Eknath Khadse ED Inquiry : एकनाथ खडसेंची ईडीकडून तब्बल 9 तास चौकशी, सहकार्य करण्याचं खडसेंचं आश्वासन
एकनाथ खडसे यांची सक्तुवसुली संचलनालय अर्थात ईडीकडून तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली. एकनाथ खडसे हे सकाळी 11 च्या सुमारास ईडी कार्यालयात दाखल झाले होते. त्यानंतर रात्री 8 वाजता ते ईडी कार्यालयातून बाहेर पडले.
मुंबई : भौसरी एमआयडीसी जमिन कथित गैरव्यवहार प्रकरणात आज माजी महसूलमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची सक्तुवसुली संचलनालय अर्थात ईडीकडून तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली. एकनाथ खडसे हे सकाळी 11 च्या सुमारास ईडी कार्यालयात दाखल झाले होते. त्यानंतर रात्री 8 वाजता ते ईडी कार्यालयातून बाहेर पडले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या कन्याही उपस्थित होत्या. दरम्यान, ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर खडसे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देणं टाळलं. दरम्यान, यापुढील चौकशीला सहकार्य करण्याचं आश्वासन खडसे यांनी दिल्याचं त्यांच्या वकिलांनी सांगितलं. (Eknath Khadse interrogated by ED for 9 hours)
एकनाथ खडसे यांनी ईडी कार्यालयातून बाहेर पडताना माध्यमांशी बोलणं टाळलं असलं तरी त्यांच्या वकिलांनी पत्रकारांना सविस्तर माहिती दिलीय. खडसे यांनी चौकशीत सहकार्य केलं. यावेळी अनेक स्टेटमेंट तपासण्यात आले. ईडीला हवे असलेले कागदपत्र आम्ही दिले आहेत. अजून काही लागणारी कागदपत्रे 10 दिवसांत देणार आहोत. तसंच गरज भासेल तेव्हा चौकशीला उपस्थित राहणार असं आश्वासन खडसे यांनी दिलं आहे. ईडीने पैशांच्या व्यवहाराबाबत, तसंच भोसरीतील जमिनीबाबतही चौकशी केली. खडसे यांनी सविस्तर माहिती दिली आहे, असं वकिलांनी सांगितलं.
चौकशीला जाण्यापूर्वी भाजपवर हल्लाबोल
ईडीने चौकशीला बोलावल्यानंतर आज सकाळी 11 च्या सुमारास एकनाथ खडसे ईडी कार्यालयात हजर झाले. त्यावेळी या कारवाईमागे राजकीय सुडाचा वास येतोय. मी पक्ष बदलला. भाजपसोडून राष्ट्रवादीत आलो. त्यानंतर माझ्या चौकश्या सुरू झाल्या. राजकीय हेतूने ही कारवाई सुरू आहे. नाथाभाऊंना छळण्यासाठीचं हे षडयंत्र सुरू आहे, असं सांगतानाच जळगावमध्ये व्हॉट्सअॅपवर भाजप कार्यकर्त्यांच्या ग्रुपवर अभी कुछ होनेवाला है असा मेसेज फिरत आहे. यातून हे सर्व राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं दिसून येत आहे. पण मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे, असं खडसे म्हणाले होते.
अजून किती चौकश्या करणार?
ही जमीन एमआयडीसीची नाही. ती खासगी जमीन आहे. एमआयडीसीने हा भूखंड संपादित केलेला नाही. त्याचा मोबदला दिलेला नाही. ताबाही दिलेला नाही. आम्ही सर्व खासगी व्यवहार केले आहेत. मी भूखंड खरेदी केला तेव्हा त्यावर मूळ मालकाचं नाव होतं. हे मी वारंवार सांगितलं आहे. या प्रकरणी पाच वेळा चौकशी झाली. अँटी करप्शन ब्युरोनेही चौकशी केली. आरोपात काही तथ्य नसल्याचा अहवालही त्यांनी दिला आहे. अजून किती वेळा चौकशी करणार आहात?, असा सवाल त्यांनी केला.
चौकशीत सहकार्य केलं. अनेक स्टेटमेंट व्हेरीफाय केले. ईडीला हवे असलेले कागदपत्र दिले आहेत. अजून काही लागणारी कागदपत्रे 10 दिवसांत देणार आहोत. तसंच गरज भासेल तेव्हा उपस्थित राहणार असं खडसेंनी सांगितलं. पैशांच्या व्यवहाराबाबत चौकशी केली. भोसरीतील जमिनीबाबतही चौकशी झाली. सविस्तर माहिती दिली आहे.
संबंधित बातम्या :
“जावयापाठोपाठ एकनाथ खडसे आणि मंदाकिनी खडसेंनाही अटकेची शक्यता”
भोसरी जमीन घोटाळा, एकनाथ खडसेंना मोठा दणका, जावई गिरीश चौधरींना ईडीची अटक
Eknath Khadse interrogated by ED for 9 hours