‘मंत्री झाल्यावर अशा धमक्या देत असतात, विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असतो’, एकनाथ खडसेंचा महाजनांवर निशाणा

गिरीश महाजनांनी माझ्याविषयी जे वक्तव्य केलं ते धमकी समजायचं की सल्ला समजायचा? मंत्री झाल्यावर अशा धमक्या येत असतात. विरोधकांचा (Opposition) आवाज बंद करण्याचा प्रयत्न असतो. मी तुमचं काम करण्यास कोणती अडचण आणली नाही, अशा शब्दात खडसे यांनी महाजनांवर निशाणा साधलाय.

'मंत्री झाल्यावर अशा धमक्या देत असतात, विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असतो', एकनाथ खडसेंचा महाजनांवर निशाणा
एकनाथ खडसे, गिरीश महाजनImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 4:13 PM

मुंबई : जळगावच्या राजकारणात एकनाथ खडसे (Eknath Khadse) विरुद्ध गिरीश महाजन हा वाद आता सर्वश्रृत आहे. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. तर दोन्ही बाजूंनी जोरदार आरोप-प्रत्यारोपही सुरु असतात. अशावेळी गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी तुमची तू तू मैं मैं बंद करा अशा शब्दात खडसेंना एकप्रकारे इशाराच दिला होता. त्यावर आता खडसे यांनीही प्रत्युत्तर दिलंय. गिरीश महाजनांनी माझ्याविषयी जे वक्तव्य केलं ते धमकी समजायचं की सल्ला समजायचा? मंत्री झाल्यावर अशा धमक्या येत असतात. विरोधकांचा (Opposition) आवाज बंद करण्याचा प्रयत्न असतो. मी तुमचं काम करण्यास कोणती अडचण आणली नाही, अशा शब्दात खडसे यांनी महाजनांवर निशाणा साधलाय.

त्याचबरोबर मंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजप नेत्या आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केलेल्या एका वक्तव्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय. त्यावरही एकनाथ खडसे यांनी भाष्य केलंय. आता असं झालं आहे की पंकजाताईंची काळजी भारतीय जनता पार्टीचे सर्वच नेते करायला लागले आहेत. गिरीश महाजनांपासून तर भाजपचे सर्वच नेते पंकजाताईंची काळजी घेत असून तिला सल्ला देत आहेत की तुला न्याय दिला जाईल. त्यामुळे तिच्या पाठीशी सर्वजण उभे असतील तर तिला न्याय मिळाला अशी अपेक्षा करतो, असा टोला खडसेंनी लगावलाय.

‘पंकजाताईंना मंत्रिमंडळात घेतील की नाही याबाबत शंका’

मंत्रिमंडळाचा विस्तार अपूर्ण दिसतोय. पुढच्या कालखंडात आणखी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. गोपीनाथ मुंडे यांच्या परिवाराशी जे कुणी संबंधित आहेत, पंकजा मुंडे असो वा इतर त्यांच्यावर सातत्याने अन्याय केला जात आहे. आताही पंकजाताईंना मंत्रिमंडळात घेतील की नाही याबाबत शंका आहे. पंकजा मुंडे यांना माझ्या शुभेच्छा आहेत. आता त्यांनी अजून वाट न पाहता वरिष्ठांना भेटावं, असा सल्ला एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडेंना दिलाय.

पंकजा मुंडेंचं नेमकं वक्तव्य काय?

पंकजा मुंडे म्हणाल्या की, अशा चर्चा माध्यमांमधून, माझ्या कार्यकर्त्यांमधून होत असतात. पण त्यांना वाटलं असेल की यांची पात्रता नाही, म्हणून दिलं नसेल. पण जेव्हा त्यांना वाटेल की पंकजा मुंडेंची पात्रता आहे तेव्हा ते देतील. पण आज मी शांत आहे, माझे कार्यकर्ते शांत आहेत. या सगळ्यात माझा काही रोल असणार नाही. मी जे काम करते ते स्वाभिमानाने आणि इज्जतीने राजकारण करते, असं पंकजा मुंडे यांनी आवर्जुन सांगितलं.

मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.