Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिजीत बिचकुलेचं नाव घेऊ नका, मला अटक होईल : उदयनराजे भोसले

“कॉलर उडवणे हा बेशिस्तपणा असेल, तर अनेक भ्रष्टाचार झाले, त्यात काही निर्णय झाले नाही, ते शिस्तीचे आहे का? कॉलर उडवणे ही माझी स्टाईल आहे. माझी कमिटमेंट लोकांशी ती राहणार, शिवाजी महाराजांसारखी”, असं उदयनराजे म्हणाले.

अभिजीत बिचकुलेचं नाव घेऊ नका, मला अटक होईल : उदयनराजे भोसले
Follow us
| Updated on: Sep 16, 2019 | 11:28 AM

सातारा : “मी कधीच बेशिस्त नव्हतो. प्रत्येकाचा स्वभाव एकसारखा नसतो. कुणी काय विचार करावा हे त्याचं त्याने ठरवावे. लोकशाही आहे. प्रत्येकाला मत मांडण्याची मुभा आहे”, अशी प्रतिक्रिया भाजपमध्ये दाखल झालेले उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी टीव्ही 9 मराठीला दिली. शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून उदयनराजेंच्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलवर भाष्य केलं आहे. त्याबाबत राजेंनी प्रतिक्रिया दिली.

“कॉलर उडवणे हा बेशिस्तपणा असेल, तर अनेक भ्रष्टाचार झाले, त्यात काही निर्णय झाले नाही, ते शिस्तीचे आहे का? कॉलर उडवणे ही माझी स्टाईल आहे. माझी कमिटमेंट लोकांशी ती राहणार, शिवाजी महाराजांसारखी”, असं उदयनराजे म्हणाले.

माझी खंत पवारांना सांगणार नाही तर कुणाला सांगणार ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

‘उमेदवार कोणीही असू द्या, मी लढणार’

माझ्या समोर उमेदवार पृथ्वीराज चव्हाण असतील तर काय झालं? का नसावेत? लोकशाही आहे. कुणीही उभे राहू द्या, मी उमेदवार आहेच. फक्त अभिजीत बिचकुलेचं (Abhijit Bichukale) नाव घेऊ नका मला अटक होईल, असा  टोला उदयनराजेंनी लगावला.

जिल्हा हद्द वाढली

सातारा जिल्हा हद्द वाढवली, कारण लोकसंख्या वाढली आहे. सुख सोयी पुरवण्यासाठी निधी आवश्यक असतो. पृथ्वीबाबा मुख्यमंत्री होते तेव्हाही मागणी केली होती. पुरावे आहेत…पण त्यांनी का निर्णय घेतला माहित नाही.

सातारा अॅग्रीकल्चर युनिव्हर्सिटी का केलं नाही, त्याचं उत्तर त्यांनी द्यावं. शिवाजी विद्यापीठ उपकेंद्राची मागणी केली. इश्यू बेस पॉलिटिक्स आहे. मेडिकल कॉलेजचा निर्णय पेंडिंग, IIT, IIM ची मागणी केली. साताऱ्याने देशाला दिशा दाखवण्याचे काम केले. तुम्ही PMO चे राज्यमंत्री होता. कारभार तुमच्याकडे होता, तुमचे काँटॅक्ट्स होते, तुम्ही पुश करू शकला असता. सातारा अॅग्रीकल्चर युनिव्हर्सिटीला तुमचं नाव दिलं असतं. यापलिकडे मी काय करू? असाही प्रश्न उदयनराजेंनी उपस्थित केला.

उदयनराजे विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण?

उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने आता सातारा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होण्याची चिन्हं आहेत. महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादीच्या वाट्याला असलेली लोकसभेची ही जागा काँग्रेसला सोडण्याची तयारी राष्ट्रवादीने केली आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून थेट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan vs Udayanraje Bhosale) यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली आहेत. काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव पुढे करण्यात आलं  आहे.

संबंधित बातम्या  

Bigg Boss Marathi 2 : अभिजीत बिचुकलेला अटक का आणि कशी झाली? वकिलांनी अख्खी स्टोरी सांगितली

शिट्ट्या मारणं, कॉलर उडवणे हे भाजपमध्ये चालणार नाही, शिवसेनेची उदयनराजेंना समज  

भाजपप्रवेशाची ऑफर होती, पण… : पृथ्वीराज चव्हाण     

उदयनराजेंविरुद्ध आघाडीचा एक्का बाहेर, पोटनिवडणुकीत पृथ्वीराज चव्हाणांना उमेदवारी? 

'..तरच देशमुखांना न्याय', दमानियांनी पुन्हा मागितला मुंडेंचा राजीनामा
'..तरच देशमुखांना न्याय', दमानियांनी पुन्हा मागितला मुंडेंचा राजीनामा.
शिवराय अग्र्यातून कसे सुटले? लाल किल्ल्यावरून EXCLUSIVE रिपोर्ट
शिवराय अग्र्यातून कसे सुटले? लाल किल्ल्यावरून EXCLUSIVE रिपोर्ट.
पोलीसच सुरक्षित नाही...4 मद्यपींकडून बेदम मारहाण,CCTV पाहून बसेल धक्का
पोलीसच सुरक्षित नाही...4 मद्यपींकडून बेदम मारहाण,CCTV पाहून बसेल धक्का.
'शिंदे CM नकोत, ही शरद पवारांची भूमिका..', राऊतांचा खळबळजक दावा
'शिंदे CM नकोत, ही शरद पवारांची भूमिका..', राऊतांचा खळबळजक दावा.
विकी कौशलची रायगडावर गर्जना; म्हणाला, “हम शोर नहीं करते, सीधा...”
विकी कौशलची रायगडावर गर्जना; म्हणाला, “हम शोर नहीं करते, सीधा...”.
राहुल गांधींनी अक्कल पाजळली, जयंतीच्या दिवशी शिवरायांना श्रद्धांजली
राहुल गांधींनी अक्कल पाजळली, जयंतीच्या दिवशी शिवरायांना श्रद्धांजली.
बॉसने तर ट्रॅपमध्ये नाही ना अडकवलं? राऊतांचा सुरेश धसांना खोचक सवाल
बॉसने तर ट्रॅपमध्ये नाही ना अडकवलं? राऊतांचा सुरेश धसांना खोचक सवाल.
'त्या' नासक्या मंत्र्यांचं नाव घेऊ नका, मनोज जरांगेंचा रोख कोणावर?
'त्या' नासक्या मंत्र्यांचं नाव घेऊ नका, मनोज जरांगेंचा रोख कोणावर?.
'कमाल'चा खोटापीडिया... आक्षेपार्ह मजकूर शेअर करत तोडले अकलेचे तारे
'कमाल'चा खोटापीडिया... आक्षेपार्ह मजकूर शेअर करत तोडले अकलेचे तारे.
'तानाजी सावंतांचं पोरंग सापडतं मग खुनी...', सुप्रिया सुळे का भडकल्या?
'तानाजी सावंतांचं पोरंग सापडतं मग खुनी...', सुप्रिया सुळे का भडकल्या?.