मध्यावधी निवडणूक तूर्त होईल असं वाटत नाही : एकनाथ खडसे

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकार आणि मध्यावधी निवडणुकांवर भाष्य केलं आहे.

मध्यावधी निवडणूक तूर्त होईल असं वाटत नाही : एकनाथ खडसे
Follow us
| Updated on: Feb 15, 2020 | 4:00 PM

नवी मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकार आणि मध्यावधी निवडणुकांवर भाष्य केलं आहे (Eknath Khadse on Midterm elections in Maharashtra). तूर्तास तरी राज्यात मध्यावधी निवडणुका होतील असं वाटत नसल्याचं मत एकनाथ खडसेंनी व्यक्त केलं. ते भाजपच्या दोन दिवसीय अधिवेशनात बोलत होते. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून 15 आणि 16 फेब्रुवारीला नवी मुंबईत हे अधिवेशन घेतलं जात आहे.

एकनाथ खडसे म्हणाले, “महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर मतांतरं आहेत. आता ही मतांतरे उघडपणे होत असून वाढायला लागले आहेत. या अंतर्गत विरोधामुळेच हे सरकार मोडेल. असं असलं तरी मध्यावधी निवडणूक तूर्त होतील असं मला वाटत नाही. त्यांनाही काही काळ द्यावा लागेल. मी माझ्या पक्षावर कधीही टीका केली नाही. माझी टीका एखाद्या वेळी व्यक्तीवर असू शकते. मी पक्षात सक्रीय आहे.”

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील मध्यावधी निवडणुकांवर भाष्य केलं होतं. त्यांनी भाजप महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकांची तयारी करणार असल्याचं वक्तव्यं केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांचं मध्यावर्ती निवडणुकांवरील हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे. भाजपमध्येच मध्यावधी निवडणुकांवरुन दोन वेगळी मतं असल्याचंही या निमित्ताने समोर येत आहे. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे यांनी भाजपला संघटनात्मक कामावर लक्ष देण्याचा सल्ला दिला होता.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

“महाविकास आघाडी सरकार भाजप नेत्यांशी सूडबुद्धीने, द्वेषभावनेतून वागत आहे. त्यामुळे शिवसेनेबरोबर पुन्हा लगेच सूर जुळणे कठीण आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजप करणार नाही, आम्हाला त्यात रस नाही. ते आपापसातील मतभेदांमुळेच पडेल. भाजप आता मध्यावधी निवडणुकांसाठी तयारी सुरु करणार आहे”, असं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.

दरम्यान, नवी मुंबईत नेरुळमध्ये सकाळी भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. 16 फेब्रुवारीला जे. पी. नड्डा हे देखील अधिवेशनाला हजर राहणार आहेत. यावेळी जे. पी. नड्डा हे कार्यकर्त्यांना संबोधित करतील. या राज्यव्यापी अधिवेशनात महाराष्ट्रातील भाजपचे खासदार, आमदार, महापौर, नगरसेवक सहभागी होणार आहेत. अधिवेशनात 10 हजाराहून अधिक पदाधिकारी उपस्थित असतील असा दावा भाजपने केला आहे.

भाजपचे चंद्रकांत पाटील हे या अधिवेशनात जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भाजप प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारतील. तसेच, विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस या अधिवेशनाचा समारोप करतील. भाजप राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे, माजी अर्थमंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक यांच्यासह पक्षाचे विविध नेते या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत.

संबंधित बातम्या :

नवी मुंबईत भाजपचं दोन दिवसीय अधिवेशन, महाविकास आघाडीच्या 80 दिवसांचा आढावा घेणार

सत्ता पाडण्यापेक्षा स्वत:च्या संघटनेकडे लक्ष द्या, तटकरेंचा भाजपला सल्ला

Eknath Khadse on Midterm elections in Maharashtra

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.