं होतं.
मुंबईत उपचार घेणाऱ्या धनंजय मुंडे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून विरोधी पक्ष नेते अजित पवार, सुप्रिया सुळे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही भेट देऊन त्यांची चौकशी केली होती. या राजकीय गाठी भेटींचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.