जरंडेश्वर तर हिमनगाचे टोक, अमित शाहांना पत्र लिहितोय, एक एक नाव समोर येईल : चंद्रकांत पाटील
हा विषय जरंडेश्वरपुरता (Jarandeshwar Sahkari Sugar Karkhana ) मर्यादित नाही. मी याबाबत गृहमंत्री अमित शाहांना (Amit Shah) पत्र लिहितोय, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हटलं.
पुणे : “ जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीची कारवाई हे हिमनगाचे टोक आहे. हा विषय जरंडेश्वरपुरता (Jarandeshwar Sahkari Sugar Karkhana ) मर्यादित नाही. मी याबाबत गृहमंत्री अमित शाहांना (Amit Shah) पत्र लिहितोय, लिलावात विकल्या गेलेल्या सर्व कारखान्यांची चौकशी करण्याची मागणी करणार आहे”, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली. ते पुण्यात बोलत होते. (ED action on Jarandeshwar sugar factory is the tip of the iceberg, writing a letter to Amit Shah said BJPs Chandrakant Patil on Ajit Pawar)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नातेवाईक असलेल्या राजेंद्र घाडगे यांच्या साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने कारवाई केली आहे. जरंडेश्वर शुगर्स या कारखान्याची तब्बल 66 कोटी रुपयांची मालमत्ता सील करण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आले आहेत.
याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, “मी कोणाला धमकी देत नाही, पण हा विषय जरंडेश्वरपुरता मर्यादित नाही. एक एक नाव समोर येईल. लिलावात विकल्या गेलेल्या सर्व कारखान्यांची चौकशी करावी. त्याबाबत मी गृहमंत्री अमित शाहांना पत्र लिहितोय”
अजित पवारांची प्रतिक्रिया
अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या मामाच्या साखर कारखान्यावर करण्यात आलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया व्यक्त केली. या कारखान्याच्या खरेदी-विक्रीसह कारखान्याच्या नफ्या-तोट्याचीही माहिती दिली. आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, सुंदरबाग सोसायटीने याबाबत याचिका दाखल केली होती. त्यात 14 कारखान्यांमध्ये जरंडेश्वर कारखाना होता. 2016 आणि 2017 मध्ये सर्व रितसर परवानग्या घेतल्या होत्या. माझ्याच नातेवाईकांचा तो कारखाना आहे. ईडीला चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. यापूर्वी सीआयडीने चौकशी केली त्याच्यातून काही निष्पन झालं नाही. सगळीकडून पॉझिटिव्ह गोष्टी झाल्या आहेत. त्यासंदर्भात ज्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी जायचं आहे तिकडे जाणार, वकिलांचा सल्ला घेऊन अपिलामध्ये जातील, असं अजितदादा म्हणाले.
काय आहे जरंडेश्वर कारखाना प्रकरण?
जरेंडेश्वर सहकारी साखर कारखाना हा सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथे आहे. सध्याच्या मालकांनी हा कारखाना 2010 सालात 65 कोटी 75 लाख रुपयांना खरेदी केला होता. हा कारखाना सध्या मेसर्स गुरू कमोडिटी सर्विसेस प्रा. लि यांच्या मालकीचा आहे. हा कारखाना मेसर्स जरेंडेश्वर शुगर मिल प्रा लिमिटेडला भाड्याने देण्यात आला आहे. मेसर्स जरडेश्वर प्रा लिमिटेड कंपनीत मेसर्स सपार्किंग सोईल प्रा लिमिटेड कंपनी ही भागीदार कंपनी आहे. ईडीने केलेल्या तपासात मेसर्स स्पार्कलिंग कंपनी ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित आहे.
जरांडेश्वर सहकारी साखर कारखान्याची 2010 सालात विक्री करण्यात आली होती.यावेळी तो मूळ किमतीच्या कमी किमतीत विकण्यात आल्याचा आरोप आहे. त्याचप्रमाणे त्याची कार्यपद्धती योग्यपणे पाळण्यात आली नव्हती. याच काळात अजित पवार हे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर होते. याच काळात हा कारखाना मेसर्स गुरू कमोडिटी सर्विसेस प्रा लिमिटेड ला विकण्यात आला. त्यानंतर तात्काळ हा कारखाना जरंडेश्वर शुगर मिल प्रा लि ला भाडे तत्वावर देण्यात आला. या जरंडेश्वर शुगर मिल्स प्रा ली मध्ये मोठ्या प्रमाणात संपार्किंलीग सोईल प्रा ली. कंपनीचा हिस्सा आहे. ही कंपनी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या मालकीची आहे.
जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना हा प्रथम मेसर्स गुरू कमोडीटी प्रा ली कंपनीने विकत घेतला होता. मात्र, ही गुरू कमोडिटी कंपनी डमी कंपनी असल्याचा ईडीच्या अधिकाऱ्यांना संशय आहे. जरंडेश्वर शुगर मिल प्रा ली ने पुणे जिल्हा कॉ ऑप बँकेकडून सुमारे 700 कोटी रुपये लोन घेतलं आहे. हे कर्ज 2010 पासून पुढील काळात घेतलं आहे.
VIDEO : चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
संबंधित बातम्या:
मामाच्या साखर कारखान्यावर ED ची कारवाई; अजितदादांची पहिली प्रतिक्रिया