Anil Parab ED Raid : अनिल परबांच्या निवासस्थानासह दापोलीतील साई रिसॉर्टवरील छापेमारीही संपली, आर्किटेक्टच्या माध्यमातून रिसॉर्टचं मूल्यांकन!

साई रिसॉर्टवरील छापेमारी तब्बल 15 तासांपेक्षा अधिक काळ चालली. या छापेमारीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. महत्वाची बाब म्हणजे ईडीच्या अधिकाऱ्यांनी आर्किटेक्टच्या माध्यमातून रिसॉर्टचं मूल्यांकन केलं, रिसॉर्टच्या जागेची मापं घेतली.

Anil Parab ED Raid : अनिल परबांच्या निवासस्थानासह दापोलीतील साई रिसॉर्टवरील छापेमारीही संपली, आर्किटेक्टच्या माध्यमातून रिसॉर्टचं मूल्यांकन!
अनिल परब, साई रिसॉर्टImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 11:01 PM

रत्नागिरी : शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या सरकारी आणि खासगी निवासस्थानी, दापोलीतील साई रिसॉर्टवर आणि परब यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर आज अमंलबजावणी संचलनालय (Enforcement Directorate) अर्थात ईडीने छापेमारी केली. सकाळी लवकर सुरु झालेली ही छापेमारी 13 ते 15 तास चालली. मुंबईतील निवासस्थानांवरील छापेमारी संपल्यानंतर दापोलीतील साई रिसॉर्टवरूनही (Sai Resort) ईडीचे अधिकारी बाहेर पडले. साई रिसॉर्टवरील छापेमारी तब्बल 15 तासांपेक्षा अधिक काळ चालली. या छापेमारीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. महत्वाची बाब म्हणजे ईडीच्या अधिकाऱ्यांनी आर्किटेक्टच्या माध्यमातून रिसॉर्टचं मूल्यांकन केलं, रिसॉर्टच्या जागेची मापं घेतली.

अनिल परबांची पहिली प्रतिक्रिया काय?

तत्पूर्वी मुंबईतील परब यांच्या शासकीय निवासस्थानावरील ईडीची छापेमारी संपल्यानंतर अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘आज ईडीच्या अधिकाऱ्यांनी माझ्या शासकीय निवासस्थान, मी राहतो त्या घरावर, माझ्याशी संबंधित काही लोकांवर छापे घातलेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या बातम्या सतत येत होत्या. ईडीची कारवाई होणार हे बोललं जात होतं. यामागचा गुन्हा काय हे तपासलं असता असं लक्षात आलं की दापोली इथलं साई रिसॉर्ट. जे मी सांगतोय की त्याचे मालक सदानंद कदम आहे. त्यांनी ते कागदपत्रांद्वारे सांगितलं आहे. त्यांनी कोर्टातही तसा दावा केलाय. त्यांनी खर्चाचा हिशेबही दिलाय. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर आयटीची रेड पडली आहे. हे रिसॉर्ट अजूनही सुरु झालं नाही. हे रिसॉर्ट पूर्ण झालेलं नाही. असं असताना पर्यावरणाची दोन कलम लावून या रिसॉर्टमधून सांडपाणी समुद्रात जातं, त्याबाबत केंद्रीय पर्यावरण खात्यानं गुन्हा दापोली पोलीस ठाण्यात दाखल केल्या. हे रिसॉर्ट चालू नाही तरीही माझ्या नावानं, साई रिसॉर्टच्या नावे अशी नोटीस काढली गेली. एक तक्रार देण्यात आली. त्या तक्रारीला प्रेडिगेटेड ऑफेन्स समजून आज ईडीने माझ्यावर कारवाई केलीय’, असं अनिल परब म्हणाले.

हे सुद्धा वाचा

‘मी कायद्याला सामोरा जायला तयार’

त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहे. मी पहिल्यापासून सांगतोय की ज्या यंत्रणा मला कुठलाही प्रश्न विचारतील त्याला उत्तर देण्यास मी बांधील आहे. पूर्वीही उत्तरं दिली होती. आजही दिली. पुढेही उत्तरं देण्याची माझी तयारी आहे. समुद्रात जर बंद रिसॉर्टचं सांडपाणी जात असेल तर त्यात मनी लॉन्ड्रिंगचा मुद्दा येतो कुठे. याचा खुलासा कोर्टात होईल. मी कायद्याला सामोरा जायला तयार आहे. कायद्यान्वये काय होऊ शकतं, काय होऊ शकत नाही हे मला माहिती आहे, असंही परब यांनी सांगितलं.

संजय कदम काय म्हणाले?

मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय शिवसेना नेते संजय कदम यांच्या घरावर सुमारे 12 तास चाललेल्या ईडीच्या कारवाईनंतर ईडीचे पथक बाहेर आले. त्यानंतर संजय कदम म्हणाले की, आम्ही ईडीच्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत, ईडी पुन्हा पुन्हा फक्त मंत्री अनिल परब यांच्याबाबत विचारत होती. आधी इनकम टॅक्स, मग ईडीची कारवाई ही जाणीवपूर्वक केली जात आहे. पण आगामी बीएमसी निवडणुकीत जनता भाजपला त्याचे उत्तर देईल, असा इशारा संजय कदम यांनि दिलाय. तसंच ईडीने त्यांना नोटीस दिली असून सोमवारी पुन्हा चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावले आहे.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.