Eknath Shinde : एकनाथ जागेवरच आहे, अजित पवारांच्या प्रश्नाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे उत्तर

राज्यात पावसाळी अधिवेशन उद्या सुरू होत आहे. चहापानाच्या कार्यक्रमाला विरोधकांनी बहिष्कार टाकलाय आणि 7 पानी पत्र आम्हाला दिल आहे.

Eknath Shinde : एकनाथ जागेवरच आहे, अजित पवारांच्या प्रश्नाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे उत्तर
Eknath Shinde : एकनाथ जागेवरच आहे, अजित पवारांच्या प्रश्नाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे उत्तर Image Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Aug 16, 2022 | 8:00 PM

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या आगोदर भाजप (BJP) आणि शिंदे गटातील मंत्र्यांनी विरोधकांच्या सडकून टीका केली आहे. राज्यातील विरोधी पक्षाने आज सध्याच्या शिंदे सरकारला सात पानी पत्र दिलं आहे. तसेच अजित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे सरकार कसं घडलं आहे हे सांगितलं आहे. त्यानंतर मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadanvis) त्यांना झणझणीत उत्तर दिले आहे. राज्यात जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रात यावेळी समाधानकारक पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे शेतीचे अधिक नुकसान झालेले नाही. त्यामुळे विरोधकांनी त्याची काळजी करु नये असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना एकनाथ कुठे आहे असा टोला लगावला त्यावर मुख्यमंत्र्यांनी मी माझ्या जाग्यावर आहे असं उत्तर दिलं आहे.

अजित पवारांचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना टोला

देवेंद्र फडणवीस म्हणतात काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचे सरकार लबाड यांचा सरकार होतो. माझा सवाल आहे काय लबाडी केली. नुसतं असं सांगून चालणार नाही. आम्ही त्यावेळी शेतकऱ्यांना करोडो रुपयांची मदत केली आहे. आम्ही शेतकऱ्यांमध्ये जात होतो पण मी स्वतः देखील शेतकरी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काय मदत करायची आहे याची मला पूर्णपणे जाणीव आहे. कोरोनाचा सावट असताना आणि आर्थिक परिस्थिती बेताच्या असताना देखील आम्ही शेतकऱ्यांना मदत केली होती. आम्ही त्यातून मार्ग काढला होता. राज्याला कर्जबाजारी न करता केंद्र सरकारने ज्या मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या त्या नियमाच्या अधीन राहून आम्ही कमी कर्ज काढून कोरोना काळातही पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली होती असा टोला अजित दादांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना लगावला होता.

हे सुद्धा वाचा

देवेंद्र फडणवीसांच अजित पवारांना उत्तर

राज्यात पावसाळी अधिवेशन उद्या सुरू होत आहे. चहापानाच्या कार्यक्रमाला विरोधकांनी बहिष्कार टाकलाय आणि 7 पानी पत्र आम्हाला दिल आहे. यातली 4 पान ही आमच्याच काळातली आहेत. त्यात फारसा फरक नाही. दीड महिन्यापूर्वी विरोधक हे सत्तेत होते हे विरोधक बहुधा विसरलेत. जे जे त्यांनी केल नाही, की ते सर्व आम्ही कराव अशी अपेक्षा विरोधक करत आहेत. त्यांच्या सर्व अपेक्षा आम्ही पुर्ण करू. बेईमानान आलेल सरकार म्हणत आहेत. गजनीची लागण झालेल हे विरोधक आहेत. आमच्याकडे लक्ष देण्यापेक्षा विरोधकांची एकजुट याकडे त्यांनी जास्त लक्ष द्यावे. विशेषता नैसर्गिक आपत्तीत लोकांपर्यंत सरकार लोकांपर्यंत जात आहेत. आता 46 दिवसात फरक दिसायला लागला आहेत. घोषित केलेली मदत आणि किमान मिळालेला मदत यात मोठा फरक आहे. थेट शेतकर्यांच्या खात्यात मदतीचा पैसा जाम होईल हा विश्वास आम्ही देत आहोत. जाता जाता 100 ची तरतूद जिथे होती. तिथे 500 रूपये वाटून टाकले होते, ते पुनरावलोकन करण गरजेच होतं. कुठल्या पक्षाच सरकार होत यापेक्षा जनतेच्या हिताच्या सगळ्या गोष्टी हे सरकार पुर्ण करणार, जे जे पुनरावलोकन आम्ही केलय किंवा करणार आहोत ते आम्ही जाहीर करू असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.