मी सलग सहा वेळा निवडून आलो, प्रसाद लाड यांनी एकदा जनतेतून आमदार व्हावं, खडसेंचं प्रत्युत्तर

भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकार्‍यांचा आतूनच ही जागा पाडण्यासाठी पाठिंबा होता" असा पुनरुच्चारही एकनाथ खडसे यांनी केला

मी सलग सहा वेळा निवडून आलो, प्रसाद लाड यांनी एकदा जनतेतून आमदार व्हावं, खडसेंचं प्रत्युत्तर
Follow us
| Updated on: Nov 17, 2020 | 12:03 PM

जळगाव : “जनतेने मला सलग सहा वेळा निवडून दिले, प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी जनतेमधून किमान एकदा तरी निवडून येऊन दाखवावे” असं खुलं आवाहन राष्ट्रवादीत प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केलं आहे. खडसे स्वतःच्या लेकीला का निवडून आणू शकले नाहीत? असं विचारत महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी खडसेंना ललकारले होते. (Eknath Khadse answers Prasad Lad criticism)

“मी भाजमधून गेल्याचा परिणाम होत नसेल, तर भाजपचे पदाधिकारी वारंवार ‘एकनाथ खडसे गेल्यावर परिणाम होणार नाही’ असं का म्हणतात? माझं नाव वारंवार का घेत आहेत?” असा सवाल एकनाथ खडसे यांनी विचारला. उत्तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची ताकद कमी झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी पूर्वीपेक्षा कमी आमदार निवडून आले आहेत, असं खडसे म्हणाले.

“माझ्या मुलीचा पराभव करण्यासाठी पक्षविरोधी काम करण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकार्‍यांचा आतूनच ही जागा पाडण्यासाठी पाठिंबा होता” असा पुनरुच्चारही एकनाथ खडसे यांनी केला.

प्रसाद लाड काय म्हणाले होते?

राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसे यांना डोक्यावर चढवले आहे. एकनाथ खडसे यांच्यात इतकीच ताकद होती, तर मग मुक्ताईनगरमधून ते स्वत:च्या मुलीला का निवडून आणू शकले नाहीत? असा सवाल भाजप नेते प्रसाद लाड यांनी उपस्थित केला होता. भाजप सोडल्यानंतर आता एकनाथ खडसे यांचा उलट प्रवास सुरु झाला आहे. स्वत:चं अस्तित्व दाखवण्यासाठी त्यांची तडफड सुरु आहे. त्यांना काय करायचं ते करू दे, आम्ही उत्तर महाराष्ट्रात आमच्या परीने काम सुरु ठेवू, असे प्रसाद लाड म्हणाले होते.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर वैयक्तिक हल्ला करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसे यांना डोक्यावर चढवत आहे.  उत्तर महाराष्ट्रात कोणी किती दौरे केले तरी भाजपचे कोणतेही नुकसान होणार नाही. उत्तर महाराष्ट्रात भाजपला मानणारा एक वर्ग आहे. त्या ठिकाणी गिरीश महाजनही आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या दौऱ्याने फरक पडणार नाही. आम्ही आमचे काम करत राहू, असेही प्रसाद लाड म्हणाले होते.

म्हणून पवारांचा दौरा रद्द

दरम्यान, प्रशासनाने परवानगी न दिल्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा उत्तर महाराष्ट्राचा दौरा रद्द करण्यात आला, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली. शरद पवार आल्यावर प्रचंड गर्दी होईल, कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होईल, म्हणून हा दौरा रद्द करण्यात आल्याचे खडसे म्हणाले.

संबंधित बातम्या:

भाजपमध्ये असतो तर वाजपेयी-अडवाणींसारखी माझी अवस्था झाली असती : एकनाथ खडसे

ऑपरेशन कमळबाबत इतक्यात सांगता येणार नाही, पण पक्ष सांगेल ते आम्ही नक्की करु : प्रसाद लाड

(Eknath Khadse answers Prasad Lad criticism)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.