शरद पवारांनी दखल न घेतल्याने नाराजी, डॉ. धवलसिंह मोहिते पाटील सपत्नीक काँग्रेसमध्ये

डॉ. धवलसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. (Dhawalsinh Mohite Patil Sharad Pawar)

शरद पवारांनी दखल न घेतल्याने नाराजी, डॉ. धवलसिंह मोहिते पाटील सपत्नीक काँग्रेसमध्ये
शरद पवार आणि धवलसिंह मोहिते पाटीव
Follow us
| Updated on: Jan 27, 2021 | 10:58 AM

पंढरपूर : भाजप नेते विजयसिंह मोहिते पाटील (Vijaysinh Mohite Patil) यांचे पुतणे डॉ. धवलसिंह मोहिते पाटील (Dhawalsinh Mohite Patil) उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. डॉ. धवलसिंह हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. मात्र राष्ट्रवादीने आपली दखल न घेतल्याची खंत व्यक्त करत धवलसिंह मोहिते पाटलांनी काँग्रेसचा हात हाती धरण्याचा निर्णय घेतला आहे. (Dhawalsinh Mohite Patil to join Congress unhappy with NCP Sharad Pawar)

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश होणार आहे. धवलसिंह मोहिते पाटील हे माजी सहकार मंत्री आणि दिवंगत नेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे ते उपाध्यक्ष आहेत. डॉ. धवलसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते.

धवलसिंह मोहिते दखल न घेतल्याने नाराज

विधानसभा निवडणुकीत धवलसिंह यांनी राष्ट्रवादीचे माळशिरस मतदारसंघाचे उमेदवार उत्तम जानकर यांचा प्रचारही केला होता. परंतु राष्ट्रवादीने आपली दखल घेतली नसल्याचे सांगत धवलसिंह काही महिन्यांपासून नाराज होते. पत्नी उर्वशीराजे मोहिते पाटील यांच्यासह काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती स्वतः धवलसिंह मोहिते पाटील यांनी दिली.

मोहिते पाटील पितापुत्र भाजपात

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून शरद पवार आणि पक्षासोबत असलेले माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीची साथ सोडली. रणजीतसिंह यांनी भाजपात प्रवेश केला, तेव्हा विजयसिंह मोहिते पाटीलही भाजपच्या मंचावर उपस्थित होते. भाजप देईल त्या उमेदवाराचं काम करणार असल्याचं विजयसिंहांनी लोकसभा निवडणुकीवेळी जाहीर केलं होतं. त्यामुळे लोकसभेपाठोपाठ विधानसभेलाही राष्ट्रवादीला माळशिरस तालुक्यात फटका बसला होता.

धवलसिंह मोहितेंच्या उमेदवारीची चर्चा फोल

सध्या डॉ. धवलसिंह मोहिते पाटील हे विजयसिंह आणि रणजितसिंह यांच्यापासून दूर आहेत. काका आणि चुलत बंधू भाजपात गेल्यानंतरही विधानसभा निवडणुकीत धवलसिंहांनी राष्ट्रवादीला मदत केली होती. त्यामुळे धवलसिंह मोहिते पाटील यांना पक्षात खेचण्यासाठी राष्ट्रवादीकडूनही प्रयत्न झाल्याचं बोललं जातं. धवलसिंह यांचं नाव राष्ट्रवादीकडून विधानपरिषद उमेदवारीसाठी चर्चेत होतं. (Dhawalsinh Mohite Patil to join Congress unhappy with NCP Sharad Pawar)

मोहिते पाटील घराण्याला काँग्रेसचा शह

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत मुंबईतील टिळक भवनमध्ये उद्या (गुरुवारी) दुपारी तीन वाजता पक्षप्रवेश होणार आहे. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या रुपाने सोलापूर जिल्ह्यात युवा चेहरा देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यांच्यासोबत जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते आणि माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांना मानणारे अनेक जुने जाणते कार्यकर्तेही पुन्हा काँग्रेसमध्ये येतील, अशी आशाही काँग्रेसच्या नेत्यांना आहे. मोहिते पाटील यांच्या घराण्यातील नेत्याला पक्षात घेऊन काँग्रेस भाजपला राजकीय शह देण्याच्या प्रयत्नात आहे.

संबंधित बातम्या :

विजयसिंह मोहिते पाटील यांना राजकीय शह, पुतणे धवलसिंह काँग्रेसच्या वाटेवर

निवडणूक लढणार नाही, भाजप देईल त्या उमेदवाराचं काम करणार : विजयसिंह मोहिते पाटील 

(Dhawalsinh Mohite Patil to join Congress unhappy with NCP Sharad Pawar)

Non Stop LIVE Update
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.