Video : आदित्य ठाकरे यांना डिवचणारे पोस्टर जेव्हा एकनाथ शिंदे वाचतात, तेव्हा नेमकं काय होतं? पाहा…
शिंदेगटातील आमदारांनी महाविकास आघाडीच्या विरोधात आवाज उठवला. यात त्यांनी आदित्य ठाकरेंच्या विरोधात घोषणा दिल्या. मंत्री शंभूराज देसाई यांनी आदित्य ठाकरेंवर टीका करणारं पोस्टर त्यांना दाखवलं. तेव्हा काय झालं? वाचा...
मुंबई : विधिमंडळ अधिवेशनादरम्यान (Maharashtra Assembly Monsoon Session) अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळतोय. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार ‘घोषणायुद्ध’ सुरु आहे. दोन्ही बाजूने एकमेकांविरोधात घोषणा दिल्या जात आहेत. अश्यात आज सकाळी शिंदेगटातील आमदारांनी महाविकास आघाडीच्या विरोधात आवाज उठवला. यात त्यांनी आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) विरोधात घोषणा दिल्या. पण ही घोषणाबाजी सुरु असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) विधिमंडळात पोहोचले. विधानसभेत जात असतानाच त्यांनी आमदारांना घोषणा देताना पाहिलं. तेव्हा ते दोन क्षण थांबले. तेव्हा मंत्री शंभूराज देसाई यांनी आदित्य ठाकरेंवर टीका करणारं पोस्टर त्यांना दाखवलं. तेव्हा त्यांनी ते पाहिलं अन् मिश्किल हसत ते सभागृहात गेले.
आज सत्ताधारी पक्षातील आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी शिवसेना आणि विशेषत: माजी मंत्री आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरेंच्या विरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनावेळी त्यांच्या हातात एक पोस्टर पाहायला मिळालं. यावर आदित्य ठाकरेंचं व्यंगचित्र पाहायला मिळालं. आदित्य ठाकरे गाढवावर उलटे बसलेले दिसत आहेत. आदित्य ठाकरेंची दिशा चुकली. पर्यावरण खातं त्यांनी घरात राहून सांभाळलं, अश्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. तर आदित्य ठाकरेंवरही जोरदार टीका करण्यात आली. या आंदोलनावेळी एक पोस्टर आणण्यात आलं होतं. यावर आदित्य ठाकरे घोड्यावर बसलेले दिसले. सर आदित्य ठाकरेंची दिशा चुकलेली आहे. ते पर्यावरण खात्याचे मंत्री आहेत. पण त्यांनी घरात राहूनच काम केलं, असं यावेळी शिंदे गटाचे आमदार म्हणताना दिसले.
आदित्य ठाकरे म्हणाले…
या घोषणाबाजी झाल्यानंतर माध्यमांनी आदित्य ठाकरेंशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीची भिती वाटते. त्याच गोष्टीला विरोध केला जातो. आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर ज्यांनी आंदोलन केलं, त्यांची मला किव येते. 50 खोके घेतले खरे पण त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. पण त्यांना ते मिळालं नाही. म्हणून मुख्यमंत्र्यांना इंप्रेस करण्यासाछी सगळं केलं जातंय. गळ्यात पोस्टर लावून त्यांना आंदोलन करावं लागतंय. त्याची मला किव येते, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
कालही विधिमंडळ परिसरात गोंधळ झाला. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी आणि शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्यात बाचाबाची झाली. त्यावर आजच्या सामनातूनही टीका करण्यात आली आहे.