जेव्हा डॉ. प्रीतम मुंडे गाडी थांबवून जखमी व्यक्तीची मदत करतात….

बीड : खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्यातल्या लोकप्रतिनिधीसोबतच त्यांच्यातला डॉक्टरही बीडकरांना पाहायला मिळाला. प्रीतम मुंडे रस्त्याने जात असताना त्यांना एक अपघातग्रस्त महिला दिसली. गाडी थांबवून त्या महिलेकडे धावल्या आणि स्वतःहून महिलेला पाणी दिलं. यानंतर जखमी महिलेची विचारपूस करत रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली. यापूर्वीही ऑक्टोबर 2016 मध्ये त्यांनी अशीच एका रुग्णाला मदत केली होती. लिंबोटा […]

जेव्हा डॉ. प्रीतम मुंडे गाडी थांबवून जखमी व्यक्तीची मदत करतात....
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:36 PM

बीड : खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्यातल्या लोकप्रतिनिधीसोबतच त्यांच्यातला डॉक्टरही बीडकरांना पाहायला मिळाला. प्रीतम मुंडे रस्त्याने जात असताना त्यांना एक अपघातग्रस्त महिला दिसली. गाडी थांबवून त्या महिलेकडे धावल्या आणि स्वतःहून महिलेला पाणी दिलं. यानंतर जखमी महिलेची विचारपूस करत रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली. यापूर्वीही ऑक्टोबर 2016 मध्ये त्यांनी अशीच एका रुग्णाला मदत केली होती.

लिंबोटा येथील श्रमदान आटोपून सिरसाळामार्गे सरफराजपूरकडे श्रमदानानिमित्त जात असताना पांगरीपासून काही अंतरावर लताबाई प्रकाश भोसले (रा. गव्हाणे कौडगाव ता. परळी) या दुखापतग्रस्त अवस्थेत रस्त्याच्या बाजूला पडलेल्या असल्याचं प्रीतम मुंडे यांच्या निदर्शनास आलं. जखमी महिलेला पाहताक्षणी प्रीतम मुंडेंनी गाडी थांबवून दुखापतग्रस्त महिलेकडे धाव घेतली. जखमी महिलेला स्वतःहून पाणी प्यायला देत ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश दिले. जखमी महिला लताबाई भोसले यांना पांगरी येथील माऊली क्लिनिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

प्रीतम मुंडे या निवडणुकीत बीडमध्ये भाजपच्या उमेदवार होत्या. त्या स्वतः उच्चशिक्षित राजकारणी आहेत. M.D. (Dermatology, Venereology & Leprosy) हे त्यांचं शिक्षण आहे. वडील आणि दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर प्रीतम मुंडे राजकारणात आल्या होत्या. देशातील सर्वात जास्त मतांनी निवडून येणारा खासदार अशी त्यांची ओळख आहे.

प्रीतम मुंडेंचं ग्रामस्थांसोबत श्रमदान

दुष्काळ आणि पाणी टंचाईच्या निवारणासाठी प्रशासकीय स्तरावर उपाययोजना होत असल्या तरी लोकसहभागाशिवाय दुष्काळ निवारण अशक्य आहे. दुष्काळ मुक्तीच्या लढ्यात सर्वांची एकजूट उत्साह वाढवणारी असल्याची प्रतिक्रिया प्रीतम मुंडे यांनी दिली. वॉटर कप स्पर्धेत वाढता लोकसहभाग आणि उत्स्फूर्त प्रतिसाद नवा आदर्श निर्माण करणारा असून महिलांसह तरुण आणि आबालवृद्धांचे कार्य कौतुकास्पद असल्याचं त्या म्हणाल्या.

वॉटर कप स्पर्धेनिमित्त सरफराजपूर या डोंगराळ भागात असलेल्या गावात प्रीतम मुंडे यांनी सहभागी होऊन श्रमदान केलं. दुर्गम भागात असलेल्या सरफराजपूरच्या डोंगरात येऊन श्रमदान केल्याने ग्रामस्थांचाही उत्साह वाढला होता. श्रमदानानंतर  ग्रामस्थांनी आणलेल्या शिदोरीची न्याहारी प्रीतम मुंडे यांनी केली. यावेळी महिलांनी प्रीतम मुंडेंना आपुलकीने घास भरवला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.