मुंबई : विधान परिषदेची (Vidhan Parishad Election news) निवडणूक झाली. ही निवडणूक संपताच एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse News) केलेल्या बंडानं राजकीय वातावरण ढवळून निघालं. तर दुसरीकडे विधान परिषदेवर निवडून आलेल्या आमदारांचा सत्कार समारंभही प्रभावित झाला. असाच काहीसा प्रकार घडला एकनाथ खडसेंच्या बाबतीत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) एकनाथ खडसे यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी देण्यात आलेली होती. खडसेंसाठी विधान परिषदेमध्ये निवडून येणं, एक आव्हानच होतं. हे आव्हान त्यांनी पेललं आणि विधान परिषदेमध्ये विजयही मिळवला. त्यानंतर खरंतर वेगवेगळ्या ठिकाणी आमदार झाल्यानिमित्त एकनाथ खडसे यांचा सत्कार करण्यासाठी कार्यकर्ते उत्सुक होते. पण एकनाथ खडसेंचा सत्कार एकनाथ शिंदेच्या बंडामुळे रद्द करण्याची वेळ ओढावली.
त्याचं झालं असं, की एकनाथ खडसे हे बुधवारी मुक्ताईनगरला परतले होते. आमदार झाल्याच्या निमित्तानं कार्यकर्ते त्यांचं अभिनंदन करण्यासाठी गुरुवारी सत्कार करणार होते. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी कार्यालयाची वेळही राखून ठेवली. कार्यकर्तेही जमायला सुरुवात झाली. दुपारी बारा वाजताची वेळही ठरली होती.
कार्यक्रमाला एकनाथ खडसे आलेही. पण सत्काराचा कार्यक्रम रद्द करण्याची वेळ ओढवली. कारण तातडीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सर्व आमदारांना बैठकीचं बोलावणं आलं. लगेचच मुंबईत पोहोचा असं फर्मान काढण्यात आलं होतं. त्यामुळे एकनाथ खडसे यांना तातडीनं मुंबईसाठी रवाना होणं भाग होते. बैठक शरद पवारांनी आयोजित केलेली असल्यानं खडसे तातडीने रवानाही झाले.
अखेर मग पक्षाचे शहराध्यक्ष अशोक लाडवंजारी, सुनिल माळी आणि इतर कार्यकर्त्यांनी वाटेतच एकनाथ शिंदे यांना गाठलं आणि वाहनातच त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्यामुळे सर्वच नेते मुंबईत होते. पण बुधवारी नुकतेच मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसे परतले होते. पण त्यांना पुन्हा लगेच दुसऱ्या दिवशी मुंबईला परतावलं लागलं आणि या सगळ्यात त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम मात्र रद्द करावा लागला होता.
वाचा LIVE घडामोडी : Eknath Shinde vs Shiv Sena LIVE