राज ठाकरेंचं खरं नाव तुम्हाला माहित आहे का?

संपूर्ण महाराष्ट्र मराठी ह्रदयसम्राट म्हणून ओळख असणाऱ्या राज ठाकरेंचं खरं नाव तुम्हाला माहित आहे का? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नेहमीच चर्चेत असतात. यावेळी ते ईडीने पाठवलेल्या नोटिसमुळे चर्चेत आले आहेत.

राज ठाकरेंचं खरं नाव तुम्हाला माहित आहे का?
Follow us
| Updated on: Aug 19, 2019 | 7:18 PM

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्र मराठी ह्रदयसम्राट म्हणून ओळखत असणाऱ्या राज ठाकरेंचं खरं नाव तुम्हाला माहित आहे का? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नेहमीच चर्चेत असतात. यावेळी ते ईडीने पाठवलेल्या नोटिसमुळे चर्चेत आले आहेत. मात्र या नोटिसने त्यांच्या कागदोपत्री खऱ्या नावाचा खुलासा केला आहे. राज ठाकरेंचं नाव राज ठाकरे नसून दुसरं काही तरी आहे हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल ना, पण हे खरं आहे. ईडीने जेव्हा राज ठाकरेंना नोटिस पाठवली तेव्हा ही गोष्ट समोर आली. कारण त्या नोटिसमध्ये राज ठाकरे नाव लिहिलेलं नव्हतं. त्यांचे अधिकृत नाव स्वरराज एस. ठाकरे म्हणजे स्वरराज श्रीकांत ठाकरे असं आहे.

दरम्यान, राज ठाकरेंचे वडील श्रीकांत ठाकरे एक संगीत दिग्दर्शक होते. त्यांनी आपल्या पत्नीसह सर्व मुलांची नावं संगीताशी जोडलेली ठेवली आहे. पत्नीचे नाव त्यांनी मधुवंती रागनुसार मधुवंती ठेवले. तर मुलाचे नाव स्वरराज म्हणजे स्वराचा राजा आणि मुलीचे नाव जयजयवंती हा अजून एक संगीतातील राग आहे त्यानुसार जयजयवंती असे ठेवले.

लहान असताना राज ठाकरेंची मैत्री तबला, व्हायलिन, गिटारसोबत झाली होती. पण त्यांची आवड कार्टूनमध्ये होती. त्यांनी आपल्या परिवारातील साप्ताहिक मार्मिकसाठी कार्टून काढण्यास सुरुवात केली. एक दिवस त्यांचे काका बाळासाहेब ठाकरे यांनी राज ठाकरेंना सांगितले की, मी बाळ ठाकरे नावाने कार्टूनच्या जगात नाव केले. तू पण राज ठाकरे नावाने कार्टूनच्या जगात नाव कर. तेव्हा पासून राज ठाकरेंनी आपलं नाव बदललं.

काय आहे ईडी प्रकरण?

कोहिनूर सीटीएनएल (Kohinoor CTNL) ही उन्मेष जोशी (Unmesh Joshi) यांच्या मालकीची कंपनी आहे. उन्मेष जोशी, राज ठाकरे आणि त्यांचे निकटवर्तीय राजन शिरोडकर हे 2008 पर्यंत ‘कोहिनूर CTNL’ कंपनीचे शेअर होल्डर (भागीदार) होते. त्यांनी कोहिनूर मिल नंबर 3 ही जागा 2003 मध्ये लिलाव पद्धतीने 421 कोटींना खरेदी केली होती.

या जमिनीवर ‘कोहिनूर स्क्वेअर’ ही बहुमजली इमारत उभारण्यात येत आहे. या कंपनीत सरकारी क्षेत्रातील कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियर सर्व्हिसेसद्वारे (आयएल अँड एफएस – IL&FS) 225 कोटी रुपयांची गुंतवणूक केली.

मात्र 2008 मध्ये IL&FS ने मोठं नुकसान सहन करत आपले 225 कोटी रुपयांचे सर्व शेअर्स केवळ 90 कोटींना कोहिनूर CTNL ला देऊन टाकले. त्याचवेळी राज ठाकरेंनीही आपले सर्व शेअर कंपनीला विकले आणि ते कंपनीतून बाहेर पडले.

आपले शेअर्स दिल्यानंतरही IL&FS या सरकारी कंपनीने उन्मेष जोशींच्या कोहिनूर सीटीएनएल कंपनीला अडव्हान्स लोन अर्थात आगाऊ कर्ज दिलं. ते कर्जही कोहिनूर सीटीएनएल कंपनी भागवू शकली नाही.

वर्ष 2011 मध्ये कोहिनूर सीटीएनएलने आपली काही मालमत्ता विकून 500 कोटी रुपयांचं कर्ज भागवण्यासाठी IL&FS सोबतच्या करारावर सह्या केल्या. या करारानंतरही IL&FS या कंपनीने पुन्हा कोहिनूर सीटीएनएल कंपनीला आणखी 135 कोटी रुपयांचं कर्ज दिलं.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.