भाजपला मेटाकुटीला आणणाऱ्या 40 जागा कोणत्या?

प्रत्यक्षात भाजपच्या सत्तास्थापनेच्या मार्गात अजूनही 40 अडथळे असल्याचं चित्र आहे. 288 पैकी 40 जागा अशा आहेत, ज्यावर खऱ्या अर्थानं भाजपचं भवितव्य ठरणार आहे.

भाजपला मेटाकुटीला आणणाऱ्या 40 जागा कोणत्या?
Follow us
| Updated on: Oct 22, 2019 | 10:59 AM

मुंबई : एक्झिट पोलच्या आकड्यांवरुन महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपची सत्ता येणार, असे संकेत मिळत आहेत. पण 288 पैकी 40 जागा भाजपचं भवितव्य ठरवणाऱ्या आहेत. राज्यात पुन्हा भाजपची सत्ता येणार की नाही? हे या चाळीस जागांच्या निकालावर अवलंबून आहे. भाजपचं भवितव्य ठरवणारे हे 40 मतदारसंघ (Difficult Seats for BJP) कोणते आहेत, हे जाणून घेणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

एक्झिट पोलमधून पुन्हा एकदा युतीच्या बाजून कौल देण्यात आला आहे. पण, प्रत्यक्षात भाजपच्या सत्तास्थापनेच्या मार्गात अजूनही 40 अडथळे असल्याचं चित्र आहे. 288 पैकी 40 जागा अशा आहेत, ज्यावर खऱ्या अर्थानं भाजपचं भवितव्य ठरणार आहे.

भाजप 288 जागांपैकी 164 जागा लढवत आहे. यातील जवळपास 122 जागांवर विजयाची भाजपला आशा आहे. पण यातील 40 जागा अशा आहेत, ज्यात भाजपला प्रतिस्पर्ध्यांकडून कडवं आव्हान मिळालं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यासाठी प्रचारात जंग जंग पछाडलं. पण, तरीही त्यांच्या परिपूर्ण विजयात काही मतदारसंघ कमी पडत असल्याचं चित्रं आहे. काही मतदारसंघात भाजपला प्रतिस्पर्ध्यांकडून कडवं आव्हान मिळाल्याचं चित्रं आहे. अशी तब्बल 40 मतदारसंघाची यादी (Difficult Seats for BJP) आहे.

