मी आता टेन्शन फ्री, इतरांना टेन्शन देण्याचं काम करणार, खडसेंचं फडणवीसांकडे बोट
आता इतरांना टेन्शन देण्याचे काम मी सुरु करणार आहे," असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला. (Eknath Khadse comment On Various Allegations from BJP)
नाशिक : माझ्या डोक्यावरील टेन्शन कमी झालं आहे. त्यामुळे आता इतरांना टेन्शन देण्याचे काम मी सुरु करणार आहे, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकतंच प्रवेश केलेले नेते एकनाथ खडसे यांनी दिला. कधी माझ्या मागे ईडी लागेल, कधी अँटी करप्शन लागेल, याची नेहमी भीती असायची, असेही खडसेंनी यावेळी सांगितले. (Eknath Khadse comment On Various Allegations from BJP)
“मागच्या कालखंडात गेले चार वर्षे मी भीतीच्या छायेखाली वावरत होतो. कधी माझ्या मागे ईडी लागेल, कधी अँटी करप्शन लागेल. कधी विनयभंगासारखी केस दाखल केली जाईल, याची नेहमी भीती असायची. मात्र आता मी त्या केसमधून निर्दोष सुटलो आहे. विनयभंगासारख्या खटल्यातूनही बाहेर आलो आहे.”
“या सर्वातून बाहेर आल्याने माझ्या डोक्यावरील टेन्शन कमी झालं आहे. आता एनसीपीत आलो. त्यामुळे आता इतरांना टेन्शन देण्याचे काम मी सुरु करणार आहे,” असा इशारा एकनाथ खडसे यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपला दिला.
“भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कुल्फी आणि चॉकलेट देऊन भाजपात प्रवेश दिला. भाजपातील अनेक आमदार माझ्या संपर्कात आहे. मात्र पक्ष बंदी कायद्यामुळे अनेक जण अडचणी आहेत. मला साधा कार्यकर्ता म्हणून काम करायला मला आवडेल,” असेही एकनाथ खडसे म्हणाले.
“भाजपला शेटजी भटजींचा पक्ष म्हटलं जात होतं. मारवाडी भटांचा पक्ष असेही म्हणायचे. तेव्हापासून आम्ही काम करत आहोत. ही ओळख गोपीनाथ मुंडे, मी, नितीनजी, प्रमोदजी, अण्णा डांगे यासारख्या कार्यकर्त्यांनी काम केलं. बहुजन चेहरा करण्याचा प्रयत्न केला. मी 2014 नंतर बहुजन मुख्यमंत्री झाला पाहिजे असं नुसतं म्हटलं होतं. तेव्हापासून माझ्यामागे चौकशीचा ससेमीरा लागला. मी चार वर्षे त्या ओझ्याखालीच होतो. भाजपमध्ये बहुजनांकडे दुर्लक्ष झालं आहे हे मान्यचं करावं लागेल,” असेही खडसेंनी यावेळी सांगितले. (Eknath Khadse comment On Various Allegations from BJP)
संबंधित बातम्या :
Devendra Fadnavis Corona | देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाचा संसर्ग
आता कुठं बॉक्स उघडलाय, खडसे आलेत, भाजपचे अनेक आमदार संपर्कात : छगन भुजबळ