Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे गट पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर, दिपाली सय्यद शिंदे गटात येणार का?; थेट मंत्र्याच्या विधानाने चर्चांना उधाण

सत्तारांबद्दल म्हणाल तर त्यांच्या वक्तव्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मीही दिलगिरी व्यक्त केली. दीपक केसरकारांनीही त्यावर दिलगिरी व्यक्त केली आहे.

ठाकरे गट पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर, दिपाली सय्यद शिंदे गटात येणार का?; थेट मंत्र्याच्या विधानाने चर्चांना उधाण
ठाकरे गट पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर, दिपाली सय्यद शिंदे गटात येणार का?; थेट मंत्र्याच्या विधानाने चर्चांना उधाणImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 09, 2022 | 12:06 PM

पुणे: अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून दिपाली सय्यद मुख्यमंत्र्यांना वारंवार भेटत आहेत. त्यामुळे दिपाली सय्यद या ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आजच्या भेटीमुळे तर या चर्चांना बळ मिळालेलं असतानाच ठाकरे गटाचे नेते शंभुराज देसाई यांनी दिपाली सय्यद आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर मोठं विधान करून या चर्चांना हवा देण्याचं काम केलं आहे.

मंत्री शंभुराज देसाई यांनी मीडियाशी संवाद साधताना मोठं विधान केलं आहे. दिपाली सय्यद काही पहिल्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटत नाहीये. ही त्यांची तिसरी चौथी भेट आहे. शिल्लक सेनेत कोणी शिल्लक राहील असं वाटत नाही. दिपाली सय्यद आमच्या गटात येत असतील तर स्वागत करू. दिपाली सय्यद यांच्या प्रवेशामुळे शिंदे गट भक्कमच होईल, असा दावा शंभुराज देसाई यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरले. त्यामुळे राष्ट्रवादीतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. मात्र, याप्रकरणावर अजित पवार यांनी काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. त्याबाबत देसाई यांना विचारलं असता हा राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे मी त्यावर बोलणार नाही, असं त्यांनी सांगितलं.

सत्तारांबद्दल म्हणाल तर त्यांच्या वक्तव्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मीही दिलगिरी व्यक्त केली. दीपक केसरकारांनीही त्यावर दिलगिरी व्यक्त केली आहे. बोलण्याच्या ओघात सत्तारांकडून ते वाक्य गेलं. पण सर्वांनीच त्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे मोठ्या मनाने हा विषय संपवावा, असं आवाहन त्यांनी केलं.

दरम्यान, अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यानंतर त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेक ठिकाणी सत्तार यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं. तर मुंबई आणि औरंगाबादमधील सत्तार यांच्या घरावर हल्लाबोल करण्यात आला. यावेळी काही आंदोलकांनी सत्तार यांच्या घराच्या दिशेने दगडफेक केली होती.

मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा.
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड.
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला.
कराडला मारणारा महादेव गीते कोण?
कराडला मारणारा महादेव गीते कोण?.
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्..
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्...