भाजपला जेरीस आणणारे 40 मतदारसंघ आणि उमेदवार

नवापूर, नंदुरबार – भरत गावित (काँग्रेसमधून आयात) धुळे ग्रामीण, धुळे – ज्ञानज्योती बदाणे पाटील (विरोधात काँग्रेस आमदार कुणाल पाटील) शिरपूर, धुळे – काशिराम पावरा (काँग्रेसमधून आयात) चिखली, बुलडाणा – श्वेता महाले (भाजप) (विरोधात काँग्रेस आमदार राहुल बोंद्रे) अकोट, अकोला – प्रकाश भारसाकळे (विद्यमान आमदार) अकोला पश्चिम, अकोला – गोवर्धन शर्मा (विद्यमान आमदार) वाशिम, वाशिम – लखन मलिक (विद्यमान आमदार) धामणगाव रेल्वे, अमरावती – प्रताप अरुण अडसड दर्यापूर, अमरावती – रमेश बुंदिले (विद्यमान आमदार) काटोल, नागपूर – चरण सिंह ठाकूर (विरोधात राष्ट्रवादीचे अनिल देशमुख) सावनेर, नागपूर – राजीव पोतदार (विरोधात काँग्रेस आमदार सुनील केदार) नागपूर उत्तर, नागपूर – डॉ. मिलिंद माने (विद्यमान आमदार) कामठी, नागपूर – टेकचंद सावरकर (चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जागी तिकीट) साकोली, भंडारा – परिणय फुके (विरोधात काँग्रेसचे नाना पटोले) राजुरा, चंद्रपूर – संजय धोटे (विद्यमान आमदार) यवतमाळ, यवतमाळ – मदन येरावार (विद्यमान आमदार) वणी, यवतमाळ – संजीव रेड्डी बोदकुलवार (विद्यमान आमदार) पुसद, यवतमाळ – निलय नाईक (विरोधात राष्ट्रवादीचे इंद्रनिल मनोहर नाईक) भोकर, नांदेड – बापूसाहेब गोर्टेकर (विरोधात काँग्रेसचे अशोक चव्हाण) औरंगाबाद पूर्व, औरंगाबाद – अतुल सावे (भाजप) (विद्यमान आमदार) नाशिक पश्चिम, नाशिक – सीमा हिरे (विद्यमान आमदार) (विरोधात राष्ट्रवादीचे अपूर्व हिरे) डहाणू, पालघर – पास्कल धनारे (भाजप) (विरोधात माकपचे विनोद निकोले) मालाड पश्चिम, मुंबई – रमेश सिंग ठाकूर (विरोधात काँग्रेस आमदार अस्लम शेख) वर्सोवा, मुंबई – भारती लव्हेकर (विद्यमान आमदार) (विरोधात शिवसेना बंडखोर राजुल पटेल आणि काँग्रेसचे बलदेव खोसा) वांद्रे पश्चिम, मुंबई – आशिष शेलार (विद्यमान मंत्री) (विरोधात काँग्रेसचे आसिफ जकेरिया) पेण, रायगड – रवीशेठ पाटील (भाजप) (विरोधात काँग्रेसच्या नंदा म्हात्रे) दौंड, पुणे – राहुल कुल (रासपतून बाहेर भाजपच्या चिन्हावर) (विरोधात राष्ट्रवादीचे रमेश थोरात) मावळ, पुणे – बाळा भेगडे (विद्यमान राज्यमंत्री) (विरोधात राष्ट्रवादीचे सचिन शेळके) शिरुर, पुणे – बाबुराव पाचर्डे (विद्यमान आमदार) (विरोधात राष्ट्रवादीचे अशोक पवार, अमोल कोल्हेंचा मतदारसंघ) नेवासा, अहमदनगर – बाळासाहेब मुरकुटे (विद्यमान आमदार) कर्जत-जामखेड, अहमदनगर – राम शिंदे (विद्यमान मंत्री) (विरोधात राष्ट्रवादीचे रोहित पवार) परळी, बीड – पंकजा मुंडे (विद्यमान मंत्री) (विरोधात राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे) लातूर शहर, लातूर – शैलेश लाहोटी (विरोधात काँग्रेस आमदार अमित देशमुख) औसा, लातूर – अभिमन्यू पवार (मुख्यमंत्र्यांचे पीए) (विरोधात काँग्रेस आमदार बसवराज पाटील) पंढरपूर, सोलापूर – सुधाकरराव परिचारक (विरोधात काँग्रेसमधून राष्ट्रवादीत गेलेले भारत भालके) वाई, सातारा – मदन भोसले (विरोधात राष्ट्रवादीचे आमदार मकरंद जाधव) कराड दक्षिण, सातारा – अतुल भोसले (विरोधात काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण) कणकवली, सिंधुदुर्ग – नितेश राणे (विरोधात शिवसेनेचेच सतीश सावंत) कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर – अमल महाडिक (विद्यमान आमदार) (विरोधात डीवाय पाटलांचे नातू, काँग्रेस ऋतुराज पाटील) जत, सांगली – विलासराव जगताप (विद्यमान आमदार) (विरोधात काँग्रेसचे विक्रम सावंत)

या सर्व 40 मतदारसंघात (Difficult Seats for BJP) भाजपच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा समावेश आहे. ज्यांच्यासमोर आघाडीचे उमेदवार किंवा बंडखोरांमुळे आव्हान उभं राहिल्याचं चित्रं आहे.

कणकवली मतदारसंघात भाजपच्या नितेश राणेंसमोर शिवसेनेच्या सतीश सावंतांचं आव्हान आहे. परळीत भाजपच्या पंकजा मुंडेंसमोर त्यांचे बंधू राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे उभे आहेत. कर्जत जामखेडमध्ये मंत्री राम शिंदेंसमोर राष्ट्रवादीच्या रोहित पवार यांनी तगडं आव्हान उभं केलं आहे.

कराड दक्षिणमध्ये भाजपच्या अतुल भोसलेंसमोर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहेत. आशिष शेलार यांची वांद्रे पश्चिमेत काँग्रेसच्या आसिफ जकेरियांची लढत होते आहे. तर कोल्हापूर दक्षिणेत अमल महाडिकांची काँग्रेसच्या ऋतुराज पाटलांशी गाठ आहे.

Maharashtra Exit Poll | युतीचा फायदा कोणाला? राज विजयापासून ‘वंचित’? एक्झिट पोलची दहा वैशिष्ट्यं

एकंदरीतच, या तगड्या लढती पाहता, भाजपला तब्बल 40 जागांवर काट्याची लढत (Difficult Seats for BJP) मिळणार हे स्पष्ट आहे. पण, यातीलही 20 जागा जिंकण्याचा विश्वास भाजपला आहे.. त्यामुळे 122+20 अशा एकूण 142 जागा एकट्याच्या जीवावर जिंकता येतील असा विश्वास भाजपच्या गोटातून व्यक्त केला जात आहे.

भाजपला काही जरी वाटत असलं, तरी 40 जागांवरच्या अटीतटीच्या लढतींमध्ये भाजप किती जास्त जागा जिंकतं, यावर भाजपचं भवितव्य अवलंबून राहणार आहे. त्यामुळे या 40 जागाच भाजपचं भविष्य ठरवणार, एवढं मात्र निश्चित आहे.

आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.