शिंदे गटाचा डोंबिवलीतील मध्यवर्ती शाखेवर ताबा; शिंदे, ठाकरे समर्थकांमध्ये वाद, पोलीस घटनास्थळी दाखल

डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे. डोंबिवलीत शाखेवरून शिंदे गट आणि ठाकरे गटात वाद निर्माण झाला आहे.

शिंदे गटाचा डोंबिवलीतील मध्यवर्ती शाखेवर ताबा; शिंदे, ठाकरे समर्थकांमध्ये वाद, पोलीस घटनास्थळी दाखल
Follow us
| Updated on: Oct 27, 2022 | 12:21 PM

मुंबई : डोंबिवलीमध्ये (Dombivli) पुन्हा एकदा ठाकरे गट (Uddhav Thackeray) आणि शिंदे गट आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे. डोंबिवलीत शाखेवरून शिंदे गट आणि ठाकरे गटात वाद निर्माण झाला आहे. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून डोंबिवलीतील मध्यवर्ती शाखेचा ताबा घेण्यात आला आहे. शिंदे गटाने मध्यवर्ती शाखेचा ताबा घेतल्यानं ठाकरे गट देखील आक्रमक झाला आहे.  शाखेवरून ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आल्यानं परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

महिला कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

दरम्यान शिंदे गटाकडून या शाखेचे रजिस्ट्रेशन केल्याचा दावा करण्यात येत आहे.  तर दुसरीकडे ठाकरे गटातील महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या असून, शाखेवर गोंधळ सुरू असल्याचं चित्र आहे.  सध्या पोलिसांनी या महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आल्यानंतरही मध्यवर्ती शाखा असलेल्या या परिसरात तणावाचे वातावरण असल्यानं खबरदारी म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

दोन्ही गटाकडून दावा

डोंबिवलीमध्ये असलेल्या या मध्यवर्ती शाखेवर दोन्ही गटाकडून दावा करण्यात आला आहे. या शाखेचे रजिस्ट्रेशन केल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या देखील आक्रमक झाल्या आहेत. परिसरात तणावाचे वातावरण असून, पोलिसांनी काही महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.