Dhule ZP by Election : भाजपला बहुमतासाठी 2 जागांची गरज, महाविकास आघाडीचं तगडं आव्हान
धुळे जिल्हा परिषदेच्या एकूण 56 जागांपैकी भाजपकडे 27 झागा आहेत. तर शिवसेनेकडे 2, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 3 आणि काँग्रेसकडे 6 जागा आहेत. बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपला दोन जागांची आवश्यकता आहे.
धुळे : जिल्हा परिषदेच्या 15 आणि पंचायत समितीच्या 30 जागांसाठी मतदान पार पडत आहे. धुळे जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता होती. जिल्हा परिषदेच्या एकूण 56 जागांपैकी भाजपकडे 27 झागा आहेत. तर शिवसेनेकडे 2, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 3 आणि काँग्रेसकडे 6 जागा आहेत. बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपला दोन जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे धुळे जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकणार असा दावा भाजप उमेदवार आणि गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्या कन्या धरती देवरे यांनी केलाय. (Dhule ZP, Panchayat Samiti by-election, BJP’s Dharti Deore and Congress MLA Kunal Patil face off)
भाजपला जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवण्यासाठी अवघ्या दोन जागांची आवश्यकता आहे. असं असतानाही त्या जागाही महाविकास आघाडी भाजपला मिळू देणार नाही, असा दावा काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीचे कार्याध्यक्ष आणि धुळे ग्रामीणचे आमदार कुणालपाटील यांनी केलाय. इतकंच नाही तर ज्या अपक्षांनी भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी पाठिंबा दिला होता ते देखील यावेळी भाजपचा पाठिंबा काढून घेतील, असंही कुणाल पाटील यांनी म्हटलंय.
मागील निवडणुकीत धुळे जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल
भाजप – 39 काँग्रेस – 7 शिवसेना – 4 राष्ट्रवादी – 3 अपक्ष – 3
ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर कुठल्या पक्षाच्या किती जागा कमी झाल्या?
भाजप – 12 काँग्रेस – 1 शिवसेना – 2
ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर कुठल्या पक्षाकडे किती आहेत जागा शिल्लक?
भाजप : 39 – 12 = 27 काँग्रेस : 7 -1 = 6 शिवसेना : 4 -2 = 2 राष्ट्रवादी : 3 अपक्ष : 3
जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाला बहुमतासाठी अवघ्या 2 जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे भाजपाचा विजयाचा मार्ग सोपा मानला जातो आहे. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि आणदार कुणाल पाटील यांनी दंड थोपटल्यानं जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करण्यात महाविकास आघाडीला यश येतं का? हे बुधवारी (6 ऑक्टोबर) स्पष्ट होणार आहे.
कोणत्या जिल्हा परिषदेतील किती जागांवर मतदान?
नागपुर जिल्हा परिषदेच्या 16 मतदारसंघांसाठी तर पंचायत समितीच्या 31 मतदारसंघांसाठी उद्या पोटनिवडणूक होत असून प्रशासनाने त्यासाठीची तयारी पूर्ण केलीय, तर धुळे जिल्हा परिषदेच्या 14 गट आणि 28 जागांसाठी पोटनिवडणूक पार पडत असून मंगळवारी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. दुसरीकडे पालघर जिल्हा परिषदेच्या 15 तर पंचायत समित्यांच्या 14 जागांसाठी मतदान होणार आहे. वाशिम जिल्हा परिषदेच्या 14 व पंचायत समितीच्या 27 गणांसाठी पोट निवडणुकी साठी मतदान होत आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या 14 आणि पंचायत समितीच्या 28 जागांसाठी ही पोटनिवडणूक होतेय.
इतर बातम्या :
हसन मुश्रीफांवर अजून एक गंभीर आरोप, घोटाळ्यात सतेज पाटलांनी मदत केल्याचा दावा!
दिल्लीत जाऊन साखर सम्राटांनी लॉबिंग केलं, सदाभाऊंचा आरोप; शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल
Dhule ZP, Panchayat Samiti by-election, BJP’s Dharti Deore and Congress MLA Kunal Patil face off