Rashmi Thackeray: शिवसेना आणि सरकार वाचवण्यासाठी रश्मी ठाकरेही मैदानात, बंडखोरांच्या कुटुंबियांना फोन

नाराज शिवसेना आमदारांच्या बंडानंतर सर्वच काडीमोड असे अद्यापतरी झालेले नाही. कारण एकीकडे रश्मी ठाकरे ह्या बंडखोर आमदारांच्या पत्नींच्या संपर्कात आहेत तर दुसरीकडे मेसेजद्वारे मुख्यमंत्र्यांचाही संवाद हा सुरु आहे. दरम्यान, आपण शिवसेनेसोबतच असल्याच्या आमदारांच्या वक्तव्यामुळे संभ्रम स्थिती निर्माण होत आहे तर गुवाहटीहून आमदार हे मुंबईत परतले तर चित्र वेगळे असेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांना आहे.

Rashmi Thackeray: शिवसेना आणि सरकार वाचवण्यासाठी रश्मी ठाकरेही मैदानात, बंडखोरांच्या कुटुंबियांना फोन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे
Follow us
| Updated on: Jun 26, 2022 | 12:38 PM

मुंबई : बंडखोर आमदारांमुळे पक्षाची मोठी हानी झाली आहे. हे नुकसान भरुन काढण्यासाठी पक्ष प्रमुख तथा (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच मैदानात उतरले असे नाहीतर आख्खं ठाकरे कुटुंब पक्षाला सावरण्याचा प्रयत्न करीत आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत पर्यंटन मंत्री आदित्य ठाकरेही आता मैदानात उतरुन पदाधिकाऱ्यांचे मेळावे आणि विविध कार्यक्रमा्ला हजर राहत आहेत. असे असताना (Rashmi Thackeray) रश्मी ठाकरे या देखील मागे राहिलेल्या नाहीत. त्यांनी (Rebel MLA) बंडखोर आमदारांच्या पत्नींना फोन करुन हे बंड थंड करण्याबाबत पतीला सांगावे असे म्हटले आहे. त्यामुळे जो-तो आपआपल्या पध्दतीने पक्ष सावरण्यासाठी आणि वाढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नानंतर आता रश्मी ठाकरे यांना हे बंड मागे घेण्याबाबत कितपत यश मिळेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

नेमका संवाद काय ?

शिवसेनेतील बंडखोर आमदारांमुळे पक्ष आणि सरकार हे दोन्हीही संकटात आहे. आमदारांच्या या भूमिकेमुळे राज्याचेही नुकसान होत आहे .याबद्दलची अधिक माहिती रश्मी ठाकरे ह्या बंडखोर आमदारांच्या पत्नीला देत असून त्यांनी हे बंड थंड करण्याबाबत राजी करावे अशा प्रकारचा संवाद त्या फोनवरुन करीत आहेत. आतापर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळ्या माध्यमातून बंडखोर आमदारांना मुंबईत परत या असे आवाहन केले. मात्र, एकनाथ शिंदे हे आपल्या मागण्यावर ठाम आहे. जिथे उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न संपले तिथे आता रश्मी ठाकरे ह्या वेगळ्या पध्दतीने भूमिका निभावत आहेत.

उद्धव ठाकरे ही संपर्कात

नाराज शिवसेना आमदारांच्या बंडानंतर सर्वच काडीमोड असे अद्यापतरी झालेले नाही. कारण एकीकडे रश्मी ठाकरे ह्या बंडखोर आमदारांच्या पत्नींच्या संपर्कात आहेत तर दुसरीकडे मेसेजद्वारे मुख्यमंत्र्यांचाही संवाद हा सुरु आहे. दरम्यान, आपण शिवसेनेसोबतच असल्याच्या आमदारांच्या वक्तव्यामुळे संभ्रम स्थिती निर्माण होत आहे तर गुवाहटीहून आमदार हे मुंबईत परतले तर चित्र वेगळे असेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांना आहे. यासंदर्भात काही आमदार संपर्कात असल्याचे शिवसेनेने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. मात्र, पक्ष अडचणीत असताना ठाकरे कुटुंब सावरण्यासाठी मैदानात उतल्याचे चित्र राज्यात आहे.

हे सुद्धा वाचा

संख्याबळ असल्याचा बंडखोरांचा दावा

बंडखोर आमदारांना स्वगृही परतण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न सुरु असले तरी या आमदारांची भूमिका काही वेगळीच आहे. आतापर्यंत उपसभापती यांनी 16 आमदारांना अपात्रतेच्या नोटिसा पाठवल्या आहेत. तर असे अपात्र ठरवता येत नाही या मतावर आमदार ठाम आहेत. शिवाय याविरोधात कोर्टात जाण्याची त्यांनी तयारी सुरु केली आहे. शिवसेनेच्या एकूण आमदारांपैकी दोन तृतीयांश आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा या बंडखोर गटाने केला आहे. तर 38 आमदारांचे पत्र हे उपसभापती आणि राज्यपालांना पाठवले आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.