वडील 25 वर्ष आमदार, 10 वर्ष कॅबिनेट मंत्री, मुलगा शिवसेनेत प्रवेश करणार

25 वर्ष आमदार आणि 10 वर्ष कॅबिनेट मंत्री असलेले सतीष चतुर्वेदी यांचा विदर्भात मोठा जनसंपर्क आहे. त्यांच्या मुलाच्या रुपाने शिवसेना विदर्भात भाजपलाच शह निर्माण करण्याच्या प्रयत्नात दिसत आहे.

वडील 25 वर्ष आमदार, 10 वर्ष कॅबिनेट मंत्री, मुलगा शिवसेनेत प्रवेश करणार
Follow us
| Updated on: Jun 22, 2019 | 5:03 PM

मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरु झालंय. काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सतीष चतुर्वेदी यांचे चिरंजीव दुष्यंत चतुर्वेदी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. सतीष चतुर्वेदी हे विदर्भाच्या राजकारणातील मोठं नाव आहे. 25 वर्ष आमदार आणि 10 वर्ष कॅबिनेट मंत्री असलेले सतीष चतुर्वेदी यांचा विदर्भात मोठा जनसंपर्क आहे. त्यांच्या मुलाच्या रुपाने शिवसेना विदर्भात भाजपलाच शह निर्माण करण्याच्या प्रयत्नात दिसत आहे.

दुष्यंत चतुर्वेदी सध्या त्यांच्या शैक्षणिक संस्थांचं काम पाहण्यासोबतच सामाजिक कामांमध्येही व्यस्त असतात. आता राजकीय कारकीर्दीची सुरुवात ते करणार आहेत. वडील सतीष चतुर्वेदी यांच्याकडूनच त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. मोठी राजकीय वारसा असलेल्या माजी मंत्र्याच्या मुलाला पक्षात घेऊन शिवसेनेकडून विदर्भात आणखी जम बसवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. विधानसभेसाठी शिवसेना सध्या विभागनिहाय तयारी करत आहे.

सतीष चतुर्वेदी यांचं काँग्रेसमधील स्थानिक नेत्यांशी जमत नसल्याचं चित्र आहे. पण आपण कधीही काँग्रेस सोडणार नसल्याचं त्यांनी गेल्यावर्षी स्पष्ट केलं होतं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि सतीष चतुर्वेदी यांचे संबंध चांगले नाहीत. अशोक चव्हाण मुख्यमंत्री होताच मला मंत्रिमंडळातून काढल्याचंही ते एकदा म्हणाले होते. विदर्भात सतीष चतुर्वेदी यांचा मोठा जनसंपर्क आहे. 10 वर्षे मंत्रिपदाचा अनुभव घेतल्यामुळे तळागाळापर्यंत त्यांचे कार्यकर्ते असल्याचं बोललं जातं.

व्हिडीओ पाहा :

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.