भाजप आणि शिंदे गटात वादाची ठिणगी! ‘ती’ जागा बापाची जाहगिरी आहे काय? रावसाहेब दानवेंनी अर्जुन खोतकारांना सुनावले

आजच अर्जुन खोतकर हे उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. मात्र पहिल्याच दिवशी त्यांना त्यांच्या पारंपारिक राजकीय शत्रूच्या सामना करावा लागला आहे. येत्या काळात भाजप आणि एकनाथ शिंदे गटात जागांवरुन वाद होऊ शकतात अशी चर्चा या निमित्ताने रंगली आहे.

भाजप आणि शिंदे गटात वादाची ठिणगी! 'ती' जागा बापाची जाहगिरी आहे काय? रावसाहेब दानवेंनी अर्जुन खोतकारांना सुनावले
आमचं ठरलंय, लोकसभा माझी, विधानसभा अर्जुन खोतकरांची, रावसाहेब दानवेंनी सर्वच उलगडून सांगितलं
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 6:40 PM

जालना: भाजप आणि एकनाथ शिंदे गटात वादाची ठिणगी पडली आहे. हा वाद झालाय तो लोकसभेच्या एका जागेवरून. जालना लोकसभेच्या जागेवरून(Jalna Lok Sabha seat ) भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे(Raosaheb Danve ) यांनी शिंदे गटात सामील झालेले शिवसनेचे माजी आमदार अर्जुन खोतकर(Arjun Khotkar) यांना चांगलंच सुनावले आहे. ही जागा काय रावसाहेब दानवेच्या बापाची जहागिरी आहे? असा सवाल उपस्थित करत ही जागा भाजपची आहे. यामुळे या जागेवर कुणी दावा करू शकत नाही असा इशाराच रावसाहेब दानवे यांनी अर्जुन खोतकर यांना दिला आहे. आजच अर्जुन खोतकर हे उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. मात्र पहिल्याच दिवशी त्यांना त्यांच्या पारंपारिक राजकीय शत्रूच्या सामना करावा लागला आहे. येत्या काळात भाजप आणि एकनाथ शिंदे गटात जागांवरुन वाद होऊ शकतात अशी चर्चा या निमित्ताने रंगली आहे.

अर्जुन खोतकरांच्या शिंदे गटाला पाठिंबा देण्याबाबत दानवेंची प्रतिक्रिया

अर्जुन खोतकर यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाला पाठिंबा दिला हा त्यांचा राजकीय निर्णय आहे. त्यांनी सगळ्या बाजूंचा विचार करूनच पाठिंबा दिला असेल. खोतकर यांना अश्रू अनावर झाले. ते रडायला लागले. त्याचा अर्थ असा की 40 वर्ष एखाद्या पक्षात काम केल्यानंतर माणसाला मागे वळून पाहिल्यानंतर काही आठवणी जाग्या होतात. त्यामुळे त्यांना अश्रू अनावर होणं हे साहजिक आहे कारण ते 40 वर्षे शिवसेनेत राहिलेत असे दानवे म्हणाले.

मी खोतकरांच्या मागे ईडी मागे लावलेली नाही – रावसाहेब दानवे

यापुढे आमचे राजकारण एकदम चांगलं राहील. मात्र मी त्यांच्या ईडी मागे लावलेली नाही असे रावसाहेब दानवे म्हणाले. काँग्रेसचे सरकार राज्यात असताना ज्या कारखान्यांची विक्री एम एस सी बँकेने केली त्या विरोधात अण्णा हजारे यांनी हायकोर्टात रीट दाखल केली होती. त्यावर हायकोर्टाने आदेश दिले होते की अशा कारखान्यांची चौकशी करा. त्यामध्ये सूत मिलचाही समावेश होता. त्यामध्ये एम एस सी बँकेने जेवढी मालमत्ता विकली होती त्या सर्वांच्या चौकशी झाल्या. ज्या चौकशीमध्ये अनियमित्ता वाटली त्यांच्यावर ईडीने कारवाई केली. यामध्ये रामनगर साखर कारखाना देखील आला. ईडी काय कोणाच्या सांगण्यावरून कारवाई करत नसते. ईडा पिडा टळो आणि पुढचा मार्ग नीट होवो असा टोला दानवे यांनी खोतकरांना लगावला.

ज्या जागेवर भाजप 9 वेळा जिंकली ती जागा कोण सोडेल

लोकसभेची जागा काय रावसाहेब दानवे च्या बापाची जाहगिरी थोडीच आहे. त्यावर रावसाहेब दानवेचा अधिकार थोडाच आहे. खोतकर आणि मी खुर्च्या टाकून बसलो आणि जागेची वाटणी केली असे होत नाही. जागावाटप करायला भाजपा हा काय जालन्यातल्या पक्ष आहे का? भाजपा हा राष्ट्रीय पक्ष आहे. ही भाजपची जागा आहे. ज्या जागेवर भाजप 9 वेळा जिंकली ती जागा कोण सोडेल? असा सवाल उपस्थित करत ही जागा भाजपची आहे. तिथे भाजपाच लढणार आहे असे दानवे यांनी स्पष्ट शब्दात सांगीतले आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.