Rajya Sabha elections : राज्यसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया काय असते? कशी होते राज्यसभा निवडणूक? जाणून घ्या

Rajya Sabha Election 2022 : निवडणुकीच्या गोष्टी माहिती करून घेण्यापूर्वी आपण राज्यसभा आणि लोकसभा थोडक्यात समजून घेऊ या.

Rajya Sabha elections : राज्यसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया काय असते? कशी होते राज्यसभा निवडणूक? जाणून घ्या
राज्यसभेची निवडणूकीत पक्षाच्या उमेदवारालाच मतदान करावं लागतं का?Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 6:36 AM

मुंबई – राज्यसभेची (Rajya Sabha elections) निवडणूक जाहीर झाल्यापासून राजकारणात पडगम वाजायला सुरूवात झाली आहे. प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवारांची काळजी घेताना पाहायला मिळतोय. खरं म्हणजे महाराष्ट्रात शिवसेना (Shiv sena) आणि भाजपमध्ये (bjp) काटे की टक्कर पाहायला मिळणार असं वाटतंय. कारण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पंचतारांकीत हॉटेलमध्ये बैठक घेतली. त्यामध्ये आमदारांशी संवाद साधला. भाजप आज पंचतारांकीत हॉटेलमध्ये आमदारांशी संवाद साधणार आहेत. सर्व आमदारांना मतदान प्रक्रिया समजून सांगितली जात आहे. विशेष म्हणजे सहा जागांवर सात उमेदवार आहेत. छोट्या पक्षांच्या आमदारांना आणि अपक्ष आमदारांना अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे.

थोडक्यात लोकसभा राज्यसभा समजून घेऊया

निवडणुकीच्या गोष्टी माहिती करून घेण्यापूर्वी आपण राज्यसभा आणि लोकसभा थोडक्यात समजून घेऊ या. लोकसभेत 543 निवडलेले आणि 2 नेमणूक केलेले असे एकूण 545 खासदार असतात. ही निवडणूक दर पाच वर्षांनी होते.

राज्यसभेत 250 खासदार असतात. राज्यसभेत 238 निवडलेले आणि 12 नेमलेले खासदार असतात. राज्यसभेच्या निवडणुका दर दोन वर्षांनी होतात. राज्यसभेचे एक तृतीयांश खासदार दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. राज्यसभेचे खासदार आमदारांनी केलेल्या मतांवर निवडून येतो. तर लोकसभेचा खासदार सामान्य लोकांनी केलेल्या मतदानावरती निवडून येतो.

हे सुद्धा वाचा

अशी असते मतदानाची पद्धत

राज्यसभेत प्रत्येक एका आमदाराच्या मताचं मुल्य शंभर असतं. महाराष्ट्रात सध्या 287 आमदार आहेत. सर्व आमदारांच्या मताचं मूल्य होईल 28,800 इतकं होतं. जेवढे खासदार निवडायचे आहेत. त्या एक आकडा अधिक करून त्या आकड्याने मुल्य असलेल्या आकड्याला भागायचे. त्यातून जो भागाकार येईल त्यात एक मिसळायचा.

महाविकास आघाडीला आपले उमेदवार निवडून आणायचे असतील तर 168 मतांची गरज आहे. म्हणजेचं त्यांना 16 अतिरिक्त मतांची गरज आहे. भाजपला 126 मतांची गरज आहे. त्यांचे तीन उमेदवार आहेत. त्यांना 20 मतं कमी आहेत.

पक्षाच्या उमेदवारालाच मतदान करावं लागतं का?

राज्यसभेच्या निवडणुकीत तुम्ही ज्या पक्षाचे आमदार आहात. त्या पक्षाने सांगितलेल्या उमेदवाराला मतदान करावे लागते. पक्षाकडून एजंट नेमलेले असतात. आमदारांना केलेलं मतदान मतदान पेटीत टाकण्यापूर्वी संबंधित एजंटला दाखवावे लागते. जे अपक्ष आमदार आहेत त्यांनी न दाखवण अपेक्षित असतं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.