आधी शरद पवार नागपुरात, आता खडसेही येणार, मोठा निर्णय जाहीर करणार?

भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे हे मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत की काय, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे (Eknath Khadse meeting with Sharad Pawar).

आधी शरद पवार  नागपुरात, आता खडसेही येणार, मोठा निर्णय जाहीर करणार?
Follow us
| Updated on: Dec 17, 2019 | 8:21 PM

मुंबई : भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे हे मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत की काय, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे (Eknath Khadse meeting with Sharad Pawar). पंकजा मुंडे भाजप सोडणार नाहीत, पण माझा भरोसा नाही, असं एकनाथ खडसे गोपीनाथ गडावर म्हणाले होते. त्यानंतर आता एकनाथ खडसे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्याची चिन्हं आहेत (Eknath Khadse meeting with Sharad Pawar).

एकनाथ खडसे आज रात्री नागपुरात दाखल होणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही नागपुरात आहेत. त्यामुळे शरद पवार आणि एकनाथ खडसे यांची भेट होण्याची दाट शक्यता आहे. “मी कुणालाही भेटण्यास मोकळा आहे. राष्ट्रवादीमध्ये जाणार की नाही याबाबत निर्णय नाही”, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

एकनाथ खडसेंच्या भेटीगाठी

एकनाथ खडसे हे भाजपवर नाराज आहेत. मुलगी रोहिणी खडसे आणि पंकजा मुंडे यांना भाजपच्याच नेत्यांनी पाडल्याचा आरोप खडसेंनी जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर खडसेंनी पंकजा मुंडेंची भेट घेतली होतीच, शिवाय दिल्लीत जाऊन शरद पवारांचीही भेट घेतली होती. एकनाथ खडसे हे दिल्लीत भाजपच्या वरीष्ठ नेत्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र भाजप नेते भेटलेच नव्हते. तिथे त्यांची शरद पवारांसोबत चर्चा झाली होती. दिल्लीतून परतल्यानंतर खडसेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज खडसे पुन्हा पवारांना भेटण्याची शक्यता आहे.

गोपीनाथ गडावर खडसेंचा हल्लाबोल

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse attack on BJP) यांनी गोपीनाथ गडावरुन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर घणाघात केला. “देवेंद्र फडणवीसांना पक्षाचा अध्यक्ष (प्रदेशाध्यक्ष) करायचं हे गोपीनाथ मुंडेंनी मला सांगितलं, मुंडे साहेबांनी सांगितलं म्हणून मी संमती दिली, पण ज्यांनी मोठं केलं त्यांनाच अशी वागणूक दिली”, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी थेट देवेंद्र फडणवीसांवर हल्ला केला.

शेठजी-भटजीचा पक्ष म्हणून भाजपला हिणवले जात होते, मात्र त्या पक्षाला मोठे करण्याचे काम गोपीनाथ मुंडेंनी केलं. मुंडे साहेबांनी कधी पाठीत खंजीर खुपसला नाही, त्यांचं वाक्य नेहमी आठवतं, हम तो डुबेंगे सनम, लेकिन तुम्हे साथ लेकर डुबेंगे, जो संघर्ष त्यांच्या वाट्याला आला, तोच प्रसंग माझ्याही आयुष्यात, असं एकनाथ खडसेंनी सांगितलं.

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना मागील काही काळापासून चांगलाच वेग आला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यानंतर अनेक भाजप नेत्यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. त्यामुळे ते काय भूमिका घेणार असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. अशातच आता ऐन हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर होणारी पवार-खडसे भेट आता चर्चेचा विषय ठरत आहे. या भेटीदरम्यान काय मोठा निर्णय होणार की ही भेटही केवळ चर्चेचाच विषय ठरणार हे आता येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.