रायबरेलीत भाजपकडून सोनिया गांधींविरोधात काँग्रेसच्या दिग्गज नेत्याला उमेदवारी
नवी दिल्ली : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी सहा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एक आणि उत्तर प्रदेशातील पाच जणांचा समावेश आहे. ईशान्य मुंबईतून विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्या जागी मुंबई महापालिकेतील भाजपचे गटनेते मनोज कोटक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर उत्तर प्रदेशात यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात काँग्रेस नेत्यालाच भाजपने उमेदवारी दिली आहे. […]
नवी दिल्ली : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी सहा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एक आणि उत्तर प्रदेशातील पाच जणांचा समावेश आहे. ईशान्य मुंबईतून विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्या जागी मुंबई महापालिकेतील भाजपचे गटनेते मनोज कोटक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर उत्तर प्रदेशात यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात काँग्रेस नेत्यालाच भाजपने उमेदवारी दिली आहे. नुकताच भाजपात प्रवेश केलेले काँग्रेसचे आमदार दिनेश प्रताप सिंग हे सोनिया गांधींविरोधात रायबरेलीतून लढणार आहेत.
लोकसभेच्या 80 जागा असणारं उत्तर प्रदेश हे राज्य भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. इथे भाजपने जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. कारण, सपा आणि बसपा यांच्या आघाडीमुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. त्यातच आता काँग्रेस दोन पारंपरिक जागा अमेठी आणि रायबरेलीतूनही भाजपने जोर लावला आहे.
कोण आहेत दिनेश प्रताप सिंग?
दिनेश प्रताप सिंग हे उत्तर प्रदेश विधानपरिषदेचे दोन वेळा आमदार राहिले आहेत, शिवाय ते काँग्रेसचे गटनेतेही होते. दिनेश प्रताप सिंग यांनी त्यांच्या भावासह गेल्या वर्षी भाजपात प्रवेश केला होता. भाजपात प्रवेश करताच त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली होती. गेल्या 60 वर्षात रायबरेलीत काँग्रेसचा एकही कार्यकर्ता तयार झाला नाही जो लोकसभेसाठी तिकीट मागू शकतो, असंही ते म्हणाले होते. अमेठी आणि रायबरेली या दोन्ही मतदारसंघांमध्ये दिनेश प्रताप सिंग यांचा प्रभाव आहे. दोन्ही मतदारसंघांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांच्या गोटातील पदाधिकारी आहेत.
भाजपची 16 वी यादी
संबंधित बातमी :
सुरक्षित पर्याय म्हणून राहुल गांधी दोन मतदारसंघातून लढण्याच्या तयारीत?
ताज्या ओपिनियन पोलमध्ये एनडीए बहुमतापासून दूर, उत्तर प्रदेशात सर्वात मोठा फटका