Eknath Shinde : ‘बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच’ उद्धव आणि राज ठाकरेंआधी गुरुपौर्णिमेला एकनाथ शिंदेचं ट्वीट!

Eknath Shinde Tweet : सकाळी 7 वाजून 25 मिनिटांनी एकनाथ शिंदे यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त ट्वीट कर अभिवादन केलं होतं

Eknath Shinde : 'बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच' उद्धव आणि राज ठाकरेंआधी गुरुपौर्णिमेला एकनाथ शिंदेचं ट्वीट!
पाहा नेमकं एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलं..Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 13, 2022 | 8:00 AM

मुंबई : आज गुरुपौर्णिमेनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ट्वीट केलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच, असं म्हणत त्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त (Guru Poornima) अभिवादन केलं. सकाळी 7 वाजून 25 मिनिटांनी एकनाथ शिंदे यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त ट्वीट कर अभिवादन केलं होतं. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही, असंही त्यांनी ट्वीट मध्ये म्हटलं आहे. ट्वीटसोबत एक फोटोही एकनाथ शिंदे यांनी शेअर केलाय. या फोटोमध्ये बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि आनंद दिघे यांचाही फोटो छापण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांनी नुकतीच बंडखोरी करत खळबळ उडवून दिली होती. शिवसेनेच्या 40 आमदारांचा पाठिंबा मिळवण्यात त्यांना यश आलं. त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याची मागणी उद्धव ठाकरेंकडे केली होती. अखेर शिंदेंच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं. त्यानंतर आता शिंदे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष महाराष्ट्राच्या राजकारण पाहायला मिळतोय.

उद्धव-राज यांचं ट्वीट कुठंय?

एकनाथ शिंदे यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त अभिवादनचं ट्वीट केलं. विशेष शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ट्वीटच्या आधी एकनाथ शिंदे यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त ट्वीट करत आपण बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणार आहोत, असं थेट सूचित केलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या ट्वीटला अधिक महत्त्व प्राप्त झालंय.

हे सुद्धा वाचा

गुरुपौर्णिमेचं निमित्त..

ठाण्यात एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघेंच्या मार्गदर्शनाखाली राजकारणाचे धडे गिरवले होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळासह आनंदाश्रमात जाऊनही अभिवादन केलं होतं. त्यानंतर त्यांनी आता ट्वीट करत गुरुपौर्णिमेनिमित्त पुन्हा एकदा अभिवादन केलंय.

अनपेक्षितपणे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्याची घोषणा झाल्यानंतर सगळ्यांना धक्का बसला होता. राजकीय घडामोडींमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ लगेचच देवेंद्र फडणवीस यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. आता सरकार स्थापनेनंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे. मंत्रिमंडळ विस्तार नेमका कधी होतो, याकडे राज्याचं लक्ष लागलंय. तर दुसरीकडे शिवसेनेनं राज्यपालांना पत्र लिहून शिंदे-फडणवीस सरकार बेकायदेशीर असल्याचा आरोप केला आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.