Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : डॉ. आंबेडकरांनी दिलेले संविधान संपविण्याचा केंद्रातील सत्ताधाऱ्यांचा डाव, नाना पटोलेंचा गंभीर आरोप

देशातील भारतीय जनता पक्षाचे सरकार संविधानिक संस्था संपवून संविधानच संपुष्टात आणण्याचे काम करत आहेत. या देशातील लोकशाही वाचवण्यासाठी डॉ. बाबासाहेब यांनी दिलेले संविधान वाचवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे', असं पटोले म्हणाले.

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : डॉ. आंबेडकरांनी दिलेले संविधान संपविण्याचा केंद्रातील सत्ताधाऱ्यांचा डाव, नाना पटोलेंचा गंभीर आरोप
काँग्रेसकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 5:18 PM

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या 131 व्या जयंती निमित्त महामानवाला सर्व स्तरातून अभिवादन केलं जातंय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनीही चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन केलं. त्यावेळी बोलताना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला. ‘माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने (Constitution) दिला आहे. सर्व समाजाचे न्याय व हक्क अबाधित ठेवण्याचे काम संविधानाच्या माध्यमातून होत आलेले आहे. देशातील भारतीय जनता पक्षाचे सरकार संविधानिक संस्था संपवून संविधानच संपुष्टात आणण्याचे काम करत आहेत. या देशातील लोकशाही वाचवण्यासाठी डॉ. बाबासाहेब यांनी दिलेले संविधान वाचवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे’, असं पटोले म्हणाले.

‘स्वातंत्र्य व संविधान आज धोक्यात’

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन नाना पटोले यांनी महामानवास अभिवादन केलं. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, जाती धर्मात विष पेरून काही पक्ष व संघटना सामाजिक वातावरण दूषित करण्याचं काम करत आहेत. देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो. पण काही लोक संविधानाला धाब्यावर बसवून मनमानी कारभार करत आहेत. देशाला मिळालेले स्वातंत्र्य व संविधान आज धोक्यात असून ते वाचवणे आपल्या सर्वांचं कर्तव्य असल्याचं पटोले यांनी म्हटलंय.

चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन

टिळक भवनातही बाबासाहेबांना अभिवादन

प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या टिळक भवनातही पटोले यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देत काँग्रेस प्रदेशाध्यांनी आजचा दिवस देशभर एक उत्सव म्हणून साजरा करा असे आवाहन केले.

काँग्रेस कार्यालयात आंबेडकर जयंती

चैत्यभूमीवर पटोले यांच्यासोबत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे, राजन भोसले, राजेश शर्मा, मुनाफ हकीम, जो. जो. थॉमस, प्रा. प्रकाश सोनावणे, माजी आमदार सुभाष चव्हाण, प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, एनएसयुआयचे संदीप पांडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

इतर बातम्या :

Fadnavis Tweet On Pawar : हिंदू दहशतवाद, बाबासाहेब ते इशरत जहाँ, पवारांच्याविरोधात फडणवीसचे सलग 14 ट्विट, वाचा सविस्तर

Eknath Khadse : मी मित्रत्वाचे नाते जपले, त्यांनी मात्र कुभांडच रचले; खडसेंची फडणवीसांवर टीका

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.