ती चूक अजाणतेपणामुळे, पार्थला फासावर लटकवणार का? : अजित पवार

पंढरपूर: “माढा लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांना चांगले मताधिक्य मिळेल. इतर तालुक्यांप्रमाणेच सांगोला तालुक्यातूनही संजय शिंदेंना आघाडी मिळाली पाहिजे, अन्यथा तुमच्या डोक्यावर उरलेले केसदेखील राहणार नाहीत असा सज्जड दम, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष दीपक साळुंखे यांना भर सभेत दिला. राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदेंच्या प्रचाराच्या निमित्ताने […]

ती चूक अजाणतेपणामुळे, पार्थला फासावर लटकवणार का? : अजित पवार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

पंढरपूर: “माढा लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांना चांगले मताधिक्य मिळेल. इतर तालुक्यांप्रमाणेच सांगोला तालुक्यातूनही संजय शिंदेंना आघाडी मिळाली पाहिजे, अन्यथा तुमच्या डोक्यावर उरलेले केसदेखील राहणार नाहीत असा सज्जड दम, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष दीपक साळुंखे यांना भर सभेत दिला.

राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदेंच्या प्रचाराच्या निमित्ताने काल माळशिरस येथे कार्यकर्त्यांचा मेळावा अजित पवारांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर टोलेबाजी करताना ते राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपक साळुंखेवरही घसरले.

पार्थला फासावर लटकवणार का?

दरम्यान, यावेळी अजित पवार यांनी पुत्र आणि मावळचे उमेदवार पार्थ पवार यांनी चर्चमध्ये जाऊन वादग्रस्त फादरच्या घेतलेल्या भेटीवरही भाष्य केलं.

पार्थने चर्चमध्ये जाऊन दर्शन घेणे हे फासावर लटकवण्यासारखी चूक नाही. अशी चूक माझ्याकडून घडली असती तर गोष्ट वेगळी होती. मीडियाने एवढा बाऊ करण्याची गरज नव्हती. तो अजून नवखा आहे. त्याला मी चार गोष्टी समजावून सांगितल्या आहेत. त्याच्यासोबत असणाऱ्या लोकांनी त्याला चर्चमध्ये नेले होते. तो स्वत: गेला नव्हता, असे म्हणत अजित पवारांनी आपल्या मुलाची पाठराखण केली.

अजित पवार म्हणाले, “पार्थ पवार नवीन आहे. आम्हीही निवडणुकीला उभे होतो तेव्हा आम्हाला मंदिरामध्ये, मशिदीत आणि चर्चमध्येही घेऊन जायचे. आम्ही नमस्कार करुन निघून यायचो. पार्थसोबत जे झाले ते मलाही योग्य वाटत नाही. मी आणि पवारसाहेब शपथ घेताना काळजी घेत असतो. नवीन काही लोक येतात तेव्हा त्यांच्याकडून काही चूक होते. ती चूक काही फार फासावर लटकवण्यासारखी नाही. तिचा मीडियानेही बाऊ करण्याची गरज नाही. ती चूक अजित पवारने केली असती ती गोष्ट वेगळी होती. तो (पार्थ) अजून नवखा आहे. मी त्याला चार गोष्टी समजावून सांगितल्या आहेत. त्याच्याकडून अजाणतेपणामुळे, न कळत घडलं आहे हे मान्य आहे”.

पार्थ पवार वादग्रस्त फादरच्या भेटीला

उच्चविद्याविभूषित, मॉडर्न, तरुण-तडफदार अशी ओळख निर्माण केलेले पार्थ पवार चार दिवसापूर्वी वादग्रस्त फादर सिल्वेंच्या भेटीला पोहोचले. दापोडीच्या चर्चमध्ये हा सगळा सोहळा रंगला. पार्थ पवारांचं अगोदर स्वागत करण्यात आलं आणि नंतर त्यांच्या विजयासाठी फादरनं प्रार्थना म्हटली. अर्थातच समोर गोरगरीब जनताही बसलेली होती. फादर लोकांवर जादू करतात तशी पार्थ पवारांवरही करण्याचा प्रयत्न केला. पार्थनेही डोळे मिटले, पण इतरांसारखं पार्थ काही कोसळले नाहीत. वाचा –  ‘पुरोगामी’ पवारांचा नातू वादग्रस्त फादरच्या दरबारात  

VIDEO:

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.