Saamana : वेळीच सावध व्हा, शहाणे व्हा, शिवसेनेच्या मुखपत्रातून बंडखोरांना इशारा, भाजपवर टीकास्त्र

आज दैनिक सामनातून बंडखोरांना कायम 'माजी' करण्याचा इशारा देण्यात आलाय.

Saamana : वेळीच सावध व्हा, शहाणे व्हा, शिवसेनेच्या मुखपत्रातून बंडखोरांना इशारा, भाजपवर टीकास्त्र
एकनाथ शिंदे विरुद्ध संजय राऊतImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 6:53 AM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केला आणि शिवसेनेत फुट पडल्याचं चित्र आहे. एकनाथ शिंदे  यांच्यासोबत शिवसेनेचे 35 पेक्षा अधिक आमदार आसामच्या गुवाहाटीमध्ये आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार मोठ्या संकटात सापडल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फेसबुक लाईव्ह करत एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना (Shivsena Rebel MLA) भावनिक साद घातलीय. तर विरोधकांनी उद्धव ठाकरे कांगावा करत असल्याचा आरोप केलाय. भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर आणि भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीय. दरम्यान, आज दैनिक सामनाच्या अग्रलेखातून बंडखोरांना वेळीत शहाणे व्हा, असा सूचक इशारा देण्यात आलाय.

अग्रलेखात काय म्हटलंय?

बंडखोरांना दैनिक सामनाच्या अग्रलेखातून इशारा देण्यात आलाय. अग्रलेखात म्हटलंय की, ‘राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीतील ‘जादा’ विजय कोणामुळे मिळाला हे आता उघड झाले. आता तर आमदारांना डांबून ठेवले आहे. दहशतीच्या तलवारीखाली ठेवले आहे हे परत आलेल्या नितीन देशमुखांनी स्पष्ट केले. शिवसेनेने असे अनेक प्रसंग पचवले आहेत, अशा संकटांच्या छातीवर पाय ठेवून शिवसेना उभी राहिली. सत्ता असली काय आणि गेली काय, शिवसेनेसारख्या संघटनेला फरक पडत नाही. फरक पडणार आहे तो भाजपच्या प्रलोभनांना व दबावास बळी पडलेल्या आमदारांना. शिवसैनिकांनी ठरवले तर हे सगळेच लोक कायमचे ‘माजी’ होऊ शकतील. यापूर्वीचा बंडाचा इतिहास तेच सांगतो. वेळीच सावध व्हा, शहाणे व्हा!”

हे सुद्धा वाचा

‘सामना’तून इशारा, मुख्यमंत्र्यांकडून भावनिक आवाहन

आज दैनिक सामनातून बंडखोरांना कायम ‘माजी’ करण्याचा इशारा देण्यात आलाय. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हमधून बंडखोरांना भावनिक आवाहन केलंय. यामुळे एकीकडे कडक इशारा आणि दुसरीकडे भावनिक आवाहन, असा विरोधाभास दिसून येतोय.

उद्धव ठाकरेंचं भावनिक आवाहन काय?

उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. त्यात त्यांनी  मी नेमकं काय बोलणार? मला दुख कशाचं झालं? आश्चर्य कशाचं वाटलं? दुखं कशाचं वाटलं? काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणाली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री हवे. दोन्ही पक्ष स्वतंत्र आहेत, त्यांचा विचार आहे. सत्तेसाठी आपण एकत्रं आलो. आज सकाळी कमलनाथ यांनी फोन केला. काल पवारांनी फोन केला. आम्ही तुमच्यासोबत आहे असं सांगितलं, त्यांनी भरवसा ठेवला. पण माझीच लोकं म्हणत आहेत की मी मुख्यमंत्री नको. ते मला माझं मानतात की नाही माहीत नाही. तुम्ही इथं येऊन का बोलले नाही? माझ्यासमोर बोलायला हवं होतं. तुम्ही मुख्यमंत्री म्हणून नालायक आहात, तुम्ही नकोत, असं त्यांनी बोलायला हवं होतं. मला एकाही आमदाराने सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्रीपदी नको तर मी मुख्यमंत्रीपद घेणार नाही. आजच मी वर्षावरून मातोश्रीवर मुक्काम हलवतो. मला सत्तेचा मोह नाही. तुम्ही हे कशाला करत आहात? त्यामुळे कुणाचं नुकसान करायचं आहे? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केलाय.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.