Devendra Fadnavis : विजयोत्सवाला फडणवीसांची दांडी, भाजपमध्ये नाराजी नाट्य; मुख्यमंत्री पदाचा पत्ता कुणी कापला ?
नवं सरकार स्थापण झाल्यावर भाजपच्या समर्थकांनी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन करणारे बॅनर लावले आहेत. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, चंद्रकांत पाटील यांना स्थान देण्यात आल्याचे बॅनरमध्ये स्पष्ट दिसत आहे
मुंबई – मुंख्यमंत्री पद न मिळाल्याने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि महाराष्ट्रातल्या भाजपच्या (BJP) गोठात नाराजी असल्याचे स्पष्ट दिसत आहे. ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री जाहीर करताच अनेकांना धक्का बसला. परंतु हा केंद्राचा आदेश असल्याची चर्चा तात्काळ सुरू झाली. त्यावेळी राजभवनात उपस्थित असलेल्या अनेक भाजपच्या नेत्यांच्या चेहऱ्यावरती नाराजी दिसत होती. मुंबईसह महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचे बॅनर लावले जात आहेत. त्यामधून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो हटवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याच अलबेल असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मागील दहा दिवसांपासून महाराष्ट्रासह संपुर्ण देश राजकीय नाट्य पाहत आहे. हे नाट्य मुख्यमंत्री पदाची शपथ झाल्यानंतर संपलं आहे.
अमित शहांचा फोटो बॅनरमधून हटवला
नवं सरकार स्थापण झाल्यावर भाजपच्या समर्थकांनी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन करणारे बॅनर लावले आहेत. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, चंद्रकांत पाटील यांना स्थान देण्यात आल्याचे बॅनरमध्ये स्पष्ट दिसत आहे. अभिनंदनाच्या बॅनरमधून अमित शहा वगळल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांची नाराजी जाहीरपणे उघड झाली आहे. ज्या दिवशी शपथविधी झाला त्यावेळी भाजपच्या गोठात नाराजी असल्याने दिसले कारण त्यांनी जल्लोष मोठ्या प्रमाणात देखील केला नाही. नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांनी फडणवीस यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठा बॅनर लावला आहे. तसेच त्यातून अमित शहा यांना हटवले आहे. फडणवीस यांना मुख्यमंत्री केलं नाही म्हणून त्यांनी एक पत्रक काढल्याची माहिती मिळाली आहे.
फडणवीसांचा पत्ता कोणी कट केला ?
भाजप कार्यालयात सत्ता स्थापण झाल्यानंतर विजयोत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली असल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे विजयोत्सव कार्यक्रमाला भाजपच्या मोठ्या नेत्यांनी देखील दांडी मारल्याचे चित्र त्यादिवशी भाजप कार्यालयात पाहायला मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तसेच सगळ्या गोष्टी ठरविण्यात आल्या.
मग देवेंद्र फडणवीसांचा पत्ता कोणी कापला अशी चर्चा भाजपच्या गोठात आहे.