भोसरी भूखंड प्रकरणात नोटीस, 30 डिसेंबरला ईडी कार्यालयात हजर राहणार, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया

होय, मला ईडीची नोटीस मिळाली अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse first reaction after ED notice) यांनी दिली.

भोसरी भूखंड प्रकरणात नोटीस, 30 डिसेंबरला ईडी कार्यालयात हजर राहणार, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया
Eknath Khadse
Follow us
| Updated on: Dec 26, 2020 | 5:45 PM

जळगाव : होय, मला ईडीची नोटीस मिळाली अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse first reaction after ED notice) यांनी दिली. एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस पाठवल्याची एक्स्लुझिव्ह बातमी टीव्ही 9 मराठीने शुक्रवारी रात्री दाखवली होती. त्या बातमीवर खुद्द एकनाथ खडसे यांनी आता शिक्कामोर्तब केलं. “धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरातील भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादीत आले. ईडीची नोटीस आल्यानंतर मला महाराष्ट्रातून फोन येत आहेत. मला सहानुभूतीच मिळत आहे. लोकांना हे आवडत नाही”, असं एकनाथ खडसे म्हणाले. (Eknath Khadse first reaction after ED notice)

ईडीची नोटीस आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरातून मला जे फोन येत आहे त्यातून सहानुभूती व्यक्त केली जात आहे. लोकांना असं वाटते की हा एक प्रकारचा माझ्यावर अन्याय आहे. वारंवार चौकशा लोकांना आवडलेल्या दिसत नाहीत, पण काही निर्णय असतात, त्या आधीन राहून काम करायचं असतं, असं एकनाथ खडसे म्हणाले. (Eknath Khadse first reaction after ED notice)

“यापूर्वी अनेकदा माझी चौकशी केली आहे. त्यावेळी मी हजर राहिलो आहे. त्यांनी माझ्याकडे जे कागदपत्रं मागितले, ते मी दिले आहेत. याही वेळेस ईडी जे काही कागदपत्रं मागतील त्यांनी मी सहकार्य करेन,” अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान आली.

“माझ्या बायकोने भोसरी या ठिकाणी एक भूखंड खरेदी केला आहे. त्याबाबत ही नोटीस दिली आहे. त्या यापूर्वी चार वेळा चौकशी झाली आहे. ही पाचव्यांदा चौकशी होत आहे. हा व्यवहार रेडी रेकनरच्या दरानुसार पाच कोटींचा आहे. ती चौकशी करण्याचा ईडीला अधिकार आहे. त्यामुळे ईडीला सहकार्य करु. मी जास्त काही बोलणार नाही. जे काही आहे ते नंतर बोलेन,” असेही एकनाथ खडसे म्हणाले.

येत्या 30 डिसेंबरला मला हजर रहायला सांगितल आहे. मला तसा समन्स आला आहे. मी त्यानुसार उपस्थित राहणार आहे, असेही खडसेंनी सांगितले.

एकनाथ खडसेंना ईडीची नोटीस 

भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (5 reasons behind ED notice to NCP leader Eknath Khadse) यांना अंमलबजावणी संचलनालय अर्थात ED ने नोटीस पाठवल्याचं (ED Notice) वृत्त आहे. ईयर एण्ड अर्थात वर्षाअखेरिला म्हणजे 30 डिसेंबरला खडसेंना (ED notice to Eknath Khadse) चौकशीसाठी बोलावणं धाडल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर काल ‘टीव्ही 9 मराठी’ने एकनाथ खडसे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा एकनाथ खडसे यांनी अद्याप मला ईडीची नोटीस मिळाली नसल्याचे सांगितले. ही नोटीस मिळाल्यानंतर मी स्वत:ची भूमिका स्पष्ट करेन, असे त्यांनी टीव्ही 9 मराठीला सांगितले. त्यानंतर आज खडसेंनी आपली पहिली प्रतिक्रिया देत, आपल्याला नोटीस आल्याचं सांगितलं.

अंजली दमानिया ED विरोधात कोर्टात जाणार

एकीकडे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना ED ने नोटीस (Eknath Khadse) पाठवल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी आता थेट ईडी आणि CBI यांनाच कोर्टात खेचण्याचा पवित्रा घेतला आहे. ईडी, (ED) सीबीआयविरोधात (CBI) कोर्टात याचिका दाखल करणार असल्याची माहिती, अंजली दमानिया यांनी टीव्ही 9 मराठीला दिली.

संबंधित बातम्या 

इकडे खडसेंना नोटीस, तिकडे अंजली दमानिया ED आणि सीबीआयलाच कोर्टात खेचण्याच्या तयारीत 

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.