मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात संजय राठोड (Sanjay Rathod) यांचा राजीनामा घेण्याची हिंमत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा कधीही आपल्या भाषणात ‘मी मर्द आहे‘ असा उल्लेख करु नये, अशी जळजळीत टीका भाजप नेते निलेश राणे यांनी केली. (BJP leader Nilesh Rane slams CM Uddhav Thackery)
ठाकरे सरकार संजय राठोडला वाचवत आहे.पूजा चव्हाण प्रकरणात सर्व बाजूंनी अडकलेले संजय राठोड शक्तीप्रदर्शन करतात. कॅबिनेट मिटिंगला येऊन बसतात. तरीही त्यांचा राजीनामा घेण्याचं धाडस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नाही. परत मुख्यमंत्र्यानी कधीही स्वतःच्या भाषणात म्हणू नये की ‘मी मर्द आहे‘, असे निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
ठाकरे सरकार संजय राठोडला वाचवतय. सगळ्या बाजूने अडकलेला संजय राठोड शक्तिप्रदर्शन करतो, कॅबिनेट मीटिंगमध्ये बसतो पण तरीही त्याचा राजीनामा घेण्याची हिंमत आणि धाडस मुख्यमंत्र्यामध्ये नाही… परत मुख्यमंत्र्यानी कधीही स्वतःच्या भाषणात म्हणू नये की ‘मी मर्द आहे‘
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 25, 2021
पूजा चव्हाण हत्या प्रकरणामध्ये सौ. चित्राताई वाघ वानवडी पोलीस स्टेशनला जाब विचारण्यासाठी गेल्या होत्या. पोलिसांनी त्यांना दिलेली वागणूक बघून आश्चर्य वाटलं. एक गुन्हेगार मंत्र्याला वाचवण्यासाठी पोलीस किती तत्पर आहेत यावरून लक्षात आलं.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 25, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नेहमी आपले सरकार शिवशाहीचं असल्याचं सांगतात. मात्र, हे सरकार शिवशाहीचं आहे, हे आता कृतीतून दाखवण्याची वेळ आली आहे, असे वक्तव्य भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केले. शिवशाहीत बलात्काऱ्यांचा चौरंग व्हायचा. आता चौरंग करता येत नाही, पण किमान गच्छंती करा, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली.
संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी पोहरादेवी येथे गर्दी जमवून केलेले शक्तीप्रदर्शन अयोग्य होते. याप्रकरणात चौकशी पूर्ण झाल्यावर दोषींवर नक्की कारवाई होईल, असे वक्तव्य शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केले. सर्वांना समान न्याय, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धोरण आहे. त्यामुळे पोहरादेवी प्रकरणात कोणीही सुटणार नाही, असेही विनायक राऊत यांनी सांगितले.
संबंधित बातम्या:
संजय राठोडांच्या शक्तिप्रदर्शनावर शरद पवार नाराज?
नियम मोडला तर उद्धव ठाकरे आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत: संजय राऊत
संजय राठोडांना पोहरादेवीची गर्दी भोवणार, राजीनाम्याबाबत शिवसेना लवकरच निर्णय घेणार: सूत्र
(BJP leader Nilesh Rane slams CM Uddhav Thackery)