Eknath Khadse | ‘सव्वा वर्षांपासून जेलमध्ये, सगळ्यांना जामीन मिळतो, माझ्या जावायला का नाही?’, एकनाथ खडसे यांचा सवाल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतंच एकनाथ खडसे यांच्या जावायाबद्दल वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता एकनाथ खडसे यांनी आपल्या जावायाला या प्रकरणात अटकवलं गेल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी गंभीर आरोपही केले आहेत.

Eknath Khadse | 'सव्वा वर्षांपासून जेलमध्ये, सगळ्यांना जामीन मिळतो, माझ्या जावायला का नाही?', एकनाथ खडसे यांचा सवाल
eknath khadseImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 22, 2023 | 7:39 PM

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात भाषण करताना आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या जावायाचा उल्लेख केला. सरकारकडून सत्तेचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप करत शरद पवार यांनी खडसेंच्या जावायाला गेल्या सव्वा वर्षांपासून सरकारने जेलमध्ये कोंडून ठेवल्याचा आरोप केला. त्यांना गेल्या सव्वा वर्षांपासून जेलमध्ये डांबून ठेवलं आहे. त्यांना लवकरच जामीन मिळाला नाही तर ते आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाहीत, असा धक्कादायक शरद पवारांनी केला. त्यानंतर आता एकनाथ खडसे यांनी गंभीर आरोप केले आहेत.

“मी भाजपमधून राष्ट्रवादीत गेल्यानंतर भोसरी जमिनीचं प्रकरण माझ्यामागे लावण्यात आलं. वास्तविक या जमिनीच्या प्रकरणात कुठलंही तथ्य नाही. या प्रकरणाशी माझाही काहीही संबंध नाही, असा अहवाल एसीपीने कोर्टात सादर केला होता. मी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केल्यामुळे जुना अहवाल बाहेर काढण्यात आला. त्या माध्यमातून माझ्यामागे ईडी लावण्यात आली”, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला.

‘राजकीय सुडापोटी माझ्यामागे ईडीची कारवाई’

“राजकीय सुडापोटी माझ्यामागे ईडीची कारवाई सुरू झाली. माझा जावई हा मुंबई आयआयटीचा एक स्टुडंट होता. त्यांनी कुठल्याही एजन्सीकडून पैसा काढलेला नाही. माझ्या जावायाला विनाकारण अटकवणं, त्याचा जामीन होऊ न देणं यासाठी परिपूर्ण प्रयत्न केले जात आहेत. सरकारच्या सर्वच एजन्सींकडून दबाव तंत्राचा वापर करून जावायचा जामीन होऊ देत नाहीत. सर्वांनाच जामीन मिळू शकतो. मात्र माझ्या जवायला का नाही?”, असा सवाल खडसेंनी केला.

हे सुद्धा वाचा

“वरिष्ठातली वरिष्ठ सरकारचे वकील हजर राहून माझ्या जावायाला जामीन न मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सरकारी यंत्रणेचा हेतू परस्पर दूरोपयोग सुरू आहे. कुठल्यातरी प्रकरणात अडकवून डांबून ठेवण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. यंत्रणेच्या माध्यमातून तरुण उद्योजकाला छेडण्याचा हा प्रयत्न आहे. जाणीवपूर्वक माझे विरोधक हा डाव टाकताय”, असं एकनाथ खडसे म्हणाले.

शरद पवार नेमकं काय म्हणाले होते?

एकनाथ खडसे हे आपले सहकारी आहेत. ते आधी भाजपात होते. त्यांनी भाजप सोडलं आणि त्यांच्यावर खटला दाखल झाला. त्यांच्या जावयाला अटक झाली. आज सव्वा दोन वर्ष झाली, त्यांच्या जावायाची केस कोर्टात नेत नाहीत आणि जेलमध्ये डांबून ठेवलं आहे”, असं शरद पवार म्हणाले.

“माहिती अशी आली की, त्यांच्यासोबत अन्य सहकारी जे तुरुंगात होते त्यांनी स्पष्ट कळवलं की, जर यांच्यामागची खोटी केस मागे घेतली नाही तर किंवा निकाल लवकर लागला नाही तर खडसेंचा जावई आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही. आज अशी अवस्था एका तरुणाची केली, ही तक्रार त्यांच्या कुटुंबाकडून ऐकायला मिळते”, असं शरद पवार यांनी आपल्या भाषणात सांगितलं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.