रस्त्याला टिपू सुलतान नाव देण्यास 8 वर्षांपूर्वी भाजपचा होकार, महापौर पेडणेकरांनी पाठिंब्याचं लेटरच दाखवलं!

गोवंडी येथील उद्यानाला ‘टिपू सुलतान’ नाव देण्यास भाजपने विरोध दर्शवित महापौरांकडे दाद मागितली आहे. प्रत्यक्षात 2013 मध्ये सत्तेत असताना भाजपने गोवंडीतील एका रस्त्याला ‘टिपू सुलतान’ नाव देण्यास पाठिंबा दिला होता, असा दावा करीत शिवसेनेने भाजपलाच अडचणीत आणले आहे.

रस्त्याला टिपू सुलतान नाव देण्यास 8 वर्षांपूर्वी भाजपचा होकार, महापौर पेडणेकरांनी पाठिंब्याचं लेटरच दाखवलं!
किशोरी पेडणेकर, मुंबई महापौर
Follow us
| Updated on: Jul 17, 2021 | 8:27 AM

मुंबई : गोवंडी येथील उद्यानाला ‘टिपू सुलतान’ नाव देण्यास भाजपने विरोध दर्शवित महापौरांकडे दाद मागितली आहे. प्रत्यक्षात 2013 मध्ये सत्तेत असताना भाजपने गोवंडीतील एका रस्त्याला ‘टिपू सुलतान’ नाव देण्यास पाठिंबा दिला होता, असा दावा करीत शिवसेनेने भाजपलाच अडचणीत आणले आहे.

राजकारण करण्यासाठीच नामकरणावरून आगपाखड

राजकारण करण्यासाठीच नामकरणावरून आगपाखड सुरू असल्याचा टोला महापौर किशोरी पेडणेकर यांनी लगावला आहे. गोवंडी, कचराभूमी येथील एका उद्यानाला ‘टिपू सुलतान’ नाव देण्याच्या प्रस्तावाला विरोध करीत बाजार उद्यान समितीच्या सभेचा भाजप सदस्यांनी त्याग केला होता.

महापौर पेडणेकरांनी पाठिंब्याचं लेटरच दाखवलं!

गोवंडी, बाजीप्रभू देशपांडे मार्गापासून रफीक नाल्यापर्यंतच्या मार्गाला तत्कालीन अपक्ष नगरसेवक मोहम्मद सिराज शेख यांनी ‘टिपू सुलतान’ नाव देण्याची मागणी केली होती. या मागणीला भाजप सदस्याने अनुमोदन दिले होते. त्यामुळे भाजप नगरसेवकांकडून शिवसेनेला नाहक बदनाम करण्यासाठीच आरोप केले जात असल्याचे महापौरांनी सांगितले. 2013 मध्ये स्थापत्य समितीत मंजुरीसाठी मांडलेल्या, भाजपचा पाठिंबा असलेल्या प्रस्तावाची प्रतच त्यांनी दाखविली.

महापौर पेडणेकर काय म्हणाल्या?

शिवसेनेने हिंदुत्व कधीही सोडलेले नाही. शिवसेनेला बदनाम करण्यासाठी या प्रकरणाला राजकीय आणि धार्मिक रंग भाजप देत आहे. भाजपच्याच पाठिंब्याने मुंबईत या आधीही काही ठिकाणी ‘टिपू सुलतान’ नाव देण्यात आले आहे, असं महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

टिपू सुल्तानाचं नाव देण्याची मागणी कुणी केली?

गोवंडीतील महापालिकेच्या उद्यानाला टिपू सुलतान (Tipu Sultan) याचे नाव देण्याची मागणी समाजवादी पक्षाच्या नगरसेविकेने केली. समाजवादी पक्षाच्या नगरसेविका रुक्साना सिद्दीकी (Rukhsana Nazim Siddiqui) यांनी या संदर्भात मागणी केली होती. त्या मुंबई महापालिकेच्या पूर्व उपनगरातील ‘एम/पूर्व’ विभागातील प्रभाग क्र. 136 मधून नगरसेविका आहेत. प्रभागातील साहीनाका डम्पिंग रोड येथील पालिका उद्यानाला टिपू सुलतान याचे नाव देण्याबाबत रुक्साना सिद्दीकी यांनी मागणी केली होती.

(Eight years ago, BJP agreed to name the road Tipu Sultan, Mayor Pednekar showed a letter of support)

संबंधित बातम्या :

देशातील डेल्टा प्लसच्या रुग्णांची संख्या 70 च्या आसपास, मुंबई महापालिका तिसऱ्या लाटेसाठी तयार: किशोरी पेडणेकर

तिसऱ्या लाटेसाठी मुंबई महापालिका सज्ज, खर्च वाया गेला तरी चालेल पण यंत्रणा तशाच उभ्या राहतील: किशोरी पेडणेकर

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.