Sharad Pawar : आषाढी एकादशीचा उपवास केलात का? शरद पवारांनी दिले हे उत्तर
मी सुद्धा पुजेला जात होतो. गेलेलो आहे. पण, त्याचं राजकारण केले नाही. प्रसिद्धी केली नाही. आषाढी एकादशीला अनेकांनी पूजा केली आहे. त्यात मीही होतो, असंही पवार यांनी सांगितलं.
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आज दिलखुलास चर्चा केली. यावेळी एक प्रश्न त्यांना विचारण्यात आला. तुम्ही नास्तिक असल्याची चर्चा आहे. पण, तुम्ही कधी उपवास (fast) केला आहे का, यावर शरद पवार यांनी हसून उत्तर दिलं. हो, केला आहे. त्यानंतर एकच हशा पिकला. शरद पवार म्हणाले, सकाळी वड्याचा भात खाल्ला. भगर खाल्ला. बघू म्हटलं उपवास एखाद्या दिवशी काय असते. मी तुमच्याशी गप्पा मारायला आल्याचं ते म्हणाले. राज्यात आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाची महापूजा (darshan of Vitthal) केली जातेय. शरद पवार म्हणाले, मी स्वतः मुख्यमंत्री म्हणून महापूजा (Mahapuja) केली आहे. एकदा नाही, तर चारही महापूजा केली. ती राज्याची परंपरा आहे. मी आस्तीक की नास्तीक हे महत्वाचं नाही.
मी सुद्धा पुजेला जात होतो
शरद पवार पुढं म्हणाले, या राज्यात सर्वसामान्य कामाधंद्याचा माणूस विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातो. भाविकांचा त्यामध्ये सहभाग आहे. पंढरीच्या प्रती भाविकांचं प्रेम आहे. त्याचा आदर राखला पाहिजे. त्यामुळं मी स्वतः विचारानं वेगळा असलो, तरी वारकऱ्यांचा सन्मान ठेवायचो. मी सुद्धा पुजेला जात होतो. गेलेलो आहे. पण, त्याचं राजकारण केले नाही. प्रसिद्धी केली नाही. आषाढी एकादशीला अनेकांनी पूजा केली आहे. त्यात मीही होतो, असंही पवार यांनी सांगितलं.
कार्यकर्त्यांना कामाला लागा म्हणालो होतो
दोन – अडीच वर्षात कसा निर्णय घेतात ते पाहुया. निवडणुकीत जास्तीत-जास्त मतदान कसं घेता येईल, यासाठी प्रयत्न करणार आहोत. हे सरकार किती वर्षे टिकेल, काही सांगता येत नाही. मी तयारीला लागा, असं कार्यकर्त्यांना म्हणालो होतो. राज्यात मध्यवधी निवडणुका होतील, असं म्हणालो नव्हतो, असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिलं.
देशात लोकशाही संपविण्याचा प्रयत्न होतोय
देशात आधी कर्नाटकात विरोधकांना फोडण्याचं काम झालं. मध्यप्रदेशातही तेच झालं. आता महाराष्ट्रात आणि गोव्यात विरोधकांना फोडण्याचं काम सुरू आहे. लोकशाही संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळं चुकीचा पायंडा निर्माण होत असल्याची टीका शरद पवार यांनी केली. यावेळी त्यांनी हसतखेळत पत्रकारांशी गप्पा केल्या. विविध विषयांवर आपली मतं मांडली.