Raj Thackeray : राज ठाकरे भाजपचा अजेंडा राबवतायत, त्यांचं स्वतंत्र अस्तित्व धोक्यात- बाळासाहेब थोरात

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका कधी पार पडणार, यावरही त्यांना प्रश्न विचारण्यात आला.

Raj Thackeray : राज ठाकरे भाजपचा अजेंडा राबवतायत, त्यांचं स्वतंत्र अस्तित्व धोक्यात- बाळासाहेब थोरात
थोरातांची राज ठाकरेंवर टीकाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 29, 2022 | 11:09 AM

नवी दिल्ली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी टीका केली. राज ठाकरे हे भाजपचा (BJP) अजेंडा राबवत आहे, असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. भाजपकडून राज ठाकरेंवर जबाबदारी टाकण्यात आली आहे की काय? अशी शंका त्यांनी उपस्थित केली. मनसे आणि भाजप एकत्र आले, तर राज ठाकरे यांचं जे स्वतंत्र अस्तित्व आहे, ते संपलेलं दिसेल, असंही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. ते टीव्ही 9 मराठीच्या दिल्ली प्रतिनिधींसोबत बोलत होते. राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेच्या पार्श्वभूमीवर आणि भोंग्यांवरुन मनसेनं घेतलेल्लाय भूमिकेवर सध्या राज्यातील राजकारण ढवळून निघालंय. अशातच राज ठाकरेंवर आता बाळसाहेब थोरात यांनीही निशाणा साधत हल्लाबोल केलाय. मशिदींवरील भोंग्यांना हनुमान चालिसेनं उत्तर देण्याचा इशारा राज ठाकरेंनी दिला होता. मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी तीन मे पर्यंतचा अल्टिमेमही त्यांनी दिला होता. या सगळ्यावर भाष्य करताना बाळासाहेब थोरातांनी राज ठाकरेंच्या भूमिकेचा समाचार घेतलाय.

राज ठाकरेंवर थोरांतांची टीका

बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय, की…

राज ठाकरे यांची अलिकडची भाषणं, वक्तव्य पाहिली की एक गोष्ट लक्षात येते की, हा भाजपचा अजेंडा आहे. तो ते (राज ठाकरे) राबवत आहेत. आणि समाजात मतभेद निर्माण करणं, जातीय भेद निर्माण करणं, वातावरण गढूळ करणं, धर्माधर्मात दरी निर्माण करणं, अशी जबाबदारी भाजपनं त्यांच्यावर टाकली असावी असं एकंदर मला वाटतं. ते (भाजप आणि मनसे) एकत्र आले तर राज ठाकरेंचं जे स्वतंत्र व्यक्तीमत्व जे होतं, हे संपलेलं दिसेल!

आणखी काय म्हणाले?

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका कधी पार पडणार, यावरही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर थोरातांनी पावासाळ्यात निवडणूक होण्याची कोतीही शक्यता नसल्याचं म्हटलंय. पण सर्वोच्च न्यायालयाने जर म्हटलं तर निवडणूक घ्यावी लागेल, असं मत त्यांनी व्यक्त केलं. सोबत किरीट सोमय्या यांना आपण का महत्त्व देतोय, असा प्रश्न आता जनतेलाही वाटत असल्याचही ते म्हणालेत.

राज ठाकरे काय प्रत्युत्तर देणार

थोरात यांनी केलेल्या टीकेला आता राज ठाकरे काय प्रत्युत्तर देतात, हे पाहणं महत्त्वाचंय. खरंच मनसे आणि भाजप एकत्र येणार का? असा प्रश्न सातत्यानं उपस्थित केला जातो. त्यावर राज ठाकरे औरंगाबादच्या सभेत काही भूमिका स्पष्ट करतात का, याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय. दरम्यान, बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर पोलिसांकडून राज ठाकरेंच्या सभेला अटीशर्थींसह परवानगी देण्यात आली आहे. 1 मे रोजी होणाऱ्या राज ठाकरकेंच्या सभेकडे सगळ्यांचीच नजर लागली आहे.

पाहा व्हिडीओ :

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.