Udayanraje Bhosale : भाजप राज्यपालांकडे का जात नाही? उदयनराजेंनी इंग्रजीतून म्हटलं, ‘सी… ‘ आणि पुढे म्हणाले

Eknath Shinde vs Shiv Sena LIVE : सागर बंगल्यावरुन बाहेर आल्यानंतर उदयनराजे भोसले हे पत्रकारांशी बोलत होते.

Udayanraje Bhosale : भाजप राज्यपालांकडे का जात नाही? उदयनराजेंनी इंग्रजीतून म्हटलं, 'सी... ' आणि पुढे म्हणाले
काय म्हणाले उदयनराजे?Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 3:55 PM

मुंबई : भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosale) यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. राजकीय भूकंप (Politics Crisis) राज्यात असताना भाजप आता राज्यपालांकडे जाऊन सत्तास्थापनेचा दावा का करत नाही? भाजप (BJP) राज्यपालांकडे कधी जाणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. खरंतर हा प्रश्न आधी इंग्रजीतूनच त्यांना उपस्थित करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना उदयनराजे भोसले यांनी सुरुवातही इंग्रजीतूनच केली होती. ते म्हणाले, सी.. (बघा).. आणि नंतर पुन्हा हिंदीत त्यांनी उत्तर द्यायला सुरुवात केली. पक्षाचे वरीष्ठ लोकं याबाबत ठरवतील, आणि निर्णय घेतील, असं विधान त्यांनी केलंय. पण एक निश्चित आहे, हे सरकार पडणार आहे. हा सगळा नंबरगेम आहे. नंबर ज्याच्याकडे तो सत्तेत येणार, असं त्यांनी म्हटलंय.

बंड होणार हे उदयनराजेंना आधीच माहित होतं?

सागर बंगल्यावर उदयनराजे भोसले गेले होते. राज्यातील राजकीय घडामोडींचे पडसाद जसे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेत उमटत आहेत. त्याचप्रमाणे बैठकसत्र भाजपच्या गोटातही सुरुय. सागर बंगल्यावर भाजप नेत्यांची खलबतं सुरु आहेत. सागर बंगल्यावरुन बाहेर आल्यानंतर उदयनराजे भोसले हे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाचं जराही आश्चर्य वाटलं नाही, असं म्हटलंय. कुणाचं नाव घेवून माझं तोंड खराब करायचा नाही, तसंच आजारपण कुणाच्या नशीबाला येवू नये, असंही महत्त्वाचंय. आजारी आहेत त्यांनी लवकरात लवकर बरं व्हावे, असंही उदयनराजे म्हणालेत.

एकनाथ शिंदेच्या बंडामुळे तयार झालेला राजकीय स्थिती ही आशर्य वाटण्यासारखी नाही, असं ते म्हणालेत. निवडणून आलेले आमदार विचार करता, अशी आघाडी कधीचं झाली नसती. महापालिका , जिल्हापरिषदा निवडणुकांना सामोर जायचं.अनैसर्गिक अशी आघाडी होती, असं ते म्हणाले आहेत.

हे सुद्धा वाचा

पुढे काय?

एकनाथ शिंदे यांच्या 37 पेक्षा जास्त आमदार आहेत. असं असताना भाजप आणि एकनाथ शिंदे गट सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपालांकडे का जात नाही? भाजप अजूनही वेट एन्ड वॉचच्या स्थितीत का आहे? असाही प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. मात्र या प्रश्नाचं उत्तर न देताच उदयनराजे भोसले निघून गेले.

सध्याच्या घडीला एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे 50 आमदार असल्याचा दावा केलाय. 37 आमदारांचा आपल्याला पाठिंबा आहे, असं पत्रही त्यांनी विधानसभा उपाध्यक्षांसह राज्यपाल आणि विधीमंडळ सचिवांना दिले आहेत. आता यानंतर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची भीती आहे. राजकीय स्थिती पाहता, नेमकी कोणती समीकरणं येत्या काळात तयार होतात, यावरुन तर्क वितर्कांना उधाण आलंय.

'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.