मी नेहमीच हसरा, राजीनामा देतानाही चेहऱ्यावर हास्य : एकनाथ खडसे

चंद्रकांत पाटील आता प्रदेशाध्यक्ष आहेत आणि पहिल्यांदा ते या ठिकाणी येत आहेत. ते काय बोलणार आहेत याची मला देखील उत्सुकता आहे, असं एकनाथ खडसेंनी सांगितलं.

मी नेहमीच हसरा, राजीनामा देतानाही चेहऱ्यावर हास्य : एकनाथ खडसे
Follow us
| Updated on: Dec 12, 2019 | 11:15 AM

बीड : ‘मी नेहमीच हसरा असतो, माझा चेहरा कायम प्रसन्न असल्याचं अनेकांचं म्हणणं असतं. अगदी राजीनामा दिला त्या दिवशीही माझ्या चेहऱ्यावर काही दुःख नव्हतं, हास्य होतं’, असं भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse at Gopinath Gad) ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना म्हणाले. खडसे हे कन्या रोहिणी खडसे यांच्यासह गोपीनाथगडावर दाखल झाले.

‘माझ्या जीवनामध्ये गोपीनाथ मुंडे यांना अनन्यसाधारण स्थान आहे. त्यांच्या सहवासात वर्षानुवर्ष काढल्यामुळे अनेक संस्कार आमच्यावरही झाले. त्यांचा जयंती उत्सव संपूर्ण देशात कार्यकर्ते साजरा करतात. आज गोपीनाथ गडावर हा सोहळा साजरा होत आहे.’ असं खडसे म्हणाले.

‘मागची पाच वर्ष आमचं सरकार असताना येत होतो, आणि आता आमचं सरकार नसताना येत आहोत. सरकारमध्ये असताना आमचे कार्यकर्ते जरा बिझी राहायचे, त्यांना वेळ मिळत नव्हता. नेत्यांनाही नव्हता. आता आमच्याकडे भरपूर वेळ आहे, त्यामुळे आनंदाने सगळे जण इथे येत आहेत.’ असंही खडसे म्हणाले. बागेश्वरी देवी मंदिरात दर्शन घेऊन खडसे बापलेक गोपीनाथ गडावर रवाना झाले.

चंद्रकांत पाटील आता प्रदेशाध्यक्ष आहेत आणि पहिल्यांदा ते या ठिकाणी येत आहेत. ते काय बोलणार आहेत याची मला देखील उत्सुकता आहे, असं एकनाथ खडसेंनी सांगितलं.

कुणामुळे कुणाची तिकीट कापली गेली, कोणाचा पराभव झाला, हा बाहेर चर्चा करण्याचा विषय नाही, हा पक्षांतर्गत विषय आहे. पक्षाच्या बैठकांमध्ये हा विषय चर्चेला येईल, असं खडसेंनी स्पष्ट केलं.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त बीडमधील गोपीनाथगडावर मुंडे समर्थकांचा मेळा जमणार आहे. गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी यानिमित्त ‘स्वाभिमान दिना’चं आयोजन केलं आहे. मुंडे समर्थकांना संबोधित करताना पंकजा मुंडे नेमकी कोणती घोषणा करणार, आपल्या मनातील नाराजी आणि खदखद व्यक्त करणार का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं येत्या काही तासांत मिळणार आहेत. पंकजा मुंडे दुपारी एक वाजता संबोधित करतील.

गोपीनाथ गडावर मुंडे समर्थकांचा मेळा, पंकजा मुंडे नाराज नेत्यांसह ‘स्वाभिमान’ जागवणार?

पंकजा मुंडेंसह त्यांच्या भगिनी आणि भाजप खासदार प्रीतम मुंडे, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, प्रकाश मेहता, राज पुरोहित, सुरेश धस, रासप अध्यक्ष आणि पंकजा मुंडे यांचे मानलेले भाऊ महादेव जानकरही गोपीनाथ गडावर हजेरी लावणार आहेत. यापैकी खडसे, तावडे, मेहता यासारखे नेते विधानसभा निवडणुकीत तिकीट कापलं गेल्यामुळे पक्षावर नाराज असल्याचं बोललं जातं. त्यामुळे नाराजांच्या मेळ्यात वेगळा मार्ग निघणार, की शक्तिप्रदर्शनात भाजपवर दबाव टाकला जाणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Eknath Khadse at Gopinath Gad

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.