नांदेडमधील एकमेव भाजप आमदाराला तिकीट देऊ नका, कार्यकर्त्यांची मागणी

तुषार राठोड (MLA Tushar Rathod) यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडे केली आहे.

नांदेडमधील एकमेव भाजप आमदाराला तिकीट देऊ नका, कार्यकर्त्यांची मागणी
Follow us
| Updated on: Sep 05, 2019 | 4:46 PM

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील एकमेव भाजप आमदाराविरोधात पक्षातीलच कार्यकर्त्यांनी बंड पुकारलं आहे. आमदार तुषार राठोड (MLA Tushar Rathod) यांनी पक्ष वाढवण्याऐवजी स्वतःचं मित्रमंडळ तालुक्यात वाढवल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे तुषार राठोड (MLA Tushar Rathod) यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये अशी मागणी कार्यकर्त्यांनी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडे केली आहे. प्रमुख कार्यकर्त्यांनी खासदाराची भेट घेत ही मागणी केल्यामुळे जिल्ह्यातील एकमेव भाजप आमदार चांगलेच चर्चेत आले आहेत.

स्वर्गीय गोविंदमामा राठोड यांच्या निधनांनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत तुषार राठोड यांना भाजपने उमेदवारी दिली होती. त्या पोटनिवडणुकीत तुषार राठोड विजयी झाले होते. मात्र आमदार बनल्यापासून राठोड यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

मुखेड तालुक्यातील सेवा सहकारी सोसायट्यावर आपल्याच मर्जीतील लोकांची नियुक्ती आमदारांनी केल्याचा आरोप या शिष्टमंडळाने खासदाराकडे केला आहे. भाजप, संघ आणि विद्यार्थी परीषदेच्या कार्यकर्त्यांना दुय्यम स्वरूपाची वागणूक आमदार राठोड देत असल्याची या कार्यकर्त्यांची तक्रार आहे.त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत तुषार राठोड यांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी या शिष्टमंडळाने खासदार प्रताप पाटील यांना भेटून केली.

आमदार तुषार राठोड यांच्याऐवजी सक्षमपणे काम करू शकणाऱ्या रामदास पाटील यांच्या नावाचा विचार करावा अशी विनंतीही या शिष्टमंडळाने केली. या सगळ्या प्रकारामुळे मुखेड तालुक्यातील राजकीय वातावरण आतापासूनच तापण्यास सुरुवात झाली आहे.

या शिष्टमंडळात भाजपाचे तालुकाध्यक्ष नामदेव पाटील जाहुरकर, भाजपा ज्येष्ठ नेते टी व्ही सोनटक्के, भाजपा माजी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष नाजीमपाशा सौदागर, किसान मोर्चाचे पंजाबराव वडजे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.