Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसला मोठा धक्का, पृथ्वीराज चव्हाणांचे निकटवर्तीय भाजपच्या वाटेवर

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांचे अत्यंत निकटवर्ती आणि काँग्रेसचे (Congress) विधानपरिषद आमदार आनंदराव पाटील (Anandrao Patil) भाजपच्या (BJP) वाटेवर असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत.

काँग्रेसला मोठा धक्का, पृथ्वीराज चव्हाणांचे निकटवर्तीय भाजपच्या वाटेवर
Follow us
| Updated on: Sep 10, 2019 | 8:38 AM

मुंबई: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांचे अत्यंत निकटवर्ती आणि काँग्रेसचे (Congress) विधानपरिषद आमदार आनंदराव पाटील (Anandrao Patil) भाजपच्या (BJP) वाटेवर असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. त्यामुळे आनंदराव पाटील भाजपमध्ये जाणार का? याबद्दल अनेकांना उत्सुकता लागली आहे. पाटील यांनी भाजपचा रस्ता धरल्यास पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला हा आणखी एक मोठा धक्का असणार आहे.

आनंदराव पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर विरोधक अतुल भोसले (Atul Bhosale) यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची भेट घेतली. त्यानंतर पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेंना उधाण आले आहे. आनंदराव पाटील माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. आनंदराव पाटील 13 सप्टेंबर रोजी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचंही सांगितलं जात आहे. ते आपल्या आमदार पदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली आहे.

कराड विधानसभा मतदारसंघात त्यांचा चांगला प्रभाव आहे. त्यामुळे आनंदराव पाटील भाजपमध्ये गेल्यास पृथ्वीराज चव्हाण यांच्या अडचणीत देखील वाढ होणार आहे. कराड विधानसभा मतदारसंघात आनंदराव पाटील यांची ताकद भाजपला मिळाल्यास चव्हाण यांची आगामी विधानसभा निवडणुकीत मोठी राजकीय कोंडी होण्याची शक्यता आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोरील इतर आव्हाने

पृथ्वीराज चव्हाण यांना कराडमधून भाजपने देखील मोठे आव्हान उभे केले आहे. भाजपने चव्हाण यांच्याविरोधात अतुल भोसलेंना उभं केलं आहे. अतुल भोसले यांनी 2014 मध्ये भाजपकडून कराड दक्षिण मतदारसंघातून, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण, विलासकाका पाटील उंडाळकर आणि अतुल भोसले अशी तिहेरी लढत होती. पृथ्वीराज चव्हाण यांनी विजय मिळवला, मात्र विलासकाका आणि अतुल भोसले यांनी त्यांची चांगलीच दमछाक केली होती.

पृथ्वीराज चव्हाणांना त्यावेळी 76 हजार 831 मतं मिळाली होती, तर विलासकाकांना 60 हजार 413 मतं आणि अतुल भोसले यांनी तब्बल 58 हजार 621 मतं मिळवली होती.

कोण आहेत भाजपचे उमेदवार अतुल भोसले?

डॉ. अतुल भोसले हे कराडचे युवा नेते म्हणून ओळखले जातात. अतुल भोसले हे सध्या भाजपचे प्रदेश सरचिटणीस आहेत. त्यांचे आजोबा जयवंतराव भोसले हे काँग्रेसचे दिग्गज नेते आणि कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक होते. अतुल यांचे वडील डॉ. सुरेश भोसले हे कृष्णा कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष तर स्वत: अतुल भोसले हे कऱ्हाडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजचे संचालक आहेत.

राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?.
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट.
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'.
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला.
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्...
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्....
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं.
ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं दीर्घआजारपणाने निधन
ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं दीर्घआजारपणाने निधन.
ही चांडाळ चौकटी युती होऊच देणार नाही, राज-उद्धव युतीवर शिरसाटांची टीका
ही चांडाळ चौकटी युती होऊच देणार नाही, राज-उद्धव युतीवर शिरसाटांची टीका.
पवार काका-पुतण्याच्या एकत्र येण्यावर राऊतांची टीका
पवार काका-पुतण्याच्या एकत्र येण्यावर राऊतांची टीका.
'...तर कायमचं शेतावर जावू, अशी शिंदेंना भिती', संजय राऊतांनी डिवचलं
'...तर कायमचं शेतावर जावू, अशी शिंदेंना भिती', संजय राऊतांनी डिवचलं